✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑक्टोबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/4QCLKQUzvZWkSn4Y/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_ या वर्षातील २९९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.**१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्यांदा मिळाले.**१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.*💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: प्रणिता सुभाष-- भारतीय अभिनेत्री**१९८८: कृतिका कामरा -- भारतीय अभिनेत्री**१९८७: उमेश यादव -- भारतीय क्रिकेटपटू**१९६०: माधव गरड -- ज्येष्ठ कवी, ललित लेखक (मृत्यू: १२ ऑगस्ट २०२२ )**१९५७: ध्रुबा घोष -- भारतीय शास्त्रीय संगीतकार और सारंगी वादक (मृत्यू: १० जुलै २०१७ )**१९५६: सोनी राजदान (भट ) -- अभिनेत्री* *१९५६: किरण विठ्ठलराव बडवे -- लेखक, कवी**१९५६: सलमा आगा -- गायिका आणि अभिनेत्री* *१९५४: अजित वसंत राऊळ -- कवी**१९५४: अरुण म्हात्रे -- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, गीतकार आणि निवेदक**१९५०: अरुण हरिभाऊ पुराणिक -- ज्येष्ठ सिने पत्रकार**१९४९: योगानंद बालारामजी टेंभुर्णे -- कवी, नाटककार, पत्रकार**१९४८: अनंत नरहर जोशी -- लेखक* *१९४५: अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका**१९४२: सूर्यकांत गरुड -- कवी* *१९४०: मोहन विष्णुपंत जोशी -- लेखक**१९३८: आदिनाथ कल्लापा कुरुंदवाडे-- ग्रामीण कथाकार* *१९३८: मृदुला गर्ग-- हिंदी लेखिका* *१९२६: डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर -- साहित्यसमीक्षक, मराठीत वैचारिक लेखन करणारे लेखक (मृत्यू: २५ मार्च २०१८ )* *१९२२: पांडुरंग नारायण कुळकर्णी -- प्राचीन मराठी वाड्:मयाचे संशोधक (मृत्यू: ३० जून २००३ )**१८८१: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: प्रा. डॉ.रुस्तुम अचलखांब -- मराठी लेखक व नाटककार (जन्म: १९४४ )* *२०१२: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५ )**२००९: कान्होपात्रा किणीकर -- विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री (जन्म: २ ऑक्टोबर१९३४ )**२००९: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३ )**२००३: कर्नल हेमू रामचंद्र अधिकारी -- भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ३१ जुलै १९१९ )**२००३: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(जन्म: १९ऑक्टोबर १९२० )**१९९९: सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक, कोशकार, लेखक (जन्म: २३ ऑगस्ट १९२२ )**१९८०: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – प्रसिद्ध शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१ )**१९५५: पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, (जन्म: २८ मे १९२१ )**१६४७: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई म्हणजे काय असते ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *न्यायमूर्ती संजीव खन्ना असतील देशाचे 51 वे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात काँग्रेसने पप्पू उर्फ तिरुपती कदम कोंडेकर यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पहिली यादी केली जाहीर, नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवडीमध्ये अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी, मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुरू पुष्यामृत च्या शुभ संध्येवर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करत विविध पक्षांच्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज भरले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुणे - दुसरा कसोटी सामना - वॉशिंग्टन सुंदरने सात विकेट घेत मोठा विक्रम केला नावावर, न्यूझीलंडला 259 धावावर रोखलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *चव कशी समजते?* 📙 एखादा पदार्थ जिभेवर ठेवला रे ठेवला की तात्काळ त्याची चव आपल्याला समजते. पण आपण ज्याला चव म्हणतो त्या चवीची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचवणाऱ्या स्वादांकुरात उष्णता, स्पर्श व वासाचे ज्ञान या सर्वांचा समावेश होतो. क्लोरोफॉर्मचा गोडसर वास हा प्रामुख्याने स्वादांकुर उत्तेजित झाल्यामुळेच येतो. सर्दी झाल्यावर अन्न बेचव लागते. वासाचे ज्ञान होत नसल्यामुळेच नाक दाबल्यास उकडलेला कांदा व सफरचंद यांची चव जवळपास सारखीच लागते. चवीमध्ये आपल्याला जाणवणारे सूक्ष्म फरक हे बर्याचदा या गोष्टींच्या वेगळ्या अशा वासामुळे असतात. अशी ही चव आपल्याला मुख्यत: जीभेवरील स्वादांकुरामुळे कळते. माणसाच्या जिभेवर सुमारे १०,००० स्वादांकुर असतात. गोड, आंबट, खारट व कडू या चार मुळ चवी आहेत. जीभेच्या टोकाला गोड व पाठीमागे कडू तर दोन्ही कडांना आंबट चव जास्त प्रमाणात जाणवते. खारट चव सर्व ठिकाणी समप्रमाणात, पण जिभेच्या टोकाला सर्वाधिक जाणवते. चव कळण्यासाठी पदार्थ लाळेत विरघळावा लागतो. विरघळलेले रेणू स्वादांकुरात शिरल्यावरच चव समजते. काच, स्टेनलेस स्टील, चांदी, सोने यांची चव ते विरघळत नसल्याने आपणास कळत नाही ते त्यामुळेच ! तसेच 'तिखट' ही चव नाही ! तर तिखट वस्तूंमधील आम्लामुळे होणारा तो एक 'दाह' म्हणता येईल. चवीच्या संदेशाचे वहन स्वादांकुरातून चेतातंतूमार्फत मेंदूतील चवीच्या केंद्रांपर्यंत होते तेव्हा चव समजते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*IFSC - Indian Financial System Code*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखाला वैराग्याचे विरजण घालणारे आणि दुःखरोगाला बरे करणारे औषध ग्रंथवाचन होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?२) सर्वोच्च न्यायालयाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली ?३) सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती ?४) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?५) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे ? *उत्तरे :-* १) २६ जानेवारी १९५० २) कलम १२४ ३) इंग्रजी ४) नवी दिल्ली ५) न्यायमूर्ती संजीव खन्ना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास नक्का, लातूर👤 गोविंद येळगे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 विजय वाठोरे सरसमकर👤 प्रथमेश मच्छरलावार👤 मारोती गुरलोड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥ अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥ अरे हा भावाचाअ लंपट । सांडुनि आलासे बैकुंठ ॥३॥ संतसंगतीं साधावा । धरूनि ह्रदयीं बांधावा ॥४॥ नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भलेही शुन्याची किंमत जास्त नसेल पण, एक जरी शुन्य त्यात नसल्यावर मात्र आकडेवारी पूर्ण होत नाही. तसेच एखादी व्यक्ती परिस्थितीने मागे असेल म्हणून त्याच्याकडील सर्वच काही संपलेच असेल असेही नाही. कारण त्या व्यक्तीकडे काहीच नसेल तरी ती, व्यक्ती परिस्थितीमुळे अधीक मजबूत बनलेली असते म्हणून एखाद्याची परिस्थिती बघून त्याला हिनवू नये.कारण जी व्यक्ती परिस्थितीतून घडली असते ती व्यक्ती धनसंपतीपेक्षा अनुभवाने सर्वात मोठी असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*📗 राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदी काठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्याआवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंचआवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवात्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’*तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment