✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑक्टोबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/TNkhMx7DoyJkG68F/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन_* ☣️ •••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील २९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.**१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी.दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर**१९६४: फ्रेन्च लेखक,कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.**१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.**१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.*☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: परिणीती चोप्रा -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९७४: डॉ. मोनाली पोफरे -- कवयित्री, लेखिका* *१९६७: किटू गिडवानी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल* *१९६५: सतीश तारे --- विनोदी अभिनेते व रंगकर्मी ( मृत्यू: ३ जुलै २०१३ )**१९६४: विजयराज बोधनकर -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६४: अमित शाह -- केंद्रिय गृहमंत्री**१९६३: पंडित कैवल्य कुमार गुरव-- भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे (गायन शैली) तिसऱ्या पिढीतील गायक**१९६३: भीमराव ईश्वरा धुळुबुळू -- कवी, लेखक* *१९६२: सुभाष उसेवार विश्वकर्मा -- कवी, लेखक**१९५९: सूर्यकांत मारुती जुगदर -- लेखक**१९५८: उर्मिला सुधीर सावंत --- लेखिका**१९५७: डॉ. अमृत राघवेंद्र यार्दी-- प्रसिद्ध लेखक, अनुवादक* *१९५२: किशोर त्र्यंबक पाठक -- प्रसिद्ध कवी (मृत्यू: २१ मार्च२०२० )**१९४७: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक**१९४६: शारदा अशोक शिंत्रे -- लेखिका**१९४५: अशोक वासुदेव परांजपे -- लेखक**१९४२: हिमांशू वामन कुलकर्णी -- कवी**१९४२: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ )**१९४०: वंदना विनायक पोंक्षे -- लेखिका* *१९३७: कादर खान -- भारतीय अभिनेता, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माता (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१८ )**१९३५: डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डी. वाय. पाटील) -- बिहार राज्याचे माजी राज्यपाल, प्रसिद्ध शिक्षणसंस्थानिक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९३२: सरयू विनोद दोशी -- भारतीय कला अभ्यासक, कला इतिहासकार, शैक्षणिक आणि क्युरेटर**१९२२: गोविंद सी.शनवारे -- लेखक* *१९२०: विजया अनंत नरवणे -- लेखिका* *१९२०: ब्रिज मोहन व्यास -- भारतीय अभिनेता (मृत्यू: ११ मार्च २०१३ )**१९०२: दीना नाथ मधोक -- १९४० ते १९६० च्या दशकातील बॉलीवूडमधील प्रमुख गीतकार (मृत्यू: ९ जुलै १९८२ )**१८७९: वामन दामोदर गाडगीळ -- कादंबरीकार, कथाकार (मृत्यू: ९ डिसेंबर १९७३ )**१८७३: तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत (मृत्यू: १७ आक्टोबर १९०६ )*☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: राम मुखर्जी -- बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक(जन्म: १८ ऑक्टोबर१९३३ )**२०००: अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह,सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती**१९९१: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक* *१९७८: नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४ )**१९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जाहिरात : एक चिंतन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, ओरिसा-बंगालमध्ये मुसळधार पावसाचाही इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ऊसतोड कामगार संघटनेचं महायुतीला थेट आव्हान, बीडसह राज्यातील 5 जागा लढविणार, संघटनेच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोन्याला पुन्हा झळाळी! 450 रुपयांनी महागलं, सणासुदीच्या काळात थेट 80 हजारांचा आकडा पार करणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीरम इंस्टिट्युटचे CEO अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये गुंतवणूक, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स विकत घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी; महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीसाठी आजचा मुहूर्त ठरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची शक्यता; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ?* 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*OTP - One Time Password*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख हे मानवतेच्या सौजन्यशील स्पर्शात आहे. अहंकारातून उद्भवलेल्या हर्षात नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण ठरल्या ?३) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?४) 'मकरंद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ज्युडो हा कुस्तीसारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ? *उत्तरे :-* १) विजया रहाटकर २) विजया रहाटकर ३) डॉ. सदानंद मोरे ४) मध ५) जपान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कविराज अमोल शिंदे👤 रमेश संदकर👤 पांडुरंग कुलकर्णी👤 बाबुराव कुंभरगावे👤 राम गुडे👤 मिलिंद इंगळे, वाशीम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥ आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजातील सर्वच माणसं वाईट असतात असेही नाही .त्यातील काही माणसं सुद्धा चांगले असतात. जी माणसं माणुसकीच्या नात्याने कोणतीही अपेक्षा न बाळगता गरजू व्यक्तींना ओळखून त्यांच्या कार्याची दखल घेतात व त्यांना मदत करतात.अशा व्यक्तींमुळे गरजूंना जगण्याला पुन्हा एकदा बळ मिळत असतो.अशा माणसांचा सदैव आदर करावा तसेच त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *मातेचा उपदेश*📗 *एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*सौजन्य - http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment