✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 04/10/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆२००१ - युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव्ह टी.यु. १५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.◆ २००४ - स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.💥 जन्म :-★ १८७७ - रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.★ १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.★ १९२० - जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.★१९३१ - बेसिल डि'ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.★१९६४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆१९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.◆ १९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी.◆१९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.◆२००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *6 राज्यांच्या 7 विधानसभेच्या जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक; तर 6 नोव्हेंबरला निकाल, निवडणूक आयोगाचे परिपत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय वायुसेनेला आज स्वदेशी बनावटीचे १० लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत... हे मल्टीफंक्शनल हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यास आणि शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळीच्या दिवसांत खाद्यतेलाचे दर नियंत्रित रहावेत म्हणून केंद्र सरकारनं आयात शुल्कात दिलेली सूट कायम ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे नवरात्रौमहोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन दिवाळीत पुण्याहून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे 19 ऑक्टोबर पर्यंत रद्द; रेल्वेने पर्यायही दिला नसल्याने नागरिकांची तारांबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *औरंगाबादकरांची 10 वर्षांची प्रतीक्षा संपली, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पीटलाइनचे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आदिवासी, शेतमजूरांचा आवाज हरपला; ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कुमार शिराळकर यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Have Fun With Animal👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9KASDoo5TWk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ठेविले अनंते तैसेचि राहावे*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/07.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *दूरचित्रवाणी (Television)* 📙दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला.नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते.दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो.टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो. टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संगीता भांडवले● बालाजी इप्तेकर● सुरेंद्र गाडेकर● धनराज शेट्टीगर● लक्ष्मण पंदोरे● ओमप्रकाश येवतीवाड● साईनाथ पोरडवार● विजय पळशीकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.**खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या अंगावरचे वस्त्र भारी नसले तरी चालेल हलके पण अंगभर असावे की, त्यातून अंगप्रदर्शन होऊ नये, वाणी कशीही असली तरी चालेल वाचा स्पष्ट असायला हवी कारण आपले विचार इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा आपण काय म्हणतो ते कळले पाहिजे, आपल्या डोळ्यांना कमी जरी दिसायला लागले तरी दुसऱ्याबद्दल चांगल्याच दृष्टीने पहायला हवे परंतु काकदृष्टीने पाहू नये, अंत:करण एवढे शुद्ध ठेवावे की,दुसऱ्याच्या वाईट विचारांने आपल्या अंतःकरणाची चलबिचल अवस्था होऊन वाम मार्गाचा अवलंब करु नये. या आणि इतर गोष्टीच्या बाबतीत सतर्क राहून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपण इतर लोकांसमोर आदर्श निर्माण करु शकतो आणि आपले मनापासून अनुकरण करायला शिकतील. जर आपणच चांगले वागलो नाही तर इतरांना चांगले बनवण्याचा आपल्याला अधिकारच नाही.©व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनाची यशस्वीता*एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार वाद झाला. वादाचा विषय होता ’भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्या पित् याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते. मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यात सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’ *तात्पर्यः* *खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहायला हवे.यशस्वी जीवनाचे हेच रहस्य मानवी मनास उलगडायला हवे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment