✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑक्टोबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*नवरात्र विशेष माहिती - कोल्हापूरची महालक्ष्मी*Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/mahalaksami.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_जागतिक अंतराळ सप्ताह_* 🟢 🟢 *_जागतिक प्राणी दिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.**१९५७: सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.**१९५९: सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.**१९४३: दुसष,रे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.**१९४०: ’ब्रेनर पास’ येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.**१९२७: गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.**१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: रिषभ पंत -- प्रसिद्ध भारतीय क्रिकेट खेळाडू* *१९९४: गौतम राजू ढोके -- कवी* *१९८४: कस्तुरी देवरुखकर -- लेखिका, कवयित्री**१९८२: डॉ.ज्ञानेश चत्रभुज पाटील -- कवी**१९७८: कृष्णा किंबहुणे -- लेखक, अनुवादक**१९७५: संगीता उत्तमराव भांडवले -- कवयित्री लेखिका**१९७४: डॉ. नरेंद्र बापुजी खैरनार -- कवी, लेखक**१९७२: डॉ. तृप्ती बोरूळकर -- कवयित्री, लेखिका**१९७२: किरण घनश्याम पिंपळशेंडे -- कवयित्री**१९६७: शशिकांत शिंदे -- कवी* *१९६७: प्रा. डॉ. भूषण रामटेके -- कवी, लेखक**१९६०: मंगला रूपसिंग राजपूत-- कवयित्री**१९५६: अशोक भिंगार्डे -- कवी**१९५२: शैलेंद्र सिंग-- भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता**१९५१: मुकुंद मोरेश्वर टाकसाळे -- विनोदी लेखन करणारे लेखक**१९५१: माधवी मुद्गल -- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना**१९५०: प्रा. डॉ. कल्पना सुरेश व्यवहारे -- लेखिका (मृत्यू: २०१४)**१९४९: छगनलाल फौजी पंचे -- कवी* *१९४८: विजय वसंतराव पाडळकर- समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार**१९४४: गुफी पेंटल वालिया -- भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक (मृत्यू: ५ जून २०२३ )**१९४२: पुष्पा चंद्रकांत देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१९४१: सरदार अंजुम-- भारतीय कवी, शायर आणि तत्त्वज्ञ, लेखक (मृत्यू: १० जुलै २०१५ )**१९४०: माधुरी वासुदेव चौकीदार -- लेखिका, कथाकार* *१९३७: सुधाकर विनायक जोशी -- लेखक* *१९३७: जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री**१९३५: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू: २१ जून १९८४ )**१९२८: ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक (मृत्यू: २७ जून २०१६ )**१९२२: सदानंद महादेव पेठे -- लेखक**१९१६: धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक**१९१४: मधुकर वासुदेव धोंड -- मराठी समीक्षक (मृत्यू: ५ डिसेंबर २००७ )**१९१३: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० आक्टोबर २००६ )**१९११: नारायण गजानन जोशी -- कवी, छंदःशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८६ )**१८२२: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ जानेवारी १८९३ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: विजय नाफडे -- दुर्मीळ हिंदी चित्रपट गीतांचे संग्राहक आणि अभ्यासक**१९८९: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म: २३ आक्टोबर १९२४ )**१९८२: सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(जन्म: १६ आक्टोबर १९०७ )**१९७६: वासुदेव वामन भोळे -- कथाकार, नाटककार,नाट्यसमीक्षक (जन्म: ३० सप्टेंबर १८९३ )**१९६६: अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (जन्म: १ डिसेंबर १९११ )**१९४७: मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म: २३ एप्रिल १८५८ )**१९२१: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(जन्म: ९ ऑगस्ट १८९० )**१६६९: रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म: १५ जुलै १६०६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला**राजमाता जिजाऊ भोसले*भारताच्या वीर माता जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याजवळील निजामशाहच्या सिंदखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधवराव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाबाईंना लहानपणी जिजाऊ म्हणून संबोधले जायचे. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळे जिजाबाईंचा विवाहही अगदी लहान वयातच झाला होता. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. शहाजी राजे भोसले हे विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या दरबारातील सेनापती आणि शूर योद्धा होते. जिजाऊ यांनी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारतातील धाडसी व शौर्याच्या गोष्टी सांगून मोठे केले आणि त्यांच्यामध्ये असे गुण निर्माण केले, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि निर्भय योद्धा ठरले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी, भाला चालवण्याची कला, घोडेस्वारी, स्वसंरक्षण, युद्धकौशल्य यात पारंगत केले.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच पुढे शिवाजी महाराज समाजाचे रक्षक आणि अभिमान बनले. आणि त्यांनी हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि एका स्वतंत्र व महान राज्यकर्त्याप्रमाणे त्यांचे नाव तयार झाले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.पुढील भागात - अहिल्याबाई होळकरसंकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय ! १०० व २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर येणार बंदी, या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांना बसणार मोठा फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल गांधी आज व उद्या 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर, छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण, संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जातीच्या आधारावर कैद्यांना कामाचं वाटप करणे असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा विमुक्त जमातींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *CBSE 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 साठी फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून ही अद्यापपर्यंत आम्हांला न्याय मिळाला नाही - उद्धव ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा धावपटू अविनाश साबळे याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर रोहित शर्माचे मार्गदर्शक दिनेश लाड यांना जिजामाता पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजचा रंग - हिरवा*हिरवा रंग - एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात. - प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते, हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे, तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतिक देखील मानला जातो. जसे हिरवी साडी, बांगळ्यांचा हिरवा चुडा.- यासाठी सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. - हिरवा रंग डोळ्यासाठी उत्तम आहे. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NASA - National Aeronautics Space Administration*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य निसर्गाचा अनुचर आणि नियतीचा दास आहे. - जयशंकर प्रसाद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे ?२) मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव काय आहे ?३) सन १९७६ साली मृणाल सेन यांच्या कोणत्या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली ?४) भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान कोणता ?५) दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरूप काय आहे ? *उत्तरे :-* १) मिथुन चक्रवर्ती २) गौरांग चक्रवर्ती ३) मृगया ४) दादासाहेब फाळके पुरस्कार ५) कमळ पदक, शाल व १० लाख रुपये*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मण मोहन पंडोरे, पदवीधर शिक्षक, अहमदनगर👤 विजय पळशीकर👤 ओमप्रकाश येवतीवाड👤 साईनाथ पोरडवार👤 सौ संगिता भांडवले, शिक्षिका, उस्मानाबाद👤 सुरेंद्र माणिकराव गाडेकर👤 धनराज शेट्टीगर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनीं । मी जळतसें स्मशानीं । अग्निसवें एकला ॥६॥ मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानीं परतले । शेवटीं टाकोनियां गेले । मज परता येमजाल ॥७॥ ऐसा जाणोनि निर्धार । मन मज आला गहिंवर । तंव दाहीं दिशा अंधःकार । मग मज कांहीं न सुचे ॥८॥ ऐसें जाणोनियां पाही । मनुष्य जन्म मागुता नाहीं । नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा ॥९॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांनी आपल्या जीवनात स्वतः साठी एकही दिवस जगले नाही त्यांना कधीही विसरू नये. कारण त्यांनी फक्त द्यायलाच शिकले घेण्यासाठी त्यांच्याकडे एक सेंकद सुध्दा वेळ नव्हता म्हणून त्यांना दाता म्हणतात. देणारेच अजरामर असतात अन् घेणाऱे मात्र त्यातच आनंद शोधत असतात. या प्रकारचा आनंद फक्त क्षणापुरतेच मर्यादित असतो. कारण दुसऱ्यांसाठी जगणारे खऱ्या अर्थाने महान असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठ्या भावाचा रुमाल*राजू तिसरीच्या वर्गात शिकतो, त्याचा मोठा भाऊ कार्तिकही त्याच शाळेत पाचवीत शिकतो. दोन्ही भाऊ एकत्र शाळेत जायचे. दोघेही वाटेत खूप मस्ती करायचे. कार्तिककडे रुमाल होता, तो नेहमी डेटॉलने धुवून स्वच्छ ठेवायचा. राजू नेहमी भावाकडे पाहतो, त्याला वाटतं भाऊ रुमाल सोबत ठेवतो का ? थोडी घाण असेल तर साफ करायची आणि मग दुमडून खिशात ठेवायची. रुमालाचा गोंधळ त्याला आवडला नाही. राजूला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या, मोठा भाऊ असं का करतो, असं त्याला वाटायचं, पण त्याला कधीच कळलं नाही. एकदा राजू झुल्यावर डोलत होता, तेव्हा झुल्याचा हात सुटला आणि तो जमिनीवर पडला. जमिनीवर पडताच राजूच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या गुडघ्यातून रक्त वाहू लागले. कार्तिकने आपल्या भावाला पाहताच तो पटकन धावत आला आणि खिशातून रुमाल काढून जखमेवर बांधला. त्यामुळे रक्तस्त्राव थांबला. कार्तिक ताबडतोब त्याच्या भावाला दवाखान्यात घेऊन गेला तिथे डॉक्टरांनी मलम लावून राजूला बरे केले. राजूने तो रुमाल पाहिला जो भाऊ स्वच्छ करून नेहमी सोबत ठेवत असे. ज्याच्यावर तो खूप प्रेम करत होता, तो आता गलिच्छ झाला होता. मोठ्या भावाच्या प्रेमापुढे तो रुमाल फारसा गोंडस नव्हता.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment