✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मानसिक आरोग्य दिन_* *_ या वर्षातील २८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७५:पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९६४:जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९६०:विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९५४:आचार्य अत्रे निर्मित 'श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ज्यूंचे शिरकाण - ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.**१९४२:सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.**१९१३:पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९:राहुल देशपांडे-- लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक**१९७९:दीपक शांताराम पवार-- कवी**१९७८: ज्योती मनोज मुळ्ये -- लेखिका* *१९७६:डॉ.केशव खटींग-- कवी* *१९७३:शिवराज किसनराव पारधे-- कवी* *१९७३:कोडुरी श्रीशैला श्री राजामौली उर्फ एस.एस. राजामौली-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७१:कमाल अहमद खान-- कवी,लेखक, संपादक**१९६७:प्रा.डॉ.विजय मारोतराव सोरते-- कवी, लेखक* *१९६६:दशरथ यशवंत झनकर-कवी**१९६१:महेश नामदेव कराडकर-- कवी,लेखक,संपादक**१९६१:किरण सीताराम जोशी -- कवी* *१९५४:डॉ.सुहास बहुकार-- प्रसिद्ध चित्रकार आणि कलेचे इतिहासकार व लेखक* *१९५४:रेखा – प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री**१९५४:प्रतिमा इंगोले-- प्रसिद्ध मराठी बालसाहित्यकार,कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका**१९४८:मोहन यशवंत मदवाण्णा-- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९४४:निशिकांत देशपांडे-- प्रसिद्ध कवी लेखक,गझलकार (मृत्यू:२९ सप्टेंबर २०२२)* *१९४२:भास्कर आर्वीकर-- ग्रंथप्रेमी,लेखक**१९३७:अनंत दत्तात्रय भावे -- जेष्ठ बालसाहित्यिक* *१९३५:डॉ.कृष्ण माधव घटाटे-- चरित्रकार, संपादक,लेखक* *१९३३:हरी गणपत देशमुख-- लेखक तथा निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९२९:उ.रा.गिरी --- गझलकार,कवी (मृत्यू:५ सप्टेंबर १९८६ )**१९१६:डॉ.लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या,मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक (मृत्यू:२० मे १९९२)**१९१०:डॉ.द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (मृत्यू:९ डिसेंबर १९४२)**१९०९:क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन.डी.नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू:११ सप्टेंबर १९९८)**१९०६:रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू:१३ मे २००१)**१९०२:के.शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (मृत्यू:९ डिसेंबर १९९७)**१८९९:कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते. (मृत्यू:२२ मे १९९१)**१८७१:शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त,समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक(मृत्यू:२३ एप्रिल १९५८)**१८४४:बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष (मृत्यू:१९०६)**१७३१:हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ फेब्रुवारी १८१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:निर्मला उतरेश्वर मठपती--प्रसिद्ध कवयित्री,लेखिका(जन्म:३०ऑक्टोबर १९४८)**२०१८:पंडित दामोदर केशव(डी.के.) दातार-- भारतीय व्हायोलिन वादक(जन्म:१४ ऑक्टोबर १९३२)**२०११:जगजीतसिंग – गझलगायक (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)**२००८:रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (जन्म:१४ नोव्हेंबर १९२४)**२००६:सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (जन्म:४ आक्टोबर १९१३)**२०००:सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. (जन्म:१७ एप्रिल १९१६)**१९८३:रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री,दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (१९७३) (जन्म: १९०७)**१९६४:वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,निर्माते आणि अभिनेते.(जन्म:९ जुलै १९२५)**१८९८:मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक (जन्म:२६ सप्टेंबर १८५८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... दुर्गाबाई कामत ....१९०० च्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना चित्रपट किंवा रंगभूमीवर काम करण्यास मनाई होती. त्या काळात नाटकात काम करणाऱ्या महिलांना हीन दृष्टीने पाहिले जात असे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना आपल्या पहिल्या चित्रपटात म्हणजे 'राजा हरिश्चंद्र' मध्ये महिला कलाकाराच्या भूमिकेसाठी पुरुष कलाकारांचा वापर करावा लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची पत्नी राणी तारामतीची भूमिका अण्णा हरी साळुंखे या पुरुष अभिनेत्याने साकारली होती. साळुंखे यांनी धार्मिक भावनेपोटी आपली मिशी काढण्यास नकार दिला होता. चित्रपटात त्यांची मिशी दिसून येऊ नये म्हणून दादासाहेब फाळके यांना खूप काळजी घ्यावी लागली होती.इ.स. १९०३ मध्ये दुर्गाबाई कामत या आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. त्यावेळेस त्यांची मुलगी कमला, ज्या लग्नानंतर कमलाबाई रघुनाथराव गोखले या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या, त्यासुद्धा त्यांच्या बरोबर राहात असत. आपला चरितार्थ भागवण्यासाठी दुर्गाबाई आणि कमला या दोघी मेळा आणि जत्रेत गाणी गाणे व विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या नाटकात काम करत असत. त्यानंतर दुर्गाबाई रंगमंचाशी जोडल्या गेल्या आणि त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीस योग्य ती सुरुवात झाली.दादासाहेब फाळके यांनी इ.स. १०१३ मध्ये 'मोहिनी भस्मासूर' या आपल्या दुसऱ्या मूकपटाची निर्मिती केली. या दुसऱ्या चित्रपटात त्यांनी महिला कलाकारांना घेण्याचे ठरवले. दुर्गाबाई कामत यांनी या चित्रपटात देवी पार्वतीची छोटी भूमिका केली. अशा प्रकारे दुर्गाबाई भारतीय चित्रपटात काम करणारी पहिली महिला अभिनेत्री बनल्या. त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी त्याच चित्रपटात बाल कलाकार म्हणून मोहिनीची भूमिका साकारली होती. या दोघी माय-लेकी यांच्या या कामामुळे चित्रपटात आणि नाटकात काम करण्याकरिता भारतीय महिलांना मोठे प्रोत्साहन मिळाले.दुर्गाबाई कामत यांचे नातू (आणि कमलाबाईंचा मुलगा) ज्येष्ठ मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले हे होते. चंद्रकांत गोखले तसेच त्यांचा मुलगा विक्रम गोखले यांनीसुद्धा त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळणार, घटस्थापनेनंतर विस्ताराची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, अतुलनीय कामगिरीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एक मराठा लाख मराठा! मनोज जरांगेंच्या अंतरवालीतील सभेसाठी संभाजीनगरमधून 700 वाहने जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शारदीय नवरात्रौत्सव! तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर; 24 ऑक्टोबरला सिमोल्लंघन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला, सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्राच्या 81 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताला मोठा धक्का, शुभमन गिल अफगाणिस्तानविरोधातही संघाबाहेर, चेन्नईमध्ये उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर आणि निरोगी केसांसाठी काही टिप्स*● केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणून दररोज आहारात किमान 45 ग्रॅम प्रथिने घ्या. ● प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ होतात. तसेच ते निस्तेज होतात व गळतात. ● झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी आहारात नट्स, अक्रोड, पेकान, काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.● तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स घ्या. व भरपूर प्रमाणात पाणी प्या.● ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे सेवन वाढवल्याने केसांची मुळे आणि सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात.● तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते. आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करा.● केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा. चुकीचे शॅम्पू आणि स्टाइलिंग एजंट वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. ● दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा.● केस ओले असताना हळूवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त आहे.● केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा.● केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी – प्रत्येक 10 ते 12 आठवड्यांनी – नियमितपणे केसांना खालून कट द्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ चे सदिच्छादूत कोण आहेत ?२) रसायनशास्त्र २०२३ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोठे आहे ?४) देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ?५) 'मिस वर्ल्ड'चा किताब मिळविणाऱ्या भारतीय सौंदर्यवती कोण आहेत ? *उत्तरे :-* १) सचिन तेंडूलकर, भारत २) मौंगी बावेंडी, लुई ब्रुस, अलेक्सी एकीमोव्ह ३) फिलिपिन्स ४) दिल्ली ५) रिटा पॉवेल ( १९६६ ), युक्ता मुखी ( १९९९ ), डायना हेडन ( १९९७ ), ऐश्वर्या रॉय ( १९९४ ), प्रियंका चोप्रा ( २००० ), मानुषी छिल्लर ( २०१७ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संतोष खेडकर, शिक्षक, धर्माबाद👤 राजेश्वर भुरे, टीचर, आर्ट ऑफ लिव्हिंग👤 राजेंद्र वाघमारे👤 श्याम देसाई👤 विशाल अन्नमवार, देगलूर👤 पोतन्ना चंदेवाड👤 सतिश बोधनकर, मुख्याध्यापक, IGP स्कुल धर्माबाद👤 विठ्ठल धुळेकर, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 कैलास सांगवीकर👤 प्रभू पाटील कदम👤 शरद घुबे👤 प्रमोद यादव👤 श्रीकांत पाटील शिंदे👤 तानाजी पाटील👤 शंकर बत्तीनवार👤 तुकाराम डोळे👤 राम गायकवाड👤 वसंत पाटील कदम👤 विनोद लोणे👤 अरुण शंखपाळे👤 रोहित हिवरेकर👤 गंगाधर पापुलवार👤 राज वजीरे👤 सतीश बड्डेवाड👤 रेखा अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यथासांग रे कर्म तेंहि घडेना।घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥दया पाहतां सर्व भुतीं असेना।फुकाचे मुखी नाम तेंही वसेना ॥१००॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎯 *विचारवेध...........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वासाचा पाया मजबूत असेल तर अपयशाच्या कितीही पाय-या असल्यातरी त्या चढून जाऊन शेवटी यशाच्या यशोशिखरावर नक्कीच पोहोचता येते. परंतु यश कितीही जवळ असेल आणि आत्मविश्वास जवळ नसेल तर नक्कीच आपल्या हातून यश निसटून जाईल आणि अपयश पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○● मूर्खांचे निष्‍कर्ष ●○*एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्‍याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्‍या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्‍ण तारा असूनही त्‍यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्‍ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्‍वीवर आला तर पृथ्‍वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्‍त्रज्ञाच्‍या या बोलण्‍यावर काही लोकांचा खरेच विश्‍वास बसला व त्‍यांच्‍यापैकी काही लोकांनी त्‍याचा सत्‍कार करण्‍याचे ठरविले. पण जमलेल्‍या काही लोकांपैकी एक जण चिकित्‍सक होता त्‍याने त्‍या ज्‍योतिष्‍याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्‍याने ती दुर्बिण तपासली असता त्‍याच्‍या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्‍या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्‍हणजे महाकाय प्राणी असल्‍याचा भास होत होता. चिकित्‍सक माणसाने ही गोष्‍ट लोकांना सांगताच त्‍यांना शास्‍त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.तात्‍पर्य :- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्‍यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment