✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑक्टोबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/bJPyDYG15tMf56rk/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *_धम्मचक्र प्रवर्तन दिन_* ✨••••••••••••••••••••••••••••••••••• ✨ *_आंतरराष्ट्रीय मानक दिवस_* ✨•••••••••••••••••••••••••••••••••✨ *_ या वर्षातील २८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ✨ *_महत्त्वाच्या घटना:_* ✨••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर**१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.**१९८१: अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.**_१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला._**१९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.**१९३३: राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.**१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.**१९१२: मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर इसमाने खूनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले.*✨ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ✨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९: पूनम राऊत -- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी भारतीय खेळाडू**१९८१: गौतम गंभीर-- प्रसिद्ध क्रिकेटपटू, मुख्य प्रशिक्षक**१९७६: प्रा. डॉ. रणधीर शिंदे -- प्रसिद्ध लेखक**१९७६: विजयालक्ष्मी मनेकर -- कवयित्री* *१९७५: प्रशांत नामदेव ढोले -- कवी, लेखक**१९७०: विनिता श्रीकांत देशपांडे -- कवयित्री, लेखिका,अनुवादक**१९६१: प्रा. डॉ. नरेंद्र पाठक -- प्रसिद्ध लेखक**१९५८:व्यंकटेश बळवंत वाकडे -- कवी* *१९५६: विजया व्यंकटेश देशपांडे -- कवयित्री**१९५६: डॉ . दीपक बोरगावे -- कवी, लेखक**१९५५: उस्ताद शाहिद परवेझ – इटावा घराण्याचे सतारवादक**१९५२: डॉ. नीलिमा माधव गुंडी -- प्रसिद्ध भाषाभ्यासक, कवयित्री आणि लेखिका**१९४४: अरुण विनायक मांडे -- बालसाहित्यिक, कथा लेखक* *१९४३: डॉ.आण्णासाहेब हरी साळुंखे -- प्रसिद्ध लेखक, महाराष्ट्रातील विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक* *१९४०: डॉ. महादेव सदाशिव वाघ -- कवी, लेखक**१९३९: सुलभा निशिकांत ठकार -- गायिका व लेखिका**१९३६: सुभाष भेंडे – सुप्रसिद्ध मराठी लेखक (मृत्यू: २० डिसेंबर २०१० )**१९३२: पंडित दामोदर केशव दातार -- डीके दातार म्हणून लोकप्रिय, भारतीय व्हायोलिन वादक (मृत्यू: १०ऑक्टोबर२०१८ )**१९३२: मनोहर मारोतीराव तल्हार -- प्रसिद्ध मराठी लेखक (मृत्यू: १५ फेब्रुवारी २०१८ )**१९३२: द. पं. जोशी -- मराठी भाषेतील लेखक, पत्रकार (मृत्यू: ३० डिसेंबर २०११ )**१९३१: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (मृत्यू: २७ जानेवारी १९८६ )**१९३०: डॉ.मधुसूदन अनंत चान्सरकर-- नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अर्थतज्ञ, लेखक (मृत्यू: १९ मे २०२० )**१९२७: रॉजर मूर – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता (मृत्यू: २३ मे २०१७ )**१९२४: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७ )**१८९२: विष्णू गोविंद दामले -- कलादिग्दर्शक, ध्वनिमुद्रक, निर्माता, दिग्दर्शक(मृत्यू: ५ जुलै १९४५)**१८९०: ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ मार्च १९६९ )**१८८२: इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५ )**१७८४: फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३ )**१६४३: बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२ )* ✨ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ✨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: मनोहर म्हैसाळकर- विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि कुशल संघटक, व्यवस्थापक (जन्म: १ ऑगस्ट १९३२ )**२०१३: मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: १४ फेब्रुवारी१९२५ )**२००५: द्वा.भ. कर्णिक -- महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक (जन्म: १४ जानेवारी १९०८ )**२००४: दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच,भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक(जन्म: १० नोव्हेंबर१९२० )**१९९९: ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १३ एप्रिल १९२२ )**१९९८: डॉ.भालचंद्र पंढरीनाथ बहिरट – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक(जन्म: ५ सप्टेंबर १९०४ )* *१९९७: हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: २१ मे १९१६ )**१९९४: सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार,(जन्म: २७ ऑगस्ट १९१० )**१९९३: लालचंद हिराचंद दोशी – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष, पद्मश्री (१९९२) (जन्म: १९०४ )**१९९०: डॉ. अ. ना. देशपांडे -- विदर्भातील सुप्रसिद्ध लेखक, मराठी वाड्:मय इतिहासकार (जन्म: १२ मार्च १९१५ )**१९५३: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन यांसाठी प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत,महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (जन्म: १४ जानेवारी १८८२ )**१९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – दहा नाटके, आठ कादंबर्या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.(जन्म: २४ ऑगस्ट १८७२ )**१९४४: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१ )**१९१९: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (जन्म: ३० जुलै १८५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••*आपली कामे आणि आपण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन आफ्रिकी देशाच्या दौऱ्यावर रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियोजित मराठी भाषा भवन इमारतीचे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मंत्री बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली, सोशल मीडियावर केली पोस्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशभरात RTI च्या ४ लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित, तर राज्यातील १ लाख केसेस रखडलेल्या स्थितीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे सामान्यांना दिलासा मिळाला - आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख ओमप्रकाश शेटे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला हरवून ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या आरोग्यासाठी टिप्स*- आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या. - जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. - जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. - रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम. - झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.- मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.- वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ISRO - Indian Space Research Organisation*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहण यात जीवनाची सार्थकता आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक कोण होते ?२) २०२४ साली कोणत्या पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला ?३) साहित्यासाठी नोबेल जाहीर झालेल्या पहिल्या आशियाई महिला कोण ?४) 'भू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) दीक्षाभूमी नागपूर येथे नुकताच कितवा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला ? *उत्तरे :-* १) डॉ. केशव बळीराम हेडगेवार २) मराठी, बंगाली, पाली, प्राकृत, आसामी ३) हान कांग, दक्षिण कोरिया ४) जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री ५) ६८ वा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, नांदेड👤 डॉ. भास्कर पेरके, नांदेड👤 गणेश सिरमेवार, शिक्षक, धर्माबाद👤 शिवशंकर संगमवार👤 सतिश उशलवार👤 मुरलीधर थोटे👤 रत्नाकर सोनवणे👤 अमोल मोरे👤 स्वप्नील वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपत्याचें हित किजे त्या जनकें । जरी वेडें मुकें जालें देख ॥१॥ तैसें मी पोसणें तुझें जिवलग । अंतरींची सांग खूण कांहीं ॥२॥ राखीन मी नांव तुझें सर्वभावें । चित्त वित्त बळी देईन पायीं ॥३॥ जरी दैवहीन म्हणसी मजला । तरी लाज कवणाला म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट व संघर्ष करून सुद्धा ज्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात ते दुसऱ्यांदा कोणाच्याही मागे धावण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. कारण हे सर्व करण्या आधी ते,स्वतः मध्येच सर्व काही शोधून बघितलेले असतात. म्हणून इतर गोष्टींविषयी त्यांना आकर्षन नसते. आपणही आधी स्वतः मध्ये शोधून बघण्याचा प्रयत्न करून बघावे इकडे, तिकडे शोधण्याची किंवा कोणाच्याही मागे धावण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••○ .. विजय असो .. ○एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले. मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले. भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्या वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला, ''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''तात्पर्य - ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.सौजन्य - https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment