✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑक्टोबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/WoXWLyhTF9v2LYR8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_ या वर्षातील २९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान**१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.**१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.**१९४३: आझाद हिंद सरकारने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले**१८९०: हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.**१७०१: इंग्लंडच्या पार्लमेंटचे सर्वात पहिले अधिवेशन*🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: आशिष आत्माराम वरघणे -- लेखक* *१९८९: जोनिता गांधी -- भारतीय वंशाची कॅनेडियन गायिका**१९८३: जोगिंदर शर्मा -- माजी क्रिकेटपटू**१९८१: सिद्धार्थ रामचंद्र जाधव- प्रसिद्ध मराठी चित्रपटांतील अभिनेता* *१९७९: उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू -- भारतीय अभिनेता**१९७६: अभयकुमार कुलकर्णी-- लेखक**१९७३: मलायका अरोरा -- भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल**१९७२: एकनाथ नरहरी आव्हाड -- प्रसिद्ध बालसाहित्यिक**१९७१: पद्माकर मधुकर जोंधळे --- कवी**१९७०: शिखा स्वरूप -- भारतीय अभिनेत्री**१९६९: देवेंद्र धोंडीराम उबाळे -- कवी, लेखक**१९६७: प्रा. डॉ. उल्हास सुधाकर मोगलेवार -- लेखक, संपादक**१९६३: गणेश विसपुते -- कवी, लेखक* *१९६२: अपर्णा कल्लावार -- कवयित्री, लेखिका**१९६०: नीरजा -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५५: विलास माणिकराव रणभुसे -- लेखक, संपादक* *१९५४: मगणलाल माणकचंद बागमार -- लेखक**१९४५: शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६ )**१९४०: डॉ. श्रीकांत व्यंकटेश मुंदरगी -- लेखक* *१९४०: एड्सन अरांतेस दो नासिमेंतो तथा पेले -- ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू( मृत्यू:२९ डिसेंबर २०२२)**१९३९: रमेश भिकाजी तांबे -- लेखक (मृत्यू: १० जून १९९७ )**१९३७: देवेन वर्मा -- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता(मृत्यू: २ डिसेंबर २०१४ )**१९२९: मनोहर महादेव देशपांडे -- वैदर्भीय कवी (मृत्यू: २५ डिसेंबर २००५ )**१९२९: डॉ. नरेंद्रनाथ बळीरामजी पाटील-- लेखक**१९२४: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार,गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९ )**१९२३: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००० )**१९२३: भैरोसिंग शेखावत -- भारताचे अकरावे उपराष्ट्रपती( मृत्यू: १५ मे २०१०)**१८९८: राधाबाई पांडुरंग आपटे -- लेखिका**१८७९: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:मंगला अच्युत बर्वे -- मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका ( जन्म: १९२७)* *२०१२: सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४ )**२००१: आत्माराम पांडुरंग नारायणगावकर -- गायक व लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १९१७ )**१९२१: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)**१९१५: डब्ल्यू.जी.ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८ )**१९१०: चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नासा येवतीकर लिखित " ललाटरेषा " या पुस्तकाचे पुण्यातील जेष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी करून दिलेला परिचय ..... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंगोलीत विधानसभा निवडणुकीची तयारी:पहिल्याच दिवशी 153 उमेदवारी अर्जांची विक्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्वीप कार्यक्रम अंतर्गत राज्यभरात मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेच्या पुण्यातील घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *युएईला हरवून भारत आशिया चषकाच्या सेमी फायनलमध्ये दाखल, अभिषेक शर्माचे २० चेंडूंत तुफानी अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*LOC - Line of Control*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर , प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवला पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोबीचे वाळवंट हे कोणत्या देशात आढळतात ?२) रक्ताचे चार गट कोणी शोधून काढले ?३) CAT चा फुल फार्म काय आहे ?४) 'मलूल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सुनील दत्त यांचे खरे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) चीन २) डॉ. कार्ल लँडस्टायनर ( इ. स. १९०० ) ३) Common Admission Test ४) निस्तेज ५) बलराज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एकनाथ आव्हाड, कवी व साहित्यिक, मुंबई👤 प्रविण राखेवार, नांदेड👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 अभिषेक नागुल, नांदेड👤 ईश्वर डहाळे, नांदेड👤 व्यंकटेश येमेवार, धर्माबाद👤 स्वरदा खेडेकर गावडे👤 पंकज बदाने, शिक्षक, नंदुरबार👤 नरेंद्र रेड्डी चाकरोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥ जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥ विषयीं आसक्त भ्रांत माझें मन । कैसें तुझें भजन घडेल मज ॥३॥ नामा म्हणे आतां जाणसी तें करीं । पतितपावन हरि नाम तुझें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जोपर्यंत भाजीला परतवून घेतले जात नाही तोपर्यंत भाजी चांगल्याप्रकारे शिजत नाही. तसेच आपल्या चालू असलेल्या कामात अडथळे किंवा अडचण निर्माण होणार नाही तोपर्यंत आपले काम सुद्धा आपल्याला फारसं कळणार नाही. म्हणून जेवढे अडथळे, अडचणी येतील तेवढे बिनधास्तपणे येऊ द्या. अडचणीतूनच माणूस शिकत असतो. त्यांचे डावलण्याचे काम आहे. कारण त्यांच्यामुळेच आपली जगावेगळी ओळख होत असते. फुलांवर चाललेल्यांना काट्यांची जखम कशी असते ? ती माहीत नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❒ ❒ कृतघ्नता ❒ ❒* *_एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे._* *_अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला._* *_रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले._* *_हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्या पडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला...,_* *_‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’_**तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment