✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/10/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९०८ - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या दुहेरी राजतंत्राने ओस्मानी साम्राज्यच्या ताब्यातील बॉस्निया आणि हर्झगोव्हेना बळकावले.★ १९८१ - इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादातची हत्या.💥 जन्म :-★ १९१४ - थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक.★ १९३० - हफेझ अल-असाद, सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-★ १६६१ - गुरू हर राय, सातवे शिख गुरू.★ १८९२ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.★ १९७९ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात केला प्रवेश,काल दुपारी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांना सन 2022 नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरचा अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात पायलटचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फैजाबाद छावणीचं नाव आता अयोध्या छावणी; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई: शिवसेनेतून गद्दारीं केली, मंत्रीपद काही वेळेपुरतंच आहे, पण गद्दार हा शिक्का कायमस्वरुपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नैसर्गिक शेती' संदर्भात आज पुण्यात कार्यशाळेचे आयोजन, या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम निघाले मोडित, मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The Loin & The Mouse👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LUHDSa-9ZIM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती*https://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आपल्या सूर्यमालिकेतील ग्रहाची माहिती* 📙 ग्रहांबद्दल तशी थोडीफार माहिती प्रत्येकालाच असते. कधी ना कधी तरी त्यांच्याबद्दल कानावर पडत असतेच. डोळ्याने दिसोत वा न दिसोत, ज्योतिषांकडून तर ते सतत कानावर पडतात. सूर्यमालिका पाच अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, असे मानले जाते. सूर्याभोवती भ्रमण करणारे आठ ग्रह सध्या ज्ञात आहेत. त्यातील बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे घन वस्तूपासून बनले असून गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून हे वायूंचे प्रचंड गोळे आहेत. सूर्यमालिका तयार होताना सूर्याकडे ९९ टक्के घनभाग आकर्षित झाला, तर उरलेला एक टक्का भाग आकाशात विखुरला गेला. यातूनच ग्रह बनत गेले. सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव या प्रक्रियेत फारच मोठा होता. यामुळे सूर्यापासूनचे जवळचे ग्रह खडक व धातू यांपासून बनले. सूर्याने जड मुलद्रव्ये स्वतःजवळच्या परिभ्रमण कक्षेत खेचून घेतल्याचा हा परिणाम होता. ज्या पदार्थांचा गोठणबिंदू जास्त आहे, ते जवळच्या ग्रहात;९ तर ज्यांचा गोठणबिंदू कमी आहे ते लांबच्या ग्रहात दिसतात. जे ग्रह सूर्यापासून दूर राहिले, तेथवर उष्णता कमी पोहोचत होती. त्यामुळे तेथील वायूंचे बर्फात रूपांतर होत गेले. हलकी मुलद्रव्ये यामध्ये सामावत गेली. सूर्याभोवती भ्रमण करताना हे ग्रह स्वतःभोवतीही भ्रमण करू लागले. मंगळ व गुरू या दरम्यान असलेल्या काही घनांचा ग्रह बनला नाही. अशा दोन गोळ्यांना लघुग्रह अशीही उपाधी मिळाली. लघुग्रह असला, तरी त्यांतील सिरीजचा व्यास ९४० किलोमीटरचा आहे. यांना 'अॅस्टेराॅइड्स' म्हणून ओळखले जाते. सूर्यकक्षेत फिरणाऱ्या ग्रहांना काही उपग्रहही आढळतात. ग्रहमालिकेच्या उत्पत्तीमध्ये हे उपग्रह काही ठराविक अंतरावर घनाकृतीत रूपांतरित झाले व ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत अडकून त्यांच्याभोवती फिरू लागले. बुधावर लोहाचे प्रमाण खूपच जास्त आहे; तर शुक्र, पृथ्वी, मंगळ येथे लोह, निकेल, सिलिकेट व त्यापासून बनलेले खडक व माती यांचे प्रमाण जास्त आहे. नंतरचे ग्रह मात्र नायट्रोजन व मिथेन यांच्या घनरूपाने बनले आहेत. बर्फाळ अवस्थेत हे वायू घनरूप आढळतात. ग्रहांवरून सूर्यकिरण परावर्तित होतात म्हणूनच ते आपल्याला दिसतात. बुध सूर्याच्या खूपच जवळ असल्याने सूर्याच्या तेजापुढे दिसत नाही. शुक्र पृथ्वीला खूपच जवळ येत असल्याने सर्वात ठळक दिसतो. मंगळ रंगामुळे, तर शनि कड्यांमुळे लक्षात येतो. गुरू हा शुक्रानंतर लगेच डोळ्यात भरतो. हर्षल, नेपच्यून हे दुर्बिणीच्या सहाय्यानेच बघावे लागतात. ग्रहांचा प्रकाश हा स्थिरपणे दिसणारा प्रकाश असतो. यामुळेच लुकलुकणाऱ्या ताऱ्यांपासून त्यांचे वेगळेपण सहज जाणवते. ग्रहांबद्दलची काही आकडेवारी थोडक्यात अशी:बुध सूर्यापासून ५.८ कोटी किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा करतो. त्याचा व्यास ४,९०० किलोमीटरचा आहे, तर पृष्ठभागावरील तापमान चारशे डिग्री सेंटिग्रेड असते. सूर्याच्या विरुद्ध बाजूला रात्री तापमान उणे १७० डिग्री सेंटीग्रेडपर्यंत उतरते. याचा प्रदक्षिणा काळ ५९ दिवसांचा आहे. शुक्राचा आकार पृथ्वीपेक्षा थोडा लहान असून सूर्यापासून १०.८ कोटी किलोमीटरवर त्याची प्रदक्षिणा चालते. याचे तापमान ५०० अंश सेंटिग्रेड असते. पृथ्वीवर सजीवांची वस्ती आहे, वातावरण आहे, पाणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसांत प्रदक्षिणा करते. तापमान अधिक पन्नास ते उणे पन्नास सेंटिग्रेड आढळते.मंगळ सूर्यापासून २२.८ कोटी किलोमीटरवर आहे, व्यास ६,८०० किलोमीटरचा आहे. गोठलेला कार्बन डायऑक्साइड ध्रुवीय भागात आढळतो.गुरू ७७.८ कोटी किलोमीटरवर आहे. पृथ्वीच्या एक हजारपट मोठा आहे. हा सर्वांत मोठा ग्रह म्हणावा लागेल. शनी १४२.७ कोटी किलोमीटरवर असून त्याला सहा उपग्रह आहेत. याचा व्यास एक लाख वीस हजार किलोमीटरचा आहे. शनीभोवतीची कडी त्याची प्रदक्षिणा ज्या वर्तुळात होते त्या दिशेला कललेली राहतात. त्यामुळे ती आपल्याला वेगवेगळ्या कोनातून आढळतात. हर्षल म्हणजेच युरेनस २८७ कोटी किलोमीटर अंतरावरून भ्रमण करतो व त्याचा व्यास ५२,४०० किलोमीटरचा आहे. नेपच्यून ४४९.७ कोटी किलोमीटरवरून भ्रमण करतो व व्यास ४८,६०० किलोमीटर आहे. प्लुटो हा २४ ऑगस्ट २००६ पर्यंत सूर्यामालेतील एक ग्रह मानला जात होता. त्याचा शोध १९३० साली लागला. हा ग्रह आहे वा नाही, याविषयी ७५ वर्षात अनेक व वेळा चर्चा झाली होती. पण ७० देशातील ४५० उपस्थित खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहाची व्याख्या तपासून प्लुटो हा ग्रह नाही असे २००६ मध्ये जाहीर केले. ग्रहाची व्याख्या अशी : जी खगोलीय वस्तू सूर्याभोवती भ्रमण करते. जी पुरेशा गुरुत्वाकर्षीय बलामुळे गोलाकृती झाली आहे आणि जिने आपल्या भ्रमणकक्षेच्या परिसरात असलेल्या सर्व लहान मोठ्या वस्तू दूर सारल्या आहेत, अशा वस्तूला ग्रह म्हणावे. या व्याख्येनुसार पहिल्या दोन अटी फक्त प्लूटो पूर्ण करतो. तिसरी अट मात्र पूर्ण होत नाही. प्लुटो काही वेळा नेपच्यूनच्या भ्रमणकक्षेच्या आत जातो. अशी परिस्थिती १९७९ ते १९९९ सालच्या दरम्यान उद्भवली होती. अशा ग्रहांना खुजा ग्रह (Dwarf planet) असे संबोधावे, असा निर्णय खगोलशास्त्रज्ञांनी घेतला आहे.प्लूटोची भ्रमणकक्षा सूर्यापासून फार मोठ्या प्रमाणात कमी जास्त होते. ४४० ते ७७० कोटी किलोमीटर या अंतरावर लंबवर्तुळाकार हे भ्रमण चालते. त्याचा व्यास जेमतेम चंद्राएवढाच आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?* पेदेमरी व्यंकट सुब्बाराव,19622) *दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?* फुफ्फुसे3) *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?* डॉ नरेंद्र दाभोलकर4) *बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* कुस्तीपटू5) *जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?* 21 सप्टेंबर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रामरेड्डी अरकलवार● श्वेता अंबडकर● दशरथ बोईनवाड● माधव हाक्के● संतोष जाधव किल्लारीकर● माधव अटकोरे● मारोती रेड्डी● संभाजी हिवराळे● सूर्यकांत मोळे● प्रकाश चरपिलवार● नागभूषण भालेराव*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*व्यक्तिमत्व फुलून यायचे असेल तर कौटुंबिक भावना जोपासायला हवी. यासाठी नात्यांची ऊब आवश्यक आहे. मग हे नाते कुटुंबातील असो अथवा मित्र-मैत्रिणींचे असो. आम्ही निसर्गरम्य पहाडात गेलो होतो. निर्जन दरीत फुललेली फुले चित्त प्रसन्न करीत होती. तिथे स्थानिक माणूस एकटाच बसला होता. त्याला आम्ही म्हणालो, 'ह्या निर्जनस्थळी ही निसर्गाची रूपे तुला किती संपन्नता देत आहेत. 'तो उत्तरला,'होय, पण त्याहीपेक्षा खूप दिवसांनी इथे कोणी माणूस आला आणि त्याच्याशी बोलता आले ही प्रसन्नता खूप मोठी आहे.' निसर्ग आणि विज्ञान याद्वारे प्राप्त होणारी संपन्नता जशी हवी आहे तशी नाती आणि अध्यात्म याद्वारे प्राप्त होणारी प्रसन्नताही गरजेचे आहे.**माणसांमधील प्रेमाची ऊब त्याच्या वेदना वाचायला शिकवते आणि त्या वेदनेवर फुंकर देते, त्याला आधार देते आणि एकमेकांवर सावली धरते. "मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले, घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले." ना.धो.महानोर यांनी आकाशाने वाकून घनगर्द सावल्या देण्याची कल्पना किती सुंदर केली आहे. पु.ल.देशपांडे यांनी इरावती कर्वे यांच्याबद्दल लिहीलेल्या लेखात 'वृक्षासारखी नकळत सावल्या धरणारी ही माणसे' असे म्हटले आहे. छोटे असताना आपण सावली घ्यावी आणि मोठे झालो की सावली द्यावी. छोटे असताना चुलवणासारखी ऊब घ्यावी आणि मोठे झाल्यावर अशी चुलवणे व्हावे..* • • ● *॥ रामकृष्णहरी ॥*● • • 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या माणसांना तुमच्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे त्या माणसांना तुमच्यावर रागावण्याचा,रुसण्याचा किंवा काही काळ अबोला धरण्याचाही अधिकार आहे.ह्या गोष्टी आपल्या मैत्रीत,नात्यात नसतील तर ते प्रेम कसले..?आपल्या माणसांना अधिक आपले नाते घट्ट करावयाचे असतील आणि त्यात काही काळापुरता आपला दुरावा निर्माण करायचा असेल तर आपणही थोडा काळ शांत रहावे त्यात आपल्या माणसांविषयी मनात कोणतेही वाईट विचार आणून नातेसंबंध तोडू नये.एकामेकांबद्दल अविश्वासही निर्माण करु नये. ह्या छोट्या छोट्या जीवनातल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे मन शांत ठेवून द्यायची असतात. मग एकमेकांबद्दल आपोआपच कळायला लागते की,आपले काहीतरी चुकले आहे आणि मग तो पूर्वीसारखे च अधिकचे नाते दृढ करण्यासाठी पुढे येतो.म्हणून आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आपलीच माणसे आहेत हे ओळखून आनंदाने,प्रेमाणे आणि मैत्रीने हसतखेळत जीवन जगायला शिकावे.हीच खरी जीवनशैली आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव*बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."*तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment