✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑक्टोबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*विशेष सूचना - दिनांक 27 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या काळात दिवाळी सुट्टी असल्याने फ्रेश मॉर्निंग बुलेटिन पोस्ट होणार नाही, याची विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि वाचकांनी नोंद घ्यावी. दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा*~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/CuPuQUNoEz1BPqWc/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟥 *_ या वर्षातील ३०० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर**१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.**१९६२: वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.**१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.**१८७३: गंगाधर शास्त्री दातार यांचा अनुवादित 'दत्तलहरी' ग्रंथ वासुदेव बळवंत फडके यांनी स्वखर्चाने प्रकाशित केला.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟥 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: शुभंकर तावडे -- भारतीय अभिनेता* *१९८०: आतिश सुरेश सोसे -- कवी, लेखक, संपादक विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७४: रवीना टंडन – अभिनेत्री**१९७४: डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी -- कवयित्री तथा वैद्यकीय अधिकारी**१९६८: प्रफुल्ल माटेगांवकर -- लेखक, कलाकार**१९६७: हरिश्चंद्र लाडे -- कवी, लेखक विचारवंत* *१९६६: डॉ. रमेश रामजी राठोड -- लेखक* *१९६६: मंजुषा अभिजित आमडेकर -- लेखिका* *१९५५: मनिषा चिंतामणी आवेकर -- लेखिका, कवयित्री* *१९५४: शब्बीर कुमार -- भारतीय पार्श्वगायक**१९५४: लक्ष्मीकांत बेर्डे -- मराठी व हिंदी चित्रपट प्रसिद्ध विनोदी अभिनेता (मृत्यू: १६ डिसेंबर २००४ )**१९४९: पंडित सुहास व्यास -- शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान* *१९४६: शोभा बोंद्रे --- लेखिका**१९४४: प्रा. विद्या गंगाधर सप्रे-चौधरी -- लेखिका**१९३७: हृदयनाथ मंगेशकर – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९३६: आशा शर्मा -- प्रसिद्ध दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू: २५ ऑगस्ट २०२४)**१९३०: दत्तात्रेय भास्कर धामणस्कर -- प्रसिद्ध मराठी कवी**१९२५: शंकर भाऊ साठे -- कादंबरीकार आणि शाहीर (मृत्यू: १५ मार्च १९९६ )* *१९२४: शोभना रानडे -- प्रसिद्ध भारतीय समाजसेविका आणि गांधीवादी( मृत्यू: ४ ऑगस्ट २०२४)**१९१९: मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८० )**१९००: कौतिक नारखेडे -- कवी, कथाकार (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८० )**१९००: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३ )**१८९१: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)**१८८८: हरी कृष्ण मोहनी -- लेखक, राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९६१ )**१८३८: केशव सदाशिव रिसवूड -- लेखक (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९०० )*🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर --- महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार (जन्म: ५ फेब्रुवारी १९३६)**१९९१: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक,लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक,हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९ )**१९८१: दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे --- कर्नाटकामधील प्रसिद्ध साहित्यिक (जन्म: ३१ जानेवारी १८९६ )**१९७९: चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ (जन्म: २२ ऑगस्ट १८९५ )* *१९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६० )**१९०९: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी भाषेचा विकास सर्वांच्या हाती*नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. नुसता अभिजात भाषेचा दर्जा मिळून काही फायदा होणार आहे का ? आपल्या मराठी भाषेचा विकास आपल्याच हातात आहे. ते कसे वाचा या लेखात..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंगोलीत दोन वाहनांतून 1.40 कोटी रुपये जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिवाळीआधीच PM मोदींनी भारतीयांना दिली भेट; पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत मिळणार आता 20 लाखापर्यंतचे कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे 3 रुग्णांना जीवदान, जिंतूर येथील सार्थक नवले याच्या कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा झटका, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला, निफ्टीमध्येही घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, नागपूर दक्षिण पश्चिममधून दाखल केला उमेदवारी अर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर, 90-90-90 जागा तीन पक्ष लढवणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दिली मोठी अपडेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडने भारताला अवघ्या 156 धावांत गुंडाळले, मिचेल सँटनरच्या 7 विकेट्स, न्यूझीलंडची दुसऱ्या डावात 5 बाद 198 मजल, 301 धावांची भक्कम आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणसाचा मेंदु* *प्रश्न*तुम्ही माणसाचा मेंदु हे कारण म्हणुन वारंवार पुढे करत आहात, पण तो मेंदु तरी देवाने माणसाला दिला ना? तुम्ही म्हणता मेंदुची उत्क्रांती झाली. परंतु ती उत्क्रांती तरी देवाच्या इशा-याने घडुन आली ना? इतर कुणा प्राण्यांचा मेंदु उत्क्रांत न होता फक्त मानवाचा मेंदु उत्क्रांत झाला. असे का बरे झाले? ती तरी देवाजीचीच इच्छा ना? *उत्तर*कोणत्याही प्राण्याच्या शरीररचनेत एका अवयवात उत्क्रांतीने बदल झाला तर परस्परसंबंधित इतर अवयवांतही बदल होउ लागतात. माणसाच्या बातीत अशी सर्वात महत्वाची घटना म्हणजे त्याच्या हातापायांतील बदलामुळे त्याच्या मेंदुच्या विकासाला मिळालेली चालना. हातापायांमुळे माणसाचा आहार विविध झाल्यावर आणि हाताने खाद्याचे तुकडे करता येउ लागल्यावर माणसाला वानरासारख्या मोठया जबडयाची व साक्षसी दातांची गरज उरली नाही. म्हणुन जबडा व दात लहान होउ लागले आणि त्यामुळे डोक्यात मेंदुला जास्त जागा मिळाली. शिवाय हातपाययुक्त नव्या जीवनपध्दतीत मेंदुत अनुभव साठवुन ते वापरण्याचे मेंदुचे कामही वाढले. अशा प्रकारे एकीकडे डोक्यात मेंदु वाढायला जागा झाली व दुसरीकडे मेंदुच्या वाढीची गरजही निर्माण झाली. असे हे सर्व घडुन आले.भुस्तर अवशेषांवरून मेंदुच्या आकारांची साधारण तुलना अशी होते: पुच्छहीन वानरांचे मेंदु साडेचारशे ते सहाशे घन सेंटिमीटर असतात. त्यांच्यानंतरच्या आॅस्ट्रेलोपिथेकस हया मर्कट मानवाचा मेंदु साधारण तेवढाच, पण साडेसहाशे घन सेंटिमीटरपर्यंत होता. त्यापुढील होमो हाॅबिलिस म्हणजे हातमानवाचा मेंदु साडेसहाशे ते आठशे घन सेंटिमीटर इतका होता. पुढील टप्प्यावरील होमो इरेक्टसचा मेंदु आठशे ते बाराशे घनसेंटिमिटरपर्यंत होता. उदा. हया वर्गातील जावा मानवाचा साडेआठशे ते साडेनउशे घन सेंटिमिटर तर पेकिंग मानवाचा नउशे ते बाराशे घन सेंटिमिटर होता. पेकिंगचा हा आदिमानव मांस भाजुन खात असे. ते भाजुन पचायला हलके झाल्याने जबडा व दात यांचा आकार कमी व मेंदुचा आकार मोठा होण्यास मदत झाली असावी. त्यापुढील टप्पा होमो सॅपियन व त्यांच्यानंतरचा आधुनिक मानव यांचे मेंदु साधारण सारखेच म्हणजे तेराशे ते पंधराशे घन सेंटिमिटरपर्यंत आहेत. उदा. दीड लाख वर्षापुर्वीचा निअॅंडरथाॅल या होमो सॅपियनचा मेंदु तेराशे पन्नास घन सेंटिमिटर म्हणजे आधुनिक माणसाच्या टप्प्यात आलेला होता. साधारणपणे, पुच्छहीन वानराचा आधुनिक मानव बनेपर्यंत त्याचा मेंदु तिपटीने वाढला असे म्हणता येईल.उत्क्रांतीत मेंदुचा केवळ आकार नव्हे तर त्याची घडण आणि अंतःरचना यातही प्रगतीपर बदल होत गेलेले आहेत. आधुनिक मानवाचा मेंदु पुच्छहीन वानराच्या मेंदुपेक्षा तिप्पट मोठा असतो, पण त्यातील न्युट्राॅन्स चौदापट असतात. शिवाय, त्यात नवे भागही विकसित झालेले असतात. अशा प्रकारे मानवाचा अजब मेंदु त्याच्याबरोबर विकसित झालेला आहे. (किंबहुना, मेंदु विकसित झाला म्हणुन माणुस बनला). सारांश मानवाचा मेंदु ही कुणा देवाची देणगी नव्हे. *लेखक - शरद बेडेकर**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*OTT - Over The Top*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बिश्नोई समाज कोणत्या प्राण्याला पवित्र मानतात ?२) केंद्र सरकार किती वाणाचेच हमीभाव जाहीर करते ?३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक रचना कशाप्रकारे करण्यात आली आहे ?४) 'मयूर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) PKL चा फुल फार्म काय आहे ? *उत्तरे :-* १) काळवीट २) २३ वाण ३) ५+३+३+४ ४) मोर ५) Pro Kabaddi League*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव गव्हाणे, क्रियाशील शिक्षक👤 अविनाश थोरात👤 नवनाथ शिंदे👤 सौ. संगीता नामेवार-कंदेवार👤 गणेश पालदेवाड, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥ घेसी सोडुनियां पोहे मुठीभरा । हिडसावल्या करा नामा म्हणे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *कष्टाची कमाई श्रेष्ठ*📗 *एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.**तात्पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment