✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक दृकश्राव्य वारसा दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९८६:युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.**१९७१:डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.**१९६१:मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५८:पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू**१९७८:प्रा.अश्विन सुरेश खांडेकर-- कवी लेखक**१९७७:कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९७६:सना पंडित --लेखिका**१९६८:सुदेश लहरी-- चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६५:संजय पाटील-- कवी**१९६५:मोहन कपूर-- भारतीय अभिनेता आणि टेलिव्हिजन होस्ट**१९६४:मार्क टेलर - माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५६:चंद्रशेखर पंडित -- लेखक* *१९५४:अरुणा पवार-चवरे -- कवयित्री (मृत्यू:२५ ऑक्टोबर २०१२)**१९५४:अनुराधा पौडवाल – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५४:रेखा भिवगडे-- कवयित्री**१९५२:डाॅ.आशा प्रभाकर कुलकर्णी-- कवयित्री,लेखिका* *१९५०:सीमा सुरेश गरसोळे -- गायिका, कवयित्री,लेखिका**१९४९:प्राचार्य पांडुरंग केशवराव गाडीलकर-- लेखक,संपादक* *१९४७:डॉ.विकास आमटे – महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक,लेखक**१९४५:प्राचार्य डॉ.नसीम महमद खान पठाण-- प्रसिद्ध लेखिका,विविध पुरस्काराने सन्मानित**१९४४:उषा प्रकाश ठाकरे-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९२८:माधव हरी पिटके -- लेखक**१९२३:अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू:३०आक्टोबर २०११)**१९२०:के.आर.नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू:९ नोव्हेंबर २००५)**१९०४:जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू:१३ सप्टेंबर १९२९)**१८७४:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – सुप्रसिद्ध कवी (मृत्यू:७ डिसेंबर १९४१)**१८५८:थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:६ जानेवारी १९१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:मदनलाल खुराना -- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री(जन्म:१५ऑक्टोबर१९३६)**२०१३:प्रा.डॉ.श्रीधर कृष्ण शनवारे-- मराठी कवी(जन्म:५ऑक्टोबर १९३५)**२००७:सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म:१९३१)**२००१:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार,विज्ञानकथाकार, (जन्म:३१ मे १९१०)**२००१:प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म:४ जानेवारी १९२५)**१९८७:विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म:१२ आक्टोबर १९११)**१९७४:चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म:९ जानेवारी १९३८)**१९६४:वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म:२६ आक्टोबर १८९१)**१९३७:’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म:११ नोव्हेंबर १८७२)**१७९५:सवाई माधवराव पेशवा (जन्म:१८ एप्रिल १७७४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*श्री संत नामदेव महाराज श्री संत नामदेव महाराज यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या नरसिबामणी या खेड्यात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव दामासेठ व आईचे नाव गोणाबाई होते.विठ्ठल भक्तीचा छंद त्यांनी सर्वांना लावला.भागवत धर्माचे पहिले प्रचारक म्हणून नामदेवांचे नांव घ्यावे लागेल.ज्ञानेश्वरा बरोबर नामदेवांनी तीर्थयात्रा केल्या.उत्तर भारतात पंजाब पर्यंत जाऊन तेथे विठ्ठल भक्ती पोहोचविली.त्यांची हिंदी भाषेतील कवने,शिखांच्या ग्रंथ साहेबात संग्रहित आहेत.नामदेवांची अनेक मंदिरे पंजाबात आहेत.नामदेवांचे म्हणता येतील असे सुमारे पाच सहाशे अभंगच आज उपलब्ध आहेत.त्यांच्या कोमल आणि भावमधुर काव्या मुळे मराठी साहित्यात भाव कवितेचे नवीन दालन उघडले.आज सहाशे वर्षां नंतर ही घराघरातून नामदेवांचे अभंग भक्तीने गायिले जात आहेत.विठ्ठल भक्तीचा छंद त्यांनी साऱ्या महाराष्ट्राला लावला.त्यांच्या घरातील दासी जनाबाई सुद्धा नामदेवांच्या सानिध्या मुळे अभंग रचू लागली आणि संत जनाबाई झाली.महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांना धार्मिक आणि सदाचारी बनवून पंढरपूर ची वारी दरवर्षी करणारा प्रचंड वारकरी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. वारकरी संप्रदायातील स्रेष्ट संत श्री नामदेव महाराज यांनी 3 जुलै 1350 या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महा द्वारात समाधी घेतली.विठ्ठल दर्शना साठी येणाऱ्या सर्व संत जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वारा च्या पहिल्या पायरी खालीच हे समाधी स्थांन तयार करण्यात आले आहे. अश्या थोर संताचे पुण्य स्मरण आणि त्यांना दंडवत।शब्दांकन :- सुरेखा खोत ( फेसबुक वरून साभार )~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'बारा सुसज्ज वातानुकूलित हॉल, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी साई मंदिरात दर्शन रांगेचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, मराठवाड्यातील 400 गावात उपोषण; अनेक ठिकाणी नेत्यांना 'गावबंदी'*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मैदानात, 1 नोव्हेंबरपासून काढणार 'एल्गार यात्रा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयांचा दर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चक्रीवादळ 'हामून' बनले धोकादायक ! पुढील 12 तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांच्या 89 व्या वर्षी निधन, आज नवी मुंबईत होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांदोबा मासिक*चंदामामा, चांदोबा, जन्हामामू, अंबुलीमामा अशा विविध नावाने भारतातील सुमारे 13 भाषांत प्रकाशित होणार्‍या चंदामामा या लहान मुलांच्या मासिकाला जुलै महिन्यात सुमारे 70 वर्षे पूर्ण झाली. या मासिकाचा पहिला अंक जुलै 1947 रोजी प्रकाशित झाला. या मासिकाचे संस्थापक संपादक होते बी. नागिरेड्डी तर कार्यकारी संपादक होते चक्रपाणी.प्रथम तेलुगू व तमिळ भाषेत ’अंबुलीमामा‘ या नावाने प्रकाशित झालेल्या या मासिकाने केवळ लहान मुलांतच नव्हे ते मोठ्या लोकांतही अमाप लोकप्रियता मिळवली. पौराणिक कथानके, मनोरंजक गोष्टी, आकर्षक चित्रे याने सजलेला चंदामामा पाहता पाहता प्रथम क्रमांकाचे लहान मुलांसाठीचे मासिक बनले. इंग्रजी, कन्‍नड, मराठी, मल्याळम, गुजराती, उडीया, सिंधी, बेंगाली, पंजाबी, आसामी, सिंहली, संस्कृत, व संथाली या भाषांतही हे मासिक प्रसिद्ध होऊ लागले.1947 ते 2006 म्हणजे सुमारे साठ वर्षे हे मासिक सुरू राहिले. मात्र, त्यानंतर या मासिकाचे हक्‍क दुसर्‍या कंपनीला विकण्यात आले. या मासिकाचा शेवटचा अंक 2013 साली प्रसिद्ध झाला. आता सुमारे सत्तर वर्षे उलटून गेली असली तरी या मासिकांची आबालवृद्धांमध्ये असलेली लोकप्रियता इतर कोणत्याही मासिकाने मिळवलेली नाही.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधानपदी असताना बॉयफ्रेंडपासून ब्रेकअप अशी जाहीर घोषणा करणाऱ्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?२) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मनाव काय होते ?३) भारतीय पायदळ दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम ( RRTP ) या योजनेंतर्गत नव्या जलदगती रेल्वे गाड्यांचे नामकरण कोणत्या नावाने करण्यात आले आहे ?५) वैनगंगा नदीचा उगम कुठे झाला आहे ? *उत्तरे :-* १) जॉर्जिया मेलोनी, इटली २) माणिक ३) २७ ऑक्टोबर ४) नमो भारत ५) दरेकसा टेकड्या, सिवनी, मध्यप्रदेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गीता विश्वास केदारे, साहित्यिक, मुंबई👤 नीता आरसुले, क्रियाशील शिक्षिका, जालना👤 मोहिनी रावजीवार👤 शिव गंगूलवार👤 ओम माळवतकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कोपआरोपणा ते नसावी। मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥ मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं। मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलताना तोलून मोलूनच बोलले पाहिजे. इतरांचे मन दुखेल असे बोलू नये. बोलण्यातून अर्वाच्य शब्द प्रयोग करु नये. आपल्या बोलण्यातून जेव्हा इतरांसाठी अर्वाच्य शब्द निघतात तेव्हा, त्या जिभेचा किंवा मुखाचा काहीही दोष नसतो. आपल्यात असलेल्या नको त्या दुर्गुणांचा दोष असतो. म्हणून म्हणतात ना की, बोलताना जरा विचार करूनच बोलावे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अपमानित करून बोलतो त्याचा आनंद जरी आपल्या बाह्य मनाला होत असेल पण, अंतर्मनाला होईलच असे नाही. कारण आपले अंतर्मन हे अनुभवी असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗  *तीन माशांची गोष्ट*📗 *स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.**तात्पर्य - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment