✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑक्टोबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.**१९७१:ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४९:जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना**१९३३:पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.**१९१९:महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.**१९१९:के.एल.एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.**१९१२:हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.**१९०५:पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:जहीर खान – भारतीय जलदगती गोलंदाज**१९७८:प्रिती तडस-वाडीभस्मे--कवयित्री लेखिका**१९७८:नवनाथ एकनाथ ठाकूर-- कवी**१९६७: अमृता संखे -- कवयित्री* *१९६५:डॉ.बळवंत हिरामणजी भोयर-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६०:आश्विनी भिडे-देशपांडे –लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका**१९५५:विश्राम गुप्ते-- मराठीतले आघाडीचे कादंबरीकार,समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध**१९५५:डॉ.लीना सुधाकर जोशी-- लेखिका**१९५५:घनश्याम डोंगरे -- कवी,कथाकार संपादक (मृत्यू:११ नोव्हेंबर २००५)**१९५४:दीपक करंदीकर-- गझलकार**१९५३:डॉ.अनिल नारायणराव कुलकर्णी-- लेखक* *१९५२:व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष**१९४९:-रवींद्र महाजनी: मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक(मृत्यू:११ जुलै २०२३)**१९४८:डॉ.ललिता मोहन कुंभोजकर -- लेखिका* *१९४१:उषा खन्ना-- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय संगीत दिग्दर्शिका**१९३९:प्रा.प्रल्हाद विठ्ठलराव पांढरकर-- लेखक**१९३३:नामदेवराव दिवटे-- माजी खासदार तथा लेखक (मृत्यू:१८ जुलै २०१५)**१९३१:प्रा.त्र्यंबक महाजन-- लेखक, समीक्षक,संपादक* *१९३१:दिनेशचंद्र विश्वनाथ आठल्ये -लेखक**१९२७:मृणालिनी प्रभाकर देसाई --कादंबरीकार(मृत्यू:२९ नोव्हेंबर १९९४)**१९२१:जयवंत दत्तात्रेय जोगळेकर--समीक्षक, भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक, युद्धशास्त्र अभ्यासक(मृत्यू:१६ जुलै २०१६)**१९१७:विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू:१३ मे २०१० )**१९१४:बेगम अख्तर – गझल,दादरा आणि ठुमरी गायिका.गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(मृत्यू:३०आक्टोबर १९७४)**१९०७:प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू:२० ऑगस्ट १९९७)**१९००:हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू:२९ एप्रिल १९४५)**१८८५:नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१८ नोव्हेंबर १९६२)**१८६६:कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ –मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५कविता आज उपलब्ध त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही.’केशवसुतांची कविता’हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह.ना.आपटे यांनी प्रकाशित केला.(मृत्यू:७ नोव्हेंबर १९०५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:प्रभाकर पेंढारकर-- मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. ते मराठी चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर यांचे पुत्र होते(जन्म:७ सप्टेंबर १९३३)**१९९९:उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक,अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक,बालसाहित्यकार(जन्म:१५ ऑगस्ट १९२९ )**१९९८:भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री,काँग्रेसचे नेते,पद्मश्री(जन्म:९ फेब्रुवारी १९१४)**१९७५:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९)**१८४९:एडगर अ‍ॅलन पो –अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी(जन्म:१९ जानेवारी १८०९)**१७०८:गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म:२२ डिसेंबर १६६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... डॉ. आनंदीबाई जोशी ...आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या.गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करीत होते, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींची  शतपत्रे वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी कळल्यावर  लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी  शिकविण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ठरल्या.पुढील भागात :- अंतराळवीर कल्पना चावलासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधील मृत्यूबाबत देऊ नका, मूलभूत सुविधा पुरवणे हे सरकारचे काम; उच्च न्यायालयाने खडसावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता, निर्णय देईपर्यंत चिन्ह गोठवू नका, शरद पवार गटाचा प्रतियुक्तीवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरेगावात भीषण अग्नितांडव, आठ जणांचा मृत्यू, 58 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बांगलादेशचा पराभव करत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारली धडक!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पाकिस्तानने नेदरलँडवर 81 धावांनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्सत्वचेचे उन्हापासून संरक्षण करा. त्वचेची काळजी घेण्याची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय. सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या, त्वचेवर डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात व त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो.म्हणूनच उन्हात जाताना कमीतकमी 15 च्या SPF सह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. ​​ढगाळ वातावरण असले तरीही सनस्क्रीन लावा, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. कारण या काळात सूर्याची किरणे सर्वात तीव्र असतात.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्यांचे शर्ट व फुलपँट घाला. शक्य असेल तर मोठ्या हॅटने तुमची त्वचा झाकून टाका धूम्रपान टाळा.  धूम्रपानामुळे तुमची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात. धुम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते. धुम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.  आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घ काळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणी वापरा.हार्श साबण वापरू नका. साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात. त्याऐवजी, सौम्य प्रकारचा साबण वापरा.आपल्या त्वचेचे संरक्षण  करण्यापूर्वी शेव्हिंग करताना शेव्हिंग क्रीम, लोशन किंवा जेल लावा. तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा. केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेविंग करा. आंघोळ केल्यावर किंवा चेहेरा धुतल्यानंतर त्वचा खसाखसा न पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून कोणाला सुख देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा म्हणतात ?२) २०२३ ची 'मिस वर्ल्ड स्पर्धा' कोणत्या देशात होणार आहे ?३) गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?४) अलीकडेच गुगल या सर्च इंजिनला किती वर्षे पूर्ण झाली आहेत ?५) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी कोणती होती ? *उत्तरे :-* १) गोदावरी नदी २) भारत ( १६ डिसेंबर ) ३) धर्मरावबाबा आत्राम ४) २५ वर्षे ५) महेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दिपाली सावंत, क्रियाशील शिक्षिका, वर्धा👤 जादू पतंगे, वसमत👤 साईनाथ औरोड👤 दत्तात्रय देवकत्ते👤 योगेश गाडे👤 साईनाथ सावंत👤 साया रेड्डी चाकरोड, धर्माबाद👤 सुदर्शन कदम👤 रवींद्र शेळके👤 अभिषेक निगम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची। अहंतागुणे यातना ते फुकाची॥ पुढे अंत येईल तो दैन्यवाणा। म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारवेध*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रयत्न करणारी माणसं कधीच आपल्या नशिबाला दोष देत नाहीत. कारण त्यांना माहित असते की, आपले नशीब घडवायचे असेल तर प्रथम आपल्या प्रयत्नांना कधीच कमकुवत करायचे नाही आणि जर का प्रयत्न कमी पडत असतील तर त्यात सातत्य अधिक ठेवायला हवे. मग आपल्या नशिबाचे दार आपोआपच खुलते. परंतु जर का प्रयत्नांना थांबवून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच सफल होणार नाही. मग नशिबालाच दोष देत आपला हात डोक्याला लावून काहीच उपयोग होणार नाही हे तितकेच खरे आहे. नशिबाला नेहमी आपल्या प्रयत्नांची आणि सातत्याची जोड द्यायला हवी.- व्यंकटेश काटकर,नांदेड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••○○लहान झाड○○नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान  झाडाला विचारले, 'अरे, या वा-याने माझ्यासारखं मोठ झाड पाडलं, त्या  वा-याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास?             त्यावर लहान झाडाने उत्तर दिले , 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात  घेऊन मी वा-यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'तात्पर्य : समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे. तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते ब-याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment