✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑक्टोबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/09/blog-post_24.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_जागतिक अन्न दिन_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••🛟 *_जागतिक बधिरीकरण दिन किंवा जागतिक भूल दिन_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••🛟 *_ या वर्षातील २९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.**१९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९७५: बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.**१९७३: हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान**१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.**१९२३: वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी ’द वॉल्ट डिस्‍ने कंपनी’ची स्थापना केली.**१९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.**१८६८: डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.**१८४६: डॉ.जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.**१७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.**१७७५: ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: शार्दुल ठाकूर -- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू**१९७१: कुंडलिक कनिराम पवार -- कवी, लेखक* *१९६८: किसन दत्तात्रय उगले -- लेखक, कवी**१९६५:भवानी शंकर -- भारतीय पखवाज ढोल वादक* *१९६१: जयश्री सुधीर देसाई -- लेखिका, अनुवादक**१९६०: डॉ. रमा मराठे -- लेखिका, कवयित्री* *१९६०: मकरंद विनायक सापटणेकर -- लेखक**१९५९: अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जून २०१०)**१९५४: दिलीप गंगाधर कल्याणी -- कवी, लेखक**१९५४: मंजुषा मनोहर शिनखेडे -- कवयित्री, लेखिका**१९५०: अशोक श्रीधर थोरे -- कादंबरीकार* *१९४८: हेमा मालिनी – प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक**१९४०: नरेंद्र चंचल -- भारतीय गायक होते ज्यांना धार्मिक गाणी आणि भजन यात विशेष प्राविण्य प्राप्त (मृत्यू: २२ जानेवारी २०२१ )**१९३८: डॉ. शामला वनारसे -- मानसोपचारतज्ज्ञ, लेखिका**१९३६: वसंत दामोदर भट -- लेखक, व्याख्याते**१९१७: इंदुमती रामकृष्ण शेवडे -- कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार, संशोधक, समीक्षक(मृत्यू: १४ मार्च १९९२ )**१९१६: शकुंतला ना. दिवाणजी -- लेखिका* *१९१५: भानुदास बळीराम शिरधनकर -- लेखक (मृत्यू: १२ एप्रिल १९७७ )**१९०७: सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(मृत्यू: ४ आक्टोबर १९८२ )**१८९६: सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (मृत्यू: १८ जून १९७४ )**१८९०: अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक,(मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७ )**१८८६: गिरिजाबाई महादेव केळकर -- कादंबरीकार, नाटककार (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९८०)**१८५४: ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार,(मृत्यू: ३० नोव्हेंबर १९०० )**१८४१: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: २६ आक्टोबर १९०९ )**१६७०: बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू: ९ जून १७१६ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: लेख टंडन -- भारतीय निर्माता आणि अभिनेता ( जन्म: १३ फेब्रुवारी १९२९ )**२०१६: केर्सी लॉर्ड -- भारतीय संगीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९३५ )**२०१३: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गो. पु.) -- मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक (जन्म: २ ऑगस्ट, १९३८ )**२००२: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९२३ )**१९९७:दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक* *१९८१: मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (जन्म: २० मे १९१५ )**१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (जन्म: १ आक्टोबर १८९५ )**१९५०: वि. गं. तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक* *१९४८:माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म: १८८५ )**१९४४: गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, 'प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म: १८८७ )**१७९३: मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (जन्म: २ नोव्हेंबर १७५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संतुलित आहार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वायनाड आणि नांदेड लोकसभा मतदारसंघांसह विधानसभा निवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर रोजी निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजप नेत्या चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत बाबुसिंह महाराज राठोड, हेमंत पाटील यांच्यासह सात आमदारांनी घेतली शपथ, राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावा, विधानसभेला फडणवीसांची जिरवा; निवडणुकीची घोषणा होताच मनोज जरांगेंचा आदेश सुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने नाशिकच्या रुग्णालयात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई - बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी 29 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारत आणि यूएसमध्ये 31 प्रीडेटर MQ-9B ड्रोनसाठी 32,000 कोटी रुपयांचा करार; संरक्षण क्षमता वाढीस चालना*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asia World Cup 2024 Women - वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करत गाठले सेमी फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••😵 *जांभई केव्हा येते ?* 😵झोप आली की जांभई येते अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण ती खरी नाही. कारण दिवसाढवळ्याही एखादं व्याख्यान ऐकत असताना किंवा चक्क एखादा सिनेमा पाहत असतानाही जांभई येते. त्यामुळेच जेव्हा थकवा येतो किंवा कंटाळा येतो तेव्हा जांभई येते असं म्हटलं तर ते अधिक संयुक्तिक होईल. जांभई येते तेव्हा आपला जबडा सताड उघडा पडतो. त्याच्याशी जोडलेले स्नायू ताणले जातात आणि हवा जोराने आत खेचली जाते. या सर्वांशी जांभई येण्याचा संबंध आहे.जांभई सर्वांनाच येते. लहान मुलांना येते, मोठ्या माणसांना येते, जनावरांना येते आणि पक्षांनाही येते. एवढंच काय पण अजून न जन्मलेल्या आईच्या पोटात वाढणाऱ्या मुलालाही जांभई येते. ती का येते हे जरी अजून कोडंच असलं तरी तिच्यासंबंधी पुष्कळ माहिती मिळालेली आहे. जांभई साधारणपणे ६ सेकंद टिकते. मनुष्यप्राण्यामध्ये बीजफलन होऊन नव्या जीवाची नांदी म्हटली गेल्यानंतर जेमतेम ११ आठवडे होतात न होतात तो जांभई येते. आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमसमध्ये जांभईचं नियंत्रण केंद्र आहे.थकवा किंवा कंटाळा आल्यानंतर जांभई येते याचा शोध एका अनोख्या प्रयोगातून लागला. वैज्ञानिकांनी १७ ते १९ वर्षे वयाच्या मुलामुलींची दोन गटांमध्ये विभागणी केली. एका गटाला त्यांनी एमटीव्हीवर दाखवतात तसे गाण्यांचे व्हिडीओ दाखवले. तर दुसऱ्या गटाला निरनिराळ्या रंगांचे बारकोड्स दाखवले. एकूण तीस मिनिटं हा कार्यक्रम चालला होता. त्या दरम्यान त्या दोन्ही गटातल्या मुलांनी किती जांभया दिल्या याची मोजदात केली गेली. त्यावरून असं दिसून आलं की पहिल्या म्हणजे गाण्याचे व्हिडिओ पाहणाऱ्या गटातल्या मुलांनी सरासरी ३.४ जांभया दिल्या तर दुसऱ्या म्हणजे कंटाळवाणे बारकोड्स पाहणाऱ्या गटातल्या मुलांना त्याच वेळात ५.८ जांभया आल्या.असा कंटाळा आला की हायपोथॅलॅमसमध्ये मेंदूतल्या संदेशवाहक रसायनांचा तसंच काही संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. त्याचा प्रभाव पडून जांभयांचं नियंत्रण करणारं केंद्र कार्यान्वित होतं. येणारी जांभई दाबुन टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यातून समाधान मिळत नाही. उलट आणखी जांभया येतात. कारण जांभई येताना जबड्याचे स्नायू जोवर पूर्णपणे ताणले जात नाहीत तोवर जांभईच्या कारणाचं समाधान होत नाही.थकवा येतो तेव्हा आपला श्वासोच्छवास मंद गतीने होत असतो. त्यामुळे शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्याची नोंद घेऊन हायपोथॅलॅमस कार्यान्वित होतो असाही दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. या उलट शरीरात कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढलं म्हणजेही जांभई येते असंही मत प्रदर्शित केलं गेलं आहे. पण यालाही वैज्ञानिक प्रमाण मिळालेले नाही. त्यामुळे थकवा किंवा कंटाळा आला की जांभई येते हे मान्य असलं तरी त्यामुळे नेमकं काय साधलं जातं हे अजूनही कोडंच आहे.बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NSS - National Service Scheme*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो.- फ्रँकलीन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *टाटा ट्रस्ट* च्या चेअरमनपदी कोणाची निवड करण्यात आली ?२) आतापर्यंत एकूण किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे ?३) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष किती व कोणत्या ?४) 'भेद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील 'फूड मदर' म्हणून कोणाला ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) नोएल टाटा २) अकरा ३) सहा - कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे, डॉ. तारा भवाळकर ४) फरक, भिन्नता ५) ममता भांगरे, अहिल्यानगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 सुबोध काकाणी, प्रसिद्ध युवा उद्योजक, धर्माबाद👤 दत्तप्रसाद यंगुलदास, विजय स्टेशनरी सप्लायर्स, नांदेड👤 विशाल धनगर👤 राम भांगे मुगटकर👤 साईकुमार शिंदे पाटील👤 संदीप अकोलकर👤 दिगंबर शिंदे पाटील👤 साईनाथ कळसे पाटील 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥ माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥ सहस्त्र अपराध घालीं माझें पोटीं । तारीं जगजेठी नामा म्हणे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्याला तेल, तिखट मीठ लावून गोड शब्दात कोणाच्या विषयी सांगत असतील तर त्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. कारण सांगितलेले प्रत्येक शब्द खरे असतीलच असे नाही. कारण त्या सांगण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ सुद्धा कुटून भरलेला असतो. म्हणून स्वतः त्या व्यक्तीला ही वाचावे व ज्या व्यक्तीविषयी ऐकायला मिळाले असेल त्या व्यक्तीला सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करून बघावा. बरेचदा सांगण्यावर विश्वास ठेवल्याने शेवटी पश्चातापात पडण्याची वेळ आपल्यावर येत असते आणि त्यावेळी कायमची वेळ निघून गेलेली असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य:ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment