✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑक्टोबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/8jbiBQMXDeEGkZbR/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_पोलीस हुतात्मा स्मृती दिन_* 🟨••••••••••••••••••••••••••••••••🟨 *_ या वर्षातील २९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर**१९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.**१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.**१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.**१९५१: डॉ.शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.**१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.**१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना**१९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.**१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟨 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५: भावना बलसावर -- भारतीय चित्रपट, रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७४: शुभांगी सुनील सरोदे -- कवयित्री* *१९७४: राजेंद्र प्रल्हाद दिघे -- कवी, लेखक**१९७०:कमल सदाना -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि निर्देशक* *१९६८: प्रतिभा जगदाळे -- कवयित्री, लेखिका**१९६०: डॉ.रत्नाकर देवरावजी भेलकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५५: बाबू फिलिप डिसोझा ( कुमठेकर) -- प्रसिद्ध कवी* *१९५३: प्रा. डॉ. दाणा सदाशिव गजघाटे -- लेखिका**१९५२: डॉ. विश्वेश्वर भालचंद्र सावदेकर -- ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान**१९४६: मच्छिंद्रनाथ तुकाराम वाटेकर -- कवी, कादंबरीकार, कथाकार* *१९४४: मुझफ्फर अली -- भारतीय चित्रपट निर्माता, फॅशन डिझायनर, कवी व कलाकार**१९४४: कुलभूषण खरबंदा -- हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतून भूमिका करणारे अभिनेते**१९४१: उषा धर्माधिकारी-- लेखिका**१९४०: एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू**१९३९:माधव वझे -- आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट**१९३१: शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११ )**१९२३: श्री वामनराव पै -- महान समाजसुधारक, तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक (मृत्यू: २९मे २०१२ )**१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले.(मृत्यू: २३ एप्रिल २००१ )**१९१७: राम फाटक – गायक व संगीतकार, लेखक (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२ )**१८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६ )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२ )**१९९८: हामिद अली खान(अजित ) -- रंगभूमीवरील व चित्रपटातील "अजीत" या नावाने ओळखले जाणारे एक हिंदी अभिनेता (जन्म: २७ जानेवारी १९२२ )**१९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५ )**१९८२: नरेंद्र बेदी -- बॉलीवूड दिग्दर्शक आणि लेखक(जन्म: १९३७ )**१९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ )**१९३९: दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी -- मराठी कवी (जन्म: १६ सप्टेंबर,१८८७ )**१८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५ )**१४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाणी जीवन आहे*कोणतेही काम म्हटले की पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पाण्याशिवाय कोणताही सजीव जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. एवढं पाणी महत्वाचे आहे. तरी देखील बहुतांश ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसून येते ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्जाची होणार स्वीकृती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह मशालमध्ये बदल, निवडणूक आयोगाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद - लोकसहभागातून शाळांमध्ये बसवले 200 सीसीटीव्ही, शाळांतील लाखो विद्यार्थी झाले सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपूर - प्रसिद्ध व्हायोलिन वादक म्हैसुर मंजुनाथ राष्ट्रीय अध्यक्षपदी, संस्कार भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यादरम्यान सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी; न्यूझीलंडने 1988 नंतर प्रथमच भारतात मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *घड्याळाचे काटे डावीकडून उजवीकडेच का फिरतात ? ⏰*अलीकडे आलेली केवळ आकड्यांनी वेळ दाखवणारी डिजिटल घड्याळं सोडली तर इतर घड्याळांमध्ये तास काटा, मिनिट काटा असे दोन काटे असतातच. काहींमध्ये तर तिसरा सेकंद काटाही असतो. हे सगळे काटे डावीकडून उजवीकडे फिरत असतात. आता ते सतत गोलाकारच फिरत असल्यामुळे या प्रकारच्या प्रदक्षिणेला घटीवत आणि त्याच्या उलट उजवीकडून डावीकडे फिरण्याला अवघटीवत असं म्हटलं जातं.म्हणा काहीही, पण प्रश्न उरतोच. हे काटे डावीकडून उजवीकडेच का फिरतात ते उलट्या दिशेनं फिरले तर वेळ दाखवू शकणार नाहीत, असं थोडंच आहे. तासांचे व मिनिटांचे आकडे तबकडीवर उलट्या दिशेनं दाखवले म्हणजे काम झालं पण तसं होताना दिसत नाही. मग याचं कारण काय असेल खरं तर ती एक प्रथा आहे. काळ मोजायला सुरुवात केली गेली तेव्हा असणाऱ्या व्यवस्थेची ती एक राहिलेलीखूण आहे.आपण दिवसाची सुरुवात सूर्योदयाबरोबर झाली असं मानतो. त्यानंतर किती काळ उलटून गेला आहे, हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा वाळूचं घड्याळ तयार करण्यात आलं पण त्याच्या मदतीनं संपूर्ण दिवसाचं कालमापन करायचं तर अगडबंब घड्याळ तयार करावं लागलं असतं. तेव्हा मग गावाच्या मध्यभागी एक उंचच उंच खांब उभा करून त्याची सावली मोजण्याची कल्पना लढवली गेली. हे खांब वरवर जाताना निमुळते होत गेलेले असत. इजिप्तमध्ये पहिल्यांदा त्यांचा वापर करण्यात आला. त्यांना ओबेलिस्क असं म्हणत. आपण त्याला ‘कालमनोरा' म्हणू शकू.सूर्योदयाच्या वेळी त्याची सावली लांबलचक पसरलेली असे पण जसजसा सूर्य वर येऊ लागे तसतशी त्या सावलीची लांबी कमी कमी होत माध्यान्हीच्या वेळी तर ती त्या खांबाच्या पायथ्याशीच घुटमळत राही. सूर्य कलू लागला, की परत त्या सावलीची लांबी वाढत वाढत सूर्यास्ताच्या वेळी ती लांबलचक होई. सावलीच्या लांबीवरून मग किती काळ उलटला आहे, हे मोजता येई.या ओबेलिस्कच्या कल्पनेचाच वापर करून मग छोट्या तबकड्यांची, सहज आपल्याबरोबर नेता येतील अशा धातूच्या तबकड्यांची घड्याळं तयार करण्यात आली. त्यात गोलाकार तबकडीच्या मध्ये एक त्रिकोणी पट्टी बसवलेली असे. तिच्या सावलीच्या लांबीवरून वेळ मोजण्यात येई. हिला ‘सूर्यतबकडी असं म्हणत. सूर्य पूर्वेला उगवत असल्यानं खांबाची सावली पहिल्यांदा पश्चिमेच्या बाजूला पडे. मग दिवसभरात तिचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होत असे. आता नकाशात आपण पश्चिम दिशा डावीकडे दाखवतो. म्हणजेच त्या सावलीचा प्रवास हा डावीकडून उजवीकडे असा होत असे. दिवसातली वेळ टळण्याचा आणि सावलीचा प्रवास डावीकडून उजवीकडे होण्याचा संबंध डोक्यात इतका पक्का भिनला होता, की मग काट्यांची घड्याळं तयार केली गेली तेव्हा त्या काट्यांचा प्रवासही असाच डावीकडून उजवीकडे होईल, अशी व्यवस्था केली गेली. कालगणनेच्या इतिहासाची ती अशी एक पाठी राहिलेली निशाणीच आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*LED - Light Emitting Diode*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) शांघाय सहकार्य परिषदेची स्थापना केव्हा झाली ?४) 'मनसुबा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ? *उत्तरे :-* १) पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ २) उमर अब्दुल्ला ३) १५ जून २००१ ( शांघाय, चीन ) ४) बेत, विचार ५) नायब सिंह सैनी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाबू फिलिप डिसूझा, साहित्यिक, निगडी, पुणे👤 विष्णुदास शिंदे👤 कोमल सिंग👤 नरेश बलकेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥ उपमन्या आळी तुवां पुरविली । अढळपदीं दिल्ही वस्ति धरुवा ॥३॥ नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडूरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्ती सोबत चांगले बोलून सुद्धा तसेच त्याचे कितीही चांगले करून, सावरूनही त्याचे समाधान होत नसेल तर ती व्यक्ती, कुठेही जाऊन समाधानी राहू शकत नाही. त्यात आपला काहीही दोष नसतो. कारण एखाद्या व्यक्तीची मनस्थिती जर त्याप्रकारची बनली असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. म्हणून कोणाचे बोलणे जास्त मनावर घेऊ नये व उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपले कर्तव्य आहे ते, करत रहायचे. चांगले काय असते आणि वाईट काय असते सर्व काही ती शेवटी वेळच ठरवत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📗वक्ता आणि श्रोते📗**एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment