✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान**१९७३:संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.**१९४४:दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.**१८९०:हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आशिष आत्माराम वरघणे -- लेखक* *१९८३:जोगिंदर शर्मा-- माजी क्रिकेटपटू**१९८१:सिद्धार्थ रामचंद्र जाधव- प्रसिद्ध मराठी चित्रपटांतील अभिनेता* *१९७९:उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू -- भारतीय अभिनेता**१९७२:एकनाथ नरहरी आव्हाड -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक**१९६७:प्रा.डॉ उल्हास सुधाकर मोगलेवार -- लेखक,संपादक**१९६३:गणेश विसपुते-- कवी,लेखक* *१९६०:नीरजा -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९५५:विलास माणिकराव रणभुसे -- लेखक,संपादक* *१९४५:शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू:१३ मार्च १९९६)**१९४०:डॉ.श्रीकांत व्यंकटेश मुंदरगी-- लेखक* *१९३९:रमेश भिकाजी तांबे-- लेखक (मृत्यू:१० जून १९९७)**१९३७:देवेन वर्मा-- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता(मृत्यू:२ डिसेंबर २०१४)**१९२९:मनोहर महादेव देशपांडे -- वैदर्भीय कवी(मृत्यू:२५ डिसेंबर २००५)**१९२९:डॉ.नरेंद्रनाथ बळीरामजी पाटील-- लेखक**१९२४:’संगीतभूषण’ पं.राम मराठे – संगीतकार,गायक व नट (मृत्यू:४ आक्टोबर १९८९)**१९२३:दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू:२२ फेब्रुवारी २०००)**१८९८:राधाबाई पांडुरंग आपटे-- लेखिका**१८७९:शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू:२७ नोव्हेंबर १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म:७ सप्टेंबर १९३४)**२००१:आत्माराम पांडुरंग नारायणगावकर --गायक व लेखक(जन्म:३० ऑगस्ट १९१७)**१९२१:जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म:५ फेब्रुवारी १८४०)**१९१५:डब्ल्यू.जी.ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:१८ जुलै १८४८)**१९१०:चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म:२० सप्टेंबर १८५३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*..... अमरावतीची अंबादेवी .....विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावती जिल्हा परिचित आहे. विदर्भाची कुलस्वामिनी कुलदैवत म्हणून आई अंबाबाई आणि एकविरा देवी यांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्र उत्सवात येथे देशभरातील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात. अंबादेवी संस्थान व एकविरा देवी संस्थान हे आध्यात्मिक कामासोबतच कला, संस्कृती, आरोग्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचं दिसून येते.विदर्भाचा राजा भिष्मक त्यांची मुलगी रुख्मिणी श्रीकृष्णाच्या धैर्य आणि सहसाच्या गोष्टी होऊन प्रेरित झाली होती. ती कृष्णावर प्रेम करत होती. तिचा भाऊ रूख्मीय याने त्याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्याशी तिचा विवाह ठरवला. रुख्मिणीने कृष्णाला गुप्त निरोप पाठविला, त्या दोघांनी मिळून योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्यापूर्वी तिने अमरावती (महाराष्ट्र) येथील एकविरादेवीच्या मंदिरास भेट दिली. काही यादवाच्या मदतीने येथून कृष्णाने रुख्मिणीला पळवून नेले. कृष्णा रुख्मिणीचा भाऊ रूख्मीय याच्याशी लढला. नंतर राजा भिष्मकाने त्या दोघांचा विवाह ठरवून दिल्याची माहिती अंबादेवी संस्थांचे सचिव रविंद्र कर्वे यांनी दिली.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिराची रचनादेखील तितकीच महत्त्वाची आहे. मंदिरात प्रवेश करताना दिसणाऱ्या दोन शिखरांवरील कळस तांब्याचे असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडपाचं काचेनं मढवलेलं नयनरम्य छत उत्कृष्ट कलेची प्रचिती देतं. काळ्या रंगाची, वालुका पाषाणाची श्रीअंबादेवीची स्वयंभू मूर्ती आहे. या पूर्णाकृती आसनस्थ मूतीर्चे दोन्ही हात मांडीवर विसावलेले असून डोळे अधोर्न्मिलीत आणि मुद्रा धीरगंभीर आहे. ही मूर्ती अतिप्राचीन असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.देवीचा मुखवटा सोन्याने मढवलेला असून मागे किरीट आहे. कपाळावर बिंदी, पायात वाळ्या, कानात बुगडी, नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि सुवर्णाच्या सऱ्या, कमरेत कमरपट्टा अशा अनेक दागिन्यांसह देवीला नऊवारी साडी नेसवली जाते.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टोकाचं पाऊल उचलू नका, ते समाजाला आणि परिवाराला न परवडणारं, एकनाथ शिंदेंचं मराठा बांधवांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मेडीगड्डा धरणावरील पुलाचे खांब खचल्याने सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने २० गावातील शेतकऱ्यांना बसला फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा ; 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास आमरण उपोषण, पाण्याचा एक थेंबही घेणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असल्याची कोर्टात याचिका, 10 नोव्हेंबरला सुनावणी; अजित पवारांवरील आरोपाने गाजलंय प्रकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात ! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धूळ आणि प्रदूषणाने मुंबईकर त्रस्त; अखेर महापालिकेकडून उपाययोजना सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - धरमशाला येथे खेळलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताचा 4 विकेटनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दसरा - विजयादशमी*विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला दसरा, दशहरा किंवा दशैन या नावानेही ओळखले जाते. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विनच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांत येतो. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्धप्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी ही केली जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकत्र येणे सुरुवात आहे एकत्र ठेवणे प्रगती आहे एकत्र काम करणे हे यश आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'कविता आणि रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे ?२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी कोणती ?३) सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?४) भारताची प्रथम महिला शासक कोण होती ?५) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरूवात कोणी केली ? *उत्तरे :-* १) अण्णाभाऊ साठे २) यावली, अमरावती ३) पंचायत समिती सभापती ४) रझिया सुलतान ५) लॉर्ड मेकॉले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एकनाथ आव्हाड, कवी व साहित्यिक, मुंबई👤 प्रविण राखेवार, नांदेड👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 अभिषेक नागुल, नांदेड👤 ईश्वर डहाळे, नांदेड👤 व्यंकटेश येमेवार, धर्माबाद👤 स्वरदा खेडेकर गावडे👤 पंकज बदाने, शिक्षक, नंदुरबार👤 नरेंद्र रेड्डी चाकरोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काम लहान असो वा मोठे शेवटी कामच असते. त्यात कमीपणा वाटून घेऊ नये व काम मोठे असेल तर.. गर्वाच्या भोवऱ्यात अडकून पडू नये. प्रामाणिकपणे आपले काम करावे त्यातून जो समाधान आपल्याला मिळेल कदाचित तो समाधान जगावेगळा असू शकते म्हणून आपल्या कामाला पूजा समजावे कारण तेच काम दोन वेळचे अन्न देते व जगायला शिकवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❒ ❒ कृतघ्नता ❒ ❒* *_एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे._* *_अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला._* *_रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले._* *_हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला...,_* *_‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’_**तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment