✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑक्टोबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*नवरात्र विशेष माहिती - वणीची सप्तशृंगी देवी*Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/saptashgungi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⚪ *_विश्व वास्तुकला दिवस_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••••⚪ *_ या वर्षातील २८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.**१९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना**१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.**१९१९: महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.**१९१९: के.एल.एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.**१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.**१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.* ⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: अभिजीत सावंत -- भारतीय पार्श्वगायक**१९७९: युक्ता मुखी -- भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री* *१९७८: जहीर खान – भारतीय जलदगती गोलंदाज**१९७८: प्रिती तडस-वाडीभस्मे -- कवयित्री, लेखिका**१९७८: नवनाथ एकनाथ ठाकूर -- कवी**१९७७: संदीप दशरथ बोडके -- लेखक, कवी**१९७६: शरद केळकर -- भारतीय अभिनेता**१९७५: गजानन जानभोर -- माजी निवासी संपादक (लोकमत) राजकीय–सामाजिक विश्लेषक, लेखक**१९६७: अमृता संखे -- कवयित्री* *१९६६: रेणुका शहाणे -- मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणाऱ्या मराठी अभिनेत्री* *१९६५: डॉ.बळवंत हिरामणजी भोयर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६०: आश्विनी भिडे-देशपांडे – लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका**१९५५: विश्राम गुप्ते -- मराठीतले आघाडीचे कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध**१९५५: डॉ. लीना सुधाकर जोशी -- लेखिका**१९५५: घनश्याम डोंगरे -- कवी, कथाकार, संपादक (मृत्यू:११ नोव्हेंबर २००५)**१९५४: दीपक करंदीकर -- गझलकार**१९५३: डॉ. अनिल नारायणराव कुलकर्णी -- लेखक* *१९५२: व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष**१९४९: रवींद्र महाजनी-- मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक (मृत्यू: ११ जुलै २०२३ )**१९४८: डॉ. ललिता मोहन कुंभोजकर -- लेखिका* *१९४३: हरीश शाह --- भारतीय वित्त निर्माता, देश आणि लेखक (मृत्यू: ७ जुलै २०२० )**१९४२: हेमलता पागनीस -- प्रसिद्ध लेखिका**१९४१: उषा खन्ना -- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय संगीत दिग्दर्शिका**१९३९: प्रा. प्रल्हाद विठ्ठलराव पांढरकर -- लेखक**१९३३: नामदेवराव दिवटे-- माजी खासदार तथा लेखक (मृत्यू: १८ जुलै २०१५ )**१९३१: प्रा. त्र्यंबक महाजन -- लेखक, समीक्षक* *१९३१: दिनेशचंद्र विश्वनाथ आठल्ये -- लेखक**१९२७: मृणालिनी प्रभाकर देसाई -- कादंबरीकार (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९४ )**१९२१: जयवंत दत्तात्रेय जोगळेकर -- समीक्षक, भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक, युद्धशास्त्र अभ्यासक (मृत्यू: १६ जुलै २०१६ )**१९१७: विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू: १३ मे २०१० )**१९१४: बेगम अख्तर – गझल,दादरा आणि ठुमरी गायिका.गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४ )**१९०७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७ )**१९००: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू: २९ एप्रिल १९४५ )**१८८५: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२ )**१८६६: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ –मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५कविता आज उपलब्ध त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह.ना.आपटे यांनी प्रकाशित केला.(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: प्रभाकर पेंढारकर -- मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ७ सप्टेंबर १९३३ )**१९९९: उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ )**१९९८: भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री (जन्म: ९ फेब्रुवारी १९१४ )**१९७५: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९ )**१८४९: एडगर अॅलन पो –अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (जन्म: १९ जानेवारी १८०९ )**१७०८: गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म: २२ डिसेंबर १६६६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... मदर तेरेसा ......मदर तेरेसा या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुसऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले.पुढील भागात - डॉ. आनंदी गोपाळ जोशीसंकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे घात झाला, मुंबईतील चेंबूरमध्ये चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रहारच्या बच्चू कडूंना मोठा धक्का, मेळघाटचे आमदार राज कुमार पटेल यांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते गरवारे महाविद्यालयातील अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *घर चलो अभियान भाजपच्या उपक्रमाला नागपुरात सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मालदीवचे अध्यख मोहम्मद मेईज्जू भारताच्या पाच दिवसाच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Women T20 World Cup - भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, टी २० वर्ल्ड कपमध्ये उघडले विजयाचे खाते*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजचा रंग - पांढरा*पांढरा रंग स्पष्टपण, शुद्धता, पावित्र्य आणि तारुण्य याचा संकेत देत असतो. व्यक्तिनिष्ठ धारणेत हा रंग उत्साहित करतो आणि संतुलित आरोग्य आणि मनःस्वास्थ्याचे निःशब्द प्रतीक असतो. पृथ्वीचा उपग्रह चंद्र, आठवड्यातील सोमवार आणि राशीचक्रातील कर्क राशी, या सर्वांचे हा प्रतीक-चिह्न आहे. एखादे उत्पादन वापरासाठी किती सुलभ आणि सुरक्षित आहे, हे सांगण्यासाठी जाहिरातीत पांढरा रंग प्रामुख्याने वापरला जातो. वजन कमी करण्यासाठी घ्यायचे एखादे औषध, कमी उष्मांक असलेले उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ याच्या जाहिराती आणि वेष्टनावर अनेकदा पांढरा रंग प्रभावीपणे वापरलेला असतो. पांढरा रंग वापरणारी व्यक्ती साधारणपणे सकारात्मक असते आणि दिसतेसुद्धा. त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाची जाणीवसुद्धा आपल्या नकळत आपल्याला होते. काळी रात्र संपून नव्या दिवसाची सुरुवात म्हणजे पांढरा रंग. काळ्या पाटीवरची जुनी अक्षरे पुसून पांढऱ्या खडूने नवी अक्षरे लिहिणारा प्रसन्न-सकारात्मक म्हणजे पांढरा रंग. वेगवेगळे रंग, दर्शकाच्या मनात विविध भावना निर्माण करतात. पांढरा रंग अशा काही भावना निर्माण करत नाही. मात्र, पांढऱ्या रंगाच्या ‘विषमता’ या एका गुणधर्मामुळे, अन्य रंगांच्या रिकाम्या पार्श्वभूमीवर आपले विचार व्यक्त करण्याचे, तो एक नैसर्गिक साधन आहे. विद्येची देवता सरस्वतीदेवीचे शुभ्र पांढरे वस्त्र, तिचे शुभ्र कमलासन आणि तिच्या बाजूचा पांढरा हंस ही पांढऱ्या रंगाची पहिली प्रतीके. पांढरा रंग ज्या रंगांचे संतुलन ठेवतो, त्या रंगांनी नटलेला बहुरंगी मोर हे याचे दुसरे प्रतीक. स्थैर्य आणि शांतता, दिलासा आणि आश्वासन, दुःख कमी करणारा आणि सांत्वनशील असा पांढरा रंग या विशेषणांनी संपन्न आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CAT - Common Admission Test*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास, हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती ?२) समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे ?३) महाराष्ट्रातील कोणते गाव 'सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव' म्हणून पात्र ठरले आहे ?४) 'ब्रीद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सारथीचा फुल फार्म काय आहे ? *उत्तरे :-* १) प्रा. रंगनाथ पठारे २) तैवान ( २०१९ ) ३) कर्दे, रत्नागिरी ४) बाणा, प्रतिज्ञा ५) छत्रपती शाहु महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिपाली सावंत, क्रियाशील शिक्षिका, वर्धा👤 जादू पतंगे, वसमत👤 साईनाथ औरोड👤 दत्तात्रय देवकत्ते👤 योगेश गाडे👤 साईनाथ सावंत👤 सायारेड्डी चाकरोड, धर्माबाद👤 सुदर्शन कदम👤 रवींद्र शेळके👤 अभिषेक निगम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू ॥१॥ तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥२॥ सवेंचि झेपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥ भुकेलें वत्स रावें । धेनु हुंबरत धांवे ॥४॥ वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतित हरिणी ॥५॥ नामा म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तैसा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाजार कोणताही असो तेथे कोणतीच वस्तू फुकट मिळत नाही. व कोणी फुकटात देत नाही. कारण देणे आणि घेणे हा व्यवहार असतो. पण,जे खऱ्या अर्थाने घरीच फुकटात मिळते ती मिळणारी आशीर्वाद नावाची संपत्ती कधीच संपत नाही अशी महान संपत्ती मिळविण्यासाठी पैसे देऊन व्यवहार करावा लागत नाही तर आपुलकीने काळजी घ्यावी लागते व नि:स्वार्थ भावनेने सेवा करावा लागतो. असे पुण्य कार्य करण्याचा योग ज्याच्या जीवनात येते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने महान असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○ यशप्राप्ती ○**● एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो आणी म्हणतो. अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील. तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.*तात्पर्य :- कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही.*सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment