✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑक्टोबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/NXcPubR2MDZcLpzU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_जागतिक गरिबी निर्मूलन दिन_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••🟫 *_ या वर्षातील २९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान**१९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर**१९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ.टी.जेकब जॉन यांना 'डॉ.शारदादेवी पॉल पारितोषिक’ जाहीर**१९७९: मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित**१९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४३: बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.**१९३४: ’प्रभात’चा ’अमृतमंथन’ हा चित्रपट पुण्याच्या ’प्रभात’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.**१९३३: अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आला.**१९३१: माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.**१९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.**१८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: कीर्ती सुरेश -- भारतीय अभिनेत्री**१९८०: धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर -- लेखक संपादक* *१९७७: संदीप बोडके -- पत्रकार (उपसंपादक), कवी, गझलकार, लेखक**१९७४: धारा भांड-मालुंजकर -- लेखिका* *१९७३: सुनील वामन कुमरे -- कवी, लेखक**१९७०: अनिल कुंबळे – भारतीय माजी क्रिकेटर, लेग स्पिनर गोलंदाज* *१९६८: देवदत्त बोरसे -- कवी**१९६७: संजय श्रीपाद देशपांडे -- लेखक**१९६६: दशरथ यशवंत झनकर -- कवी, लेखक**१९६५: संजय सुरिंदर कपूर -- भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता**१९६५: अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचा क्रिकेटसंघाचा माजी कप्तान**१९६१: डॉ. राजेश रामचंद्र देशपांडे -- कवी, लेखक, व्याख्याते**१९५७: अशोक श्रीपाद भांबुरे --- कवी**१९५५: प्रा. डॉ. व्यंकटेश रा .जंबगी -- कवी, लेखक* *१९५५: स्मिता पाटील – सुप्रसिद्ध अभिनेत्री. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ )**१९५३: शैला दिगंबर गिरनारकर -- कवयित्री* *१९५२: पुरुषोत्तम रोहणकर -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार* *१९५१: प्र. द. जोशी -- कवी, बालसाहित्यिक* *१९४७: डॉ. बा. ह. कल्याणकर -- कवी, लेखक, संपादक, विचारवंत* *१९४७: जयश्री रवींद्र देशपांडे -- पाकक्रिया या विषयांवर लिखाण करणाऱ्या मराठी लेखिका**१९४७: सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका**१९४६: अरुणा राजे पाटील -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि संपादक**१९३२: प्राचार्य प. सी. काणे -- लेखक, विचारवंत* *१९३२: जयराम कुलकर्णी -- भारतीय मराठी -भाषेतील चित्रपट अभिनेते (मृत्यू: १७ मार्च २०२० )**१९३१: डॉ.शरद कोलारकर -- विदर्भातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (मृत्यू: ७ फेब्रुवारी २०१४ )* *१९१७: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४ )**१८९२: नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार,(मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८ )**१८९०: अनंत हरी गद्रे -- नाटककार, संपादन (मृत्यू: ४ सप्टेंबर १९६७ )* *१८६९: ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक,बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू,’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू: ८ एप्रिल १९२२ )**१८१७: सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ,समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (मृत्यू: २७ मार्च १८९८ )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: प्रा. डॉ. विलास वसंत खोले -- ज्येष्ठ लेखक-समीक्षक व संपादक (जन्म: ५ डिसेंबर १९४४ )**२०१७: केशव जगन्नाथ पुरोहित (शांताराम)-- सुप्रसिद्ध साहित्यिक,सन १९८९मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले (जन्म: १५ जून १९२३ )* *२००८: रविन्द्र पिंगे – ललित लेखक (जन्म: १३ मार्च १९२६ )**१९९३: विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व पटकथालेखक (जन्म: १२ मे १९०७ )**२००८: शामराव कांबळे -- प्रख्यात आणि उत्कृष्ट संगीत संयोजक, संगीतकार (जन्म: १६ एप्रिल १९२६ )**१९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली (जन्म: २२ आक्टोबर १८७३ )**१८८७: गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ मार्च १८२४ )**१८८२: दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार,ग्रंथकार व धर्मसुधारक,संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (जन्म: ९ मे १८१४ )**१७७२: अफगणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) याचे निधन. अहमदशाहने ’दुर्र-इ-ईरान’ असा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या ’दुर्रानी’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक गरिबी निर्मूलन दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*मी गरीब नाही*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही शासनाकडून अनेक निर्णय जाहीर, निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर, विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी, लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *6 पिकांच्या हमीभावात वाढ, केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, तलवारीच्या जागी हातात संविधान, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा महत्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नायब सिंग सैनी होणार हरियाणाचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या बंगळुरू कसोटीत पावसाचाच खेळ, पहिला दिवस पाण्यात, बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आंधळे लोक कसे परीक्षा देतात ?* 📙अंध व्यक्ती आजकाल उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. पूर्वी मात्र ते शक्य नव्हते. कारण बघता येत नसल्याने अंध लोकांना ज्ञानाची सर्वा दालने बंद होती. सहाजिकच त्यांच्या जीवनात खर्या अर्थाने अंधार होता. अंध व्यक्ती दुसऱयांच्या उपकारावर, सहानुभूतीवर अवलंबून होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला संधी मिळत नव्हती. ब्रेलच्या संशोधनामुळे मात्र अंधांच्या जीवनात आशेच्या किरणांनी शिरकाव केला. अंध व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूपच चांगले असते. या स्पर्श ज्ञानाच्या कौशल्याचा वापरच ब्रेल लिपीत केला जातो. यात प्रत्येक अक्षर हे कागदावर उंचवट्याच्या (सुई टोचून केलेल्या) स्वरूपात लिहिले जाते. या उंचवट्यांची संख्या, रचना स्पर्शाने लक्षात घेऊन अंधांना अक्षर ओळख करून घेता येते. याला ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने अंधांना ज्ञानाच्या विविध दालनात प्रवेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता आपल्याला पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंध व्यक्ती दिसतात.अंध व्यक्तींना सहानुभूती वा दयेपेक्षा संधी मिळण्याची गरज आहे. त्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढवण्याचे काम ब्रेल लिपीने केलेले आहे. साहजिकच अंध लोक इतरांच्या बरोबरीने विकास साधू शकत आहेत. ब्रेल लिपीच्या आधारेच अंध व्यक्ती परीक्षा देतात. अशी ही ब्रेल लिपी जणू अंधांसाठी वरदानच ठरली आहे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*MMS - Multimedia Messaging Service*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहण यात जीवनाची सार्थकता आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंबेची आराधना करण्यासाठी गरबा दांडियाला सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरूवात झाली ?२) टेनिस विश्वात कोणत्या तीन दिग्गजांना *बिग थ्री* म्हटले जाते ?३) पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा काढूनही एका डावाने पराभव पत्करणारा क्रिकेट विश्वातील पहिला संघ कोणता ?४) 'भेकड' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या साली झाली ? *उत्तरे :-* १) गुजरात २) सर्बियाचा नोवाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ३) पाकिस्तान ४) भित्रा, भ्याड, भीरू ५) २७ सप्टेंबर १९२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चेतन भैराम, भंडारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक देशोन्नती 👤 निंबा पाटील👤 गजानन बापूराव भोसकर👤 धनराज भुमरे👤 अनिकेत कदम👤 विकास गायकवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥ कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान सर्वांना हवे असते. पण,सत्य बोलणाऱ्याच्या जीवनात मात्र पदोपदी काट्यांनी भरलेली वाट समोर असते.त्याच वाटेवरून ती व्यक्ती जेव्हा मनात हिंमत ठेवून प्रवास करते त्यातच त्याला खरे समाधान आणि सुख मिळत असते.कारण, आयते मिळालेल्या सुख, समृद्धी पेक्षा संघर्ष करून जे,काही मिळालेले असते ते, खऱ्या अर्थाने अनमोल असते. म्हणून सत्याच्या वाटेवर चालूनच मिळवावे भलेही त्रास झाले तरी चालेल जे, काही मिळालेले असते ती संपत्ती कधीच मिटत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇ मूर्ख डोमकावळा ◇◇एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''तात्पर्य - काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment