✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २९९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर**१९९४:जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.**१९६२:वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.**१९०५:नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:आतिश सुरेश सोसे -- कवी,लेखक,संपादक विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७४:रवीना टंडन – अभिनेत्री**१९६७: हरिश्चंद्र लाडे--कवी लेखक विचारवंत* *१९६६:डॉ.रमेश रामजी राठोड -- लेखक* *१९६६:मंजुषा अभिजित आमडेकर-- लेखिका* *१९५५:मनिषा चिंतामणी आवेकर -- लेखिका,कवयित्री* *१९५४:शब्बीर कुमार-- भारतीय पार्श्वगायक**१९५४:लक्ष्मीकांत बेर्डे-- मराठी व हिंदी चित्रपट प्रसिद्ध विनोदी अभिनेता(मृत्यू:१६ डिसेंबर२००४)**१९४९:पंडित सुहास व्यास- शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान* *१९४४:प्रा.विद्या गंगाधर सप्रे-चौधरी-- लेखिका**१९३७:हृदयनाथ मंगेशकर – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९३०:दत्तात्रेय भास्कर धामणस्कर-- मराठी कवी**१९२५:शंकर भाऊ साठे-- कादंबरीकार आणि शाहीर(मृत्यू:१५ मार्च १९९६)* *१९१९:मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण (मृत्यू:२७ जुलै १९८०)**१९००:कौतिक नारखेडे-- कवी कथाकार (मृत्यू:२१ सप्टेंबर १९८०)**१९००:इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू:७ मार्च १९९३)**१८९१:वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू:२७ आक्टोबर १९६४)**१८८८:हरी कृष्ण मोहनी-- लेखक,राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते (मृत्यू:२९आक्टोबर १९६१)**१८३८:केशव सदाशिव रिसवूड -- लेखक (मृत्यू:४ नोव्हेंबर १९००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक,लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक,हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म:१४ नोव्हेंबर १९१९)**१९८१:दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे--- कर्नाटकामधील प्रसिद्ध साहित्यिक (जन्म:३१ जानेवारी १८९६)**१९७९:चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ(जन्म:२२ ऑगस्ट १८९५)* *१९३०:डॉ.वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म:१५ मार्च १८६०)**१९०९:इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म:१६ आक्टोबर १८४१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*..... संत तुकाराम महाराज ....तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती अभियानाचे कवी-संत होते. ते वारकरी धार्मिक समुदायाचे सदस्यही होते. पंढरपूरचे पांडुरंग हे तुकाराम महाराज यांचे आराध्यदैवत होते.माहिती नाही आणि त्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती इतिहासात उपलब्ध नाही पण शोधकर्त्यांच्या मते, त्याचा जन्म १५९८ किंवा १६०८ मध्ये महाराष्ट्रातील पुण्याच्या देहू गावात झाला आहे.त्यांच्या घरात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा पहिल्यापासून होती. तुकाराम महाराज यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई. तसेच त्यांना दोन भाऊ होते. मोठा भाऊ सावजी आणि लहान कान्होबा. संत तुकाराम महाराज यांचे पाहिले लग्न पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची मुलगी आवली सोबत झाले.त्यांचे कुटुंब कुणबी समाजातील होते. तुकाराम महाराज यांच्या कुटुंबाचा किरकोळ विक्री आणि पैसे उधारीवर देने असा व्यवसाय होता., तसेच त्यांचे कुटुंब शेती व व्यापार करत होते. त्यांचे वडील विठोबाचे भक्त होते. विठोबा हा हिंदू धर्मात भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. तुकाराम महाराजांच्या बालपणातच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला.आणि त्यांना एक मुलगा संतू देखील होता. १६३० – १९३२ च्या दुष्काळात मुलगा आणि बायको दोन्ही मरण पावले.त्यांच्या मृत्यूचा आणि वाढणाऱ्या गरिबीमुळे सर्वात ज्यात प्रभाव संत तुकाराम महाराज यांच्यावर पडला. त्यानंतर त्यांनी भंडारा डोंगरावर जाऊन मौन धारणा करण्याचा निर्णय घेतला.यानंतर तुकाराम महाराज यांनी पुन्हा लग्न केले आणि त्यांच्या दुसर्‍या पत्नीचे नाव नवलाई (जीजा बाई) असे होते. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. परंतु त्यानंतर त्यांनी आपला बहुतेक वेळ पूजा, भक्ती, समाज कीर्तन आणि अखंड कवितांमध्ये घालविला.तुकाराम महाराज यांचे अध्यात्मिक गुरु बाबाजी चैतन्यहोतेहोते. ते स्वत: ते 13 व्या शतकातील विद्वान जननादेवाचे चौथ्या पिढीचे शिष्य होते.एका माहितीनुसार तुकारामांचा मृत्यू १६४९ किंवा १६५० मध्ये झाला.तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील महाराष्ट्रामधील भक्ती अभियानाचे कवी-संत होते. ते सर्ववादी, वारकरी धार्मिक समुदायाचे सदस्यही होते. तुकाराम त्यांच्या अखंड आणि भक्तिमय कवितांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कविता विठ्ठल आणि विठोबाला समर्पित होत्या.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या चरणी होणार लीन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इंडिया नाही आता भारतच! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, NCERT चा मोठा निर्णय!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 22 हजार 300 कोटींचं गिफ्ट, रब्बी हंगामासाठीही खतांवर सबसिडी कायम राहणार, युरियाच्या किमतीत वाढ नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा! धाराशिवमध्ये 109 गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी, लातूरमध्येही गावबंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आज गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 -सर्वात जलद शतक आता ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 पक्ष्यांची माळ बाणाच्या टोकासारखी का असते? 📒'बगळ्यांची माळ उडे अजून अंबरात' वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातल्या या गीताची मोहिनी अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहे. जेव्हा त्यांच्याच आवाजात त्यांचा नातू राहुल हे गीत गातो तेव्हा स्मरणरंजनाचा आनंद तर मिळतोच; पण नेहमीचा एक अनुभवही जागा होतो. तिन्हीसांजा झाल्यावर आपापल्या घरट्याकडे परतणाऱ्या बगळ्यांची, खरं तर इतर पक्ष्यांचीही आकाशातली माळ बाणाच्या टोकासारखी किंवा इंग्रजीतल्या 'व्ही' या अक्षरासारखी रचना करून उडताना दिसते. दिवसाकाठी चाऱ्याच्या शोधात आपल्या घरट्यापासून हे पक्षी दूरवर जात असले तरी त्यांना परतताना फार मोठं अंतर पार करावं लागत नाही; पण निरनिराळ्या ऋतूंमध्ये स्थलांतर करणारे पक्षी शेकडो, हजारो किलोमीटर दूरवरच्या प्रदेशात तात्पुरत्या वास्तव्यासाठी जात असतात. हिवाळ्यात हे पक्षी उबदार प्रदेशाकडे कूच करतात. उन्हाळ्याची चाहूल लागली की परत उलट दिशेनं झेप घेतात.अशा दूरवरच्या उड्डाणातही या पक्ष्यांची माळ अशीच बाणाच्या टोकासारख्या रचनेचा अवलंब करताना दिसते. साहजिकच तो पक्ष्यांचा कळप असं का करतो, हा सवाल त्या बाणासारखाच टोचत राहतो.त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, तसं केल्यानं त्यांना ऊर्जेची बचत करता येते. हवेतून उडताना त्यांना हवेच्या किंवा खरं तर वाऱ्याच्या विरोधाला तोंड द्यावं लागतं. त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांना काही ऊर्जा खर्च करावी लागते. एकापाठोपाठ सरळ रेषेत जर हे पक्षी उडत राहिले तर पुढच्याच्या उडण्यापायी हवेत उठलेल्या आवर्तनांचाही सामना त्यांना करावा लागतो. तो टाळण्यासाठी मग हे पक्षी पुढ्यातल्या पक्ष्याच्या जरा वर आणि बाजूला असे उडत राहतात. त्यामुळं त्यांना ऊर्जेची बचत करता येते. तसंच आपल्या जागा बदलत जरा थकलेल्या, पुढ्यात राहून मार्गदर्शन करणाऱ्या पक्ष्यांना विश्रांतीही देता येते. तसं केल्यानं एका दमात ते दूरवरचा पल्ला गाठू शकतात. हजारो किलोमीटरची मजल मारताना अधेमधे कमी मुक्काम करावा लागतो आणि आपलं गंतव्य स्थान लवकर गाठता येतं.दुसरं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अशा बाणाच्या टोकासारख्या रचनेत कळपातल्या प्रत्येक पक्ष्याकडे लक्ष ठेवणं सोपं जातं. त्यामुळं कोणीही वाट चुकून भरकटणार नाही, याची खात्री करून घेता येते. तसंच जर कोणाला काही कारणानं मदत लागलीच तर इतरांना सावध करून सर्वच कळप एका ठिकाणी उतरू शकतो. या कारणांमुळंच असावं; पण लढाऊ विमानांचा काफिला जेव्हा एकमेकांच्या साथीनं उडत असतो तेव्हा तोही याच प्रकारच्या रचनाबंधाचा अवलंब करतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले महाराष्ट्रातील पहिले अग्निवीर कोणते ?२) संत नामदेव महाराजांचा जन्म केव्हा झाला ?३) मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?४) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे ?५) इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) अक्षय लक्ष्मण गवते, बुलढाणा २) २६ ऑक्टोबर १२७० ३) डावीकडून उजवीकडे ४) महाभारत ५) जॉर्जिया मेलोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 माधव गव्हाणे, क्रियाशील शिक्षक👤 अविनाश थोरात👤 नवनाथ शिंदे👤 सौ. संगीता नामेवार-कंदेवार👤 गणेश पालदेवाड, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू शापिता कष्टला अंबऋषी। तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥ दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वभावाला औषध नसते, स्वभाव बदलत नसतो असं म्हटल्या जाते. कदाचित हे सुद्धा खरं असू शकते. असा स्वभाव व्यक्तीला दुराग्रही व हट्टी बनवू शकतो. यातून स्वतःचेच नुकसान होण्याची भीती असते. अशी व्यक्ती इतरांपासून दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वेळ, प्रसंग पाहून थोडे तरी आपल्या स्वभावात बदल आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण चांगल्या कामासाठी व त्यातून इतरांचे भले होत असेल तर...तो स्वभाव कल्याणकारी ठरू शकतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *कष्टाची कमाई श्रेष्ठ*📗 *एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो. एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.**तात्‍पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment