✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक काटकसर दिन_**_ या वर्षातील ३०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.**१९९५:कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.**१९७३:इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.**१९६६:शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.**१९४५:भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.**१९२८:लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.**१९२०सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६४:रोहिणी अमोल पराडकर-- कवयित्री, लेखिका**१९६२:कोर्टनी अँड्र्यू वॉल्श-- वेस्टइंडीज चा माजी क्रिकेटपटू* *१९६०:ॲड.गोविंद भेंडारकर-- लेखक* *१९६०:डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू**१९५४:धनराज गोविंदराव गोंडाणे -- लेखक* *१९५२:दलीप ताहिल-- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि थिएटर अभिनेता* *१९४९:प्रमोद महाजन – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू:३ मे २००६)**१९४८:हेमंत गोविंद जोगळेकर -- सुप्रसिद्ध कवी**१९४८:निर्मला उत्तरेश्वर मठपती-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका (मृत्यू:१० ऑक्टोबर२०२०)**१९४७:विक्रम गोखले-- मराठी नाट्य-चित्र अभिनेते* *१९४६:अशोक सुमितराव हिवाळे -- प्रसिद्ध लेखक,चरित्रकार* *१९४१:डॉ.सुधीर वसंत राशिंगकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९३८:डॉ.रवींद्रनाथ वामन रामदास-- लेखक* *१९३४:भुजंगराव दत्तराव वाडीकर-- लेखक**१९३०:गंगाधर नारायण मोरजे-- लोकवाङ्मयाचे अभ्यासक व मराठी ख्रिस्ती साहित्याचे संशोधक(मृत्यू:९ जुलै २००५)**१९२९:माधव गोठोस्कर-- माजी भारतीय क्रिकेट पंच* *१९०९:डॉ.होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ जानेवारी १९६६)**१८९८:दिनकर विनायक काळे-- लेखक, इतिहास संशोधक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९८०)**१८८७:सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक,चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू:१० सप्टेंबर १९२३)**१७३५:जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (मृत्यू:४ जुलै १८२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:यशवंत देव-- प्रसिद्ध मराठी कवी आणि संगीतकार(जन्म:१ नोव्हेंबर १९२६)**२०११:अरविंद मफतलाल – उद्योगपती (जन्म:२७ आक्टोबर १९२३)**१९९८:विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (जन्म:१३ ऑगस्ट १९०६)**१९९६:प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक,पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म:२९ नोव्हेंबर १९२६)**१९९४:सरदार स्वर्ण सिंग –माजी केन्द्रीय मंत्री (जन्म:१९ ऑगस्ट १९०७)**१९९०:व्ही.शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते,पद्मश्री,दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते(जन्म:१८ नोव्हेंबर १९०१)**१९९०:विनोद मेहरा – प्रसिद्ध अभिनेता(जन्म:१३ फेब्रुवारी १९४५)**१९७४:बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(जन्म:७ आक्टोबर १९१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*...... समर्थ रामदास स्वामी .....समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म नाव - नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च१६०८, जांब - १३ जानेवारी, १६८१, सज्जनगड) हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे. दासबोध व मनाचे श्लोक याचे लेखन त्यांनी केले आहे.समर्थ रामदासस्वामी (नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले होते. या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचेदर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी दिला थेट राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर, 'कॅप्टन कूल'वर मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - लखनौ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये भारताने इंग्लडला 100 धावांनी हरविले, विश्वचषक मध्ये सलग सहावा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्ही. शांताराम चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुंद्रे. यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापूर येथे झाला. मॅट्रिकला असतांना त्यांना काही कारणाने शाळा सोडावी लागली. शाळेत असताना, शाळेच्या नाटकात ते नेहमी काम करीत असत. वयाच्या 19 व्या वर्षी1920 साली व्ही. शांताराम, बाबुराव पेंटर यांच्या फिल्म कंपनीत दाखल झाले. या कंपनीत त्यांनी सुभद्रा हरण, नेताजी पालकर, सिंहगड वगैरे सिनेमात त्यांनी कामे केली. 1929 साली त्यांनी दामले व फत्तेलाल यांच्या सहकार्याने प्रभात फिल्मची स्थापना केली.1932साली या कंपनीने मराठी भाषेतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात कंपनी मध्ये व्ही शांताराम यांनी सिंहगड, संत तुकाराम, माणूस, दुनिया न माने, कुंकू, ज्ञानेश्वर, शेजारी असे अनेक दर्जेदार चित्रपट निर्माण केले. ते सर्व लोकप्रिय झाले. 1941 साली व्ही शांताराम यांनी "राजकमल" ह्या नावाची संस्था काढली. या संस्थेने शाहीर, रामजोशी, अमर भूपाळी, पिंजरा अश्या एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती केली. हिंदी चित्रपट सृष्टीत ही या मराठी कलावंताने, दिगदर्शकाने सुंदर चित्रपट निर्माण केले. डॉ कोटणीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शकुंतला हा व्ही शांताराम यांनी तयार केलेला व अमेरिकेत प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला. 1985 साली चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार"दादा साहेब फाळके पुरस्कार" त्यांना देण्यात आला. भारत सरकारने त्यांना "पद्मश्री" हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. अश्या या थोर मराठी कलावंताचे 28 ऑक्टोबर 1990 रोजी निधन झाले. व्ही शांताराम यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डॉ. होमी भाभा यांचा जन्म केव्हा झाला ?२) डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे ?३) जागतिक काटकसर दिन केव्हा साजरा केला जातो ?४) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम कोणत्या देशाला भेट दिली ? *उत्तरे :-* १) ३० ऑक्टोबर १९०९ २) ट्रॉम्बे, मुंबई ३) ३० ऑक्टोबर ४) ३० ऑक्टोबर ५) भूतान ( १५ ते १६ जून २०१४ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शैलेंद्र सुरकुटवार👤 बसवराज पाटील, शिक्षक नेते, नांदेड👤 विजय जोशी, साहित्यिक👤 संग्राम टेकाळे👤 पंकज गादेवार, धर्माबाद👤 श्याम स्वामी, शिक्षक, हिंगोली👤 सोहम कवडे, कुपटी, माहूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा। जनीं वादसंवाद सूखे करावा॥ जगीं तोचि तो शोकसंतापहारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे प्रत्येकांचे आचार, विचार, रंग, रूप वेगवेगळे असतात. पुन्हा त्यात बरेच काही. तसेच त्यांचे जगणे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणून कोणाच्या आचार, विचाराला किंवा रंग, रूपाला कमी लेखू नये. किंवा त्यांचा अपमान करण्याचा विचार सुद्धा आपल्या मनात आणू नये असे केल्याने किंवा वागल्याने आपल्यात असलेल्या सदगुणाचाच अपमान होत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *सिंह आणि लांडगा**एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्‍यांच्‍या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्‍हणाला,'' महाराज, तुम्‍ही आता चालून चालून दमला असाल, तेव्‍हा तुम्‍ही इथेच बसा. मी तुमच्‍यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्‍या आवाजाच्‍या रोखाने गेला असता त्‍याला त्‍या मेंढ्यांच्‍या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्‍टपुष्‍ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्‍याचे दिसले. त्‍याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्‍हणाला,'' महाराज तुम्‍ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्‍या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत. इतक्‍या सा-या मेंढयामध्‍ये एकही मेंढी चांगली नाही तेव्‍हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.'' सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्‍यामुळे सिंहाला लांडग्‍याचा धूर्तपणा लक्षात आला.**तात्‍पर्य :-आपली असहाय्यता लपविण्‍यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्‍वभाव आहे.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment