✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 ऑक्टोबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18v6B67pNbf5QsB6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚥 *१५ ऑक्टोबर २०२४* 🚥 🔶🔶 *_दिनविशेष_* 🔶🔶 ••••••••••••••••••••••••••••••••📚 *_जागतिक विद्यार्थी दिवस_* 📚•••••••••••••••••••••••••••••••••📚 *_ वाचन प्रेरणा दिन_* 📚 📚 *जागतिक हात धुवा दिवस* 📚•••••••••••••••••••••••••••••••••📚 *_ या वर्षातील २८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 📚 *_महत्त्वाच्या घटना:_* 📚•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या ’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ’बुकर पुरस्कार’ मिळाला.**१९९३: वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन,दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्नांबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू.डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर**१९३५: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले.जे.आर.डी.टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन ’एअर इंडिया’ ही कंपनी अस्तित्त्वात आली.**१९१७: पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.**१८८८: गोपाळ गणेश आगरकराच्या ’सुधारक’ पत्राची सुरूवात* 📚 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📚••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: दिगंगना सूर्यवंशी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री, गायिका आणि लेखिका**१९७३: सूर्यकांत संभाजी ससाने-- कवी, लेखक* *१९६४: डॉ. वैजयंती पेशवे -- लेखिका* *१९६३: प्रा. डॉ. मनोज तायडे -- लेखक**१९६१: गौतम विश्वनाथ दारुंडे -- कवी, लेखक* *१९५७: मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका**१९५३: शशिकांत राजाराम मोरे -- नाट्य लेखक**१९५३: विवेक शंकर लागू-- मराठी नाटककार आणि नाट्यअभिनेते, लेखक**१९५१: अरविंद पांडुरंग उत्तखेडे -- कवी, लेखक* *१९५०: मधुकर धाकराव -- कवी, लेखक* *१९४९: प्रणोय रॉय – पत्रकार,एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक**१९४७: के. व्ही. सरवदे -- लेखक, कवी* *१९४७: श्याम फरांदे -- लेखक, अनुवादक**१९४७: छगन चंद्रकांत भुजबळ -- अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन**१९४५: डॉ. किसन गोपाळराव राऊत -- कवी, लेखक**१९४३: डॉ. भिमा शिवय्या स्वामी -- वीरशैव संत साहित्याचे अभ्यासक व कादंबरीकार**१९४२: इम्तियाज खान -- भारतीय अभिनेता ( मृत्यू: १५ मार्च २०२० )**१९३९: डॉ. गोविंद नारायण देशपांडे -- लेखक, समीक्षक, संपादक (मृत्यू: १० नोव्हेंबर २०१६ )**१९३६: मदनलाल खुराणा -- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१८ )**१९३६: डॉ.चंद्रकांत अंबादास धांडे -- ज्येष्ठ नाट्य समीक्षक,दलित मित्र पुरस्कार प्राप्त प्रख्यात लेखक(मृत्यू: २ डिसेंबर २०१५ )* *१९३४:एन.रामाणी – कर्नाटिक शैलीचे बासरीवादक(मृत्यू:९ ऑक्टोबर २०१५)**१९३३: रागिणी विद्याधर पुंडलिक -- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: ६ मे २०१९ )**_१९३१: अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती,एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक,पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार,पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०),भारतरत्न(१९९७) (मृत्यू: २७ जुलै २०१५ )_**१९२६: नारायण गंगाराम सुर्वे – सुप्रसिद्ध कवी (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१० )**१९२४: गोपाळ रामचंद्र जोशी -- मराठी नाट्यसमीक्षक (मृत्यू: २१ ऑक्टोबर २००५ )**१९२१: प्रा. दिनेश दत्तात्रेय माहुलकर -- लेखक* *१९२०: मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (मृत्यू: २ जुलै १९९९ )**१९१७: गजाननशास्त्री सदाशिवशास्त्री मुसळगावकर -- संस्कृत पंडित, लेखक (मृत्यू: २००९ )**१९०८: जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन- अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ एप्रिल २००६ )**१९०६: प्रा. शंकर गणेश दवणे -- लेखक* *१८८१: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५ )**१६०८: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (मृत्यू: २५ आक्टोबर १६४७ )* 📚 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📚••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: फारुख जाफर -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९३३ )**२००२: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (जन्म: ६ डिसेंबर १९२३ )**२००७: मीरा देव बर्मन -- भारतीय बंगाली गीतकार आणि संगीतकार (जन्म: मार्च १९२३ )**१९६१: सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक.त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले.(जन्म: २१ फेब्रुवारी १८९६ )**१९४६: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (जन्म: १२ जानेवारी १८९३ )**१९३०: हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती (जन्म: २६ फेब्रुवारी १८६६ )**१९१७: माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका,सौंदर्यवती व गुप्तहेर (जन्म: ७ ऑगस्ट १८७६ )**१७८९: रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती,निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश (जन्म: १७२० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचन प्रेरणा दिवस त्यानिमित्ताने लेख *वाचाल तर वाचाल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलून पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ केले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यपाल नियुक्त आमदारांची सात नावाची यादी सादर, पंकज भुजबळ यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यतील 23 अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती, शिंदे सरकारच्या शिफारशी नंतर केंद्रातून आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पाच वर्षात महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट, एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ **मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनौमध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात अभिमन्यू ईश्वरनने यूपीविरुद्ध शानदार चौथे शतक झळकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌥 उंचावरची हवा थंड का असते ? 🌥आपण सहसा पाहतो, की थंड हवेच्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून जास्त असते. जसजशी ही उंची वाढते तसतसं तिथलं हवामानही त्याच्याजवळच, पण कमी उंचीवर असलेल्या ठिकाणाहून अधिक थंड होतं. आपल्या ओळखीच्या महाबळेश्वरचंच उदाहरण घ्या ना. सहय़ाद्रीच्या माथ्यावर ते वसलेलं आहे. त्याच डोंगरकड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाईपासून त्याचं अंतर केवळ काही किलोमीटरचंच असेल; पण वाईचं तापमान उष्ण, तर महाबळेश्वरचं थंड असतं. सगळीकडेच आपल्याला असा अनुभव येतो. साहजिकच उंचावरची हवा थंड का असते, असा सवाल मनात उभा राहतो.त्याचं उत्तर दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणधर्मात दडलेलं आहे. कोणत्याही वायूवर असणारा दाब आणि त्याचं तापमान त्याचं सरळ नातं असतं. वायूवरचा दाब जास्त असेल तर त्याचं तापमानही वाढीव असतं. उलटपक्षी जर तो दाब कमी असेल तर तापमानही घटलेलं असतं. सायकलच्या चाकात जेव्हा हवा भरण्यासाठी आपण पंपातला दाब वाढवतो तेव्हा त्या हवेचं तापमान वाढत जातं. ती तापलेली असते. परिणामी, तो पंपही तापतो; पण त्याच टायरमधून आपण हवा सोडून तिला दाब कमी केला की त्याचं तापमान उतरतं.रेफ्रिजरेटरमध्ये वायूच्या याच गुणधर्माचा वापर केलेला असतो. त्या यंत्रांमध्ये फ्रिऑन नावाचा वायू भरलेला असतो. जेव्हा तो रेफ्रिजरेटरच्या बाहेर असतो तेव्हा त्याच्यावर दाब देऊन त्याच्यातील उष्णता का काढून टाकली जाते. तो जेव्हा रेफ्रिजरेटरच्या आत असतो तेव्हा त्याच्यावरचा दाब कमी करत तो थंड केला जातो. त्यामुळे आतली उष्णता त्याच्याकरवी शोषली जाते व ती बाहेर का टाकली जाते. हवा ही अशीच निरनिराळ्या वायूंची बनलेली असते, त्यामुळे तिच्या ठायीही वायूंचा हाच गुणधर्म प्रस्थापित होतो. उंचावरची हवा विरळ असते, त्यामुळे तिथला हवेचा दाबही कमी असतो. लडाखसारख्या अतिशय उंचीवरच्या ठिकाणी गेल्यावर लवकर थकवा येतो, याचं कारणही हेच आहे. तिथली हवा इतकी विरळ आणि त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण इतकं कमी असतं की आपल्या नेहमीच्या श्वासोच्छवासातून हवा तितका ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. इतक्या विरळ हवेचा दाबही साहजिकच कमी असतो. त्यापायी त्या हवेचं तापमानही घसरतं. अशा ठिकाणच्या जवळच, पण समुद्रसपाटीपासून फारश्या उंचीवर नसलेल्या ठिकाणची हवा विरळ नसते. ती तुलनेने दाट असते. त्यामुळे तिचा दाबही जास्त असतो. साहजिकच त्या हवेचं तापमानही जास्त असतं. उंचावरच्या ठिकाणाइतकं थंड नसतं. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*RTE - Right To Education*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा, तो स्वर्गाचे फुल बनवतो. - रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) २०२४ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) २०२४ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?४) २०२४ चा साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?५) २०२४ चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) व्हिक्टर अम्ब्रोस व गरी, अमेरिका २) जॉन जे. हॉपफिल्ड व जेफ्री ई. हिंटन ३) डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस व जॉन एम. जम्पर ४) हान कांग, दक्षिण कोरिया ५) निहोन हिदानक्यो, अध्यक्ष ( जपानची संस्था )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोहन भुसेवार, शिक्षक, नांदेड👤 फारुख शेख, शिक्षक, लोहा👤 संजय कदम, चिकना👤 पृथ्वीराज राहेरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी । पावनत्व प्रौढी नाम तुझें ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांवा त्वां घेतली गजेद्रासी ॥२॥ उपमन्यालागीं आळी पुराविली । अढळपदीं दिधली वस्ती ध्रुवा ॥३॥ नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडुरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःला कधीच कमी लेखू नये असे अनेकजण म्हणतात हे चांगल्यासाठी आहे. पण,दुसऱ्याला सुद्धा एवढेही कमी लेखू नये की, तीच वृती आपल्यात निर्माण होईल एकदा या प्रकारची वृती निर्माण झाली की, त्यातून अनेक बिमाऱ्या जन्माला येतात आणि त्यांचा प्रसार होतो.अशा बिचाऱ्या घातक ठरत असतात.म्हणून स्वतःला ही कमी लेखू नये व दुसऱ्याला सुद्धा कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. कारण एक, एक सेंकदाला वेळ बदलत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇● धनाचा विनियोग ●◇◇एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता. कोल्ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.'' नाग म्हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्हा पुन्हा म्हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्हणाला,'' कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,'' मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''तात्पर्य - ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा नाही.सौजन्य - https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment