✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८७:फिजी प्रजासताक बनले.* *१९८१:इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या**१९७३:इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.**१९६३:पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.**१९४९:पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.**१९२७:’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.**१९०८:ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६ : विशाखा समाधान बोरकर-- कवयित्री,लेखिका* *१९८४: प्रा. शिवाजी जोगदंड-- कवी लेखक**१९८१:सतीश कोंडू खरात-- कवी* *१९७८:श्वेता मेहेंदळे-- मराठी अभिनेत्री**१९७२:सलील कुलकर्णी – संगीतकार**१९७०:प्रिया धारुरकर -- कवयित्री,लेखिका* *१९६७:खुशाल दादाराव गुल्हाने--कवी**१९६२:प्रदीप देविदासराव कुलकर्णी-- लेखक संपादक**१९५८:प्रा.डॉ.रमेश अंबादास जलतारे -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९४९:निरंजन हरिश्चंद्र उजगरे-- कवी, लेखक व अनुवादक(मृत्यू:१२ डिसेंबर २००४)**१९४८:नंदा अरुण कुलकर्णी-- कवयित्री**१९४६:विनोद खन्ना – प्रसिद्ध अभिनेते,चित्रपट निर्माते व माजी खासदार( मृत्यू:२७ एप्रिल २०१७)**१९४६:टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (मृत्यू:२९ डिसेंबर २०१२)**१९४५:देविदास रामचंद्र इंदापवार-- प्रसिद्ध कवी,लेखक,गायक* *१९४५:डॉ.सुरेश गरसोळे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४३:डॉ.रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक,साक्षेपी समीक्षक व संशोधक (मृत्यू:२० फेब्रुवारी २०१२)**१९३६: गोविंद गोपीनाथ कुलकर्णी -- लेखक, व्याख्याते* *१९३०:वसंत निनावे-- ज्येष्ठ गीतकार(मृत्यू: १० जून १९८८)**१९३०:रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक**१९१४:थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (मृत्यू:१८ एप्रिल २००२)**१९१३:वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – सुप्रसिद्ध कवी.तसेच अनेक ललित,स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत.(मृत्यू:८ सप्टेंबर १९९१)**१९१२:डॉ.हरी जीवन तथा एच.जे.अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ,प्राध्यापक (मृत्यू:२२ नोव्हेंबर २०००)**१८९३:मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्‍यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९५६)**१७७९:माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला. (मृत्यू:२० नोव्हेंबर १८५९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे माजी मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (जन्म:१५ जानेवारी १९२१)**२००७:एल.एम.सिंघवी – माजी लोकसभा सदस्य,कायदेपंडित,विद्वान,मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत(जन्म:९ नोव्हेंबर १९३१)**१९८१:अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२५ डिसेंबर १९१८)**१९७९:महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी (जन्म:५ ऑगस्ट १८९०)**१९७४:व्ही.के.कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री(जन्म:३ मे १८९६)**१९५१:विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (जन्म: ७ एप्रिल १८६०)**१८९२:लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (जन्म:६ ऑगस्ट १८०९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतातील कर्तृत्ववान महिला.... मदर तेरेसा ......मदर तेरेसा या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुस‍ऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले.पुढील भागात - डॉ. आनंदी गोपाळ जोशीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, लेखक जॉन फॉस्से यांच्या कार्याचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी मुंबई मेट्रोचं लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता, सीबीडी बेलापूर ते पेंढर पहिला टप्पा पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, 'मविआ'ने मंजुरी दिलेली विकासकामं रोखण्याचा निर्णय मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत, संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठमोळ्या ओजसला पुन्हा सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 21 गोल्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला नऊ विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये. (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकतात. "*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत ?२) 'धाराशिव' या नावाने कोणत्या शहराचे नामकरण झाले आहे ?३) भारतात कोणत्या नदीवर सर्वात लांब रस्ता पूल बनवला आहे ?४) जीवनसत्त्व 'ड' चे रासायनिक नाव काय आहे ?५) शिवरायांनी शाहिस्तेखानाची काय छाटले होते ?*उत्तरे :-* १) १०३ राष्ट्रीय उद्याने २) उस्मानाबाद ३) गंगा नदी ४) कॅल्सीफेरॉल ५) बोटे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रकाश नागोराव चरपिलवार👤 श्वेता अंबाडकर👤 योगेश पाटील संगेपवाड👤 दशरथ बोईनवाड👤 माधव हाक्के👤 प्रा. शिवाजी जोगदंड👤 गोविंदराव धुतीवाले👤 मारोती रेड्डी👤 संभाजी मारोतराव हिवराळे👤 सूर्यकांत मोळे👤 रामरेड्डी अरकलवार👤 नागभूषण भालेराव👤 चिं. मेदांश शिवा वसमतकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।जपे रामनामावळी नित्यकाळीं॥पिता पापरुपी तया देखवेना।जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारवेध*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाने जीवनात वृक्ष बनून प्रत्येकाला सावलीचा आधार देण्याची भूमिका करावी.कारण वृक्ष कधीच स्वार्थी भूमिका करत नाहीत.ते नेहमीच परोपकारी वृत्तीची भूमिका करत असतात.प्रत्येक जीवाला स्वतः अंगावर ऊन झेलून सावली देतात,भूकेल्यांना फळांच्या रुपाने अन्न देतात,एवढेच नाही तर जमीनीची धूप थांबविण्यासाठी प्रयत्न करत प्रत्येक जीवाला शुद्ध हवा देत पर्यावरणाच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण करतात.अर्थात काहीच अपेक्षा न करता ते सतत देण्याचे काम करतात.म्हणून वृक्षासारखे माणसाने देखील अपेक्षा न ठेवता काहीनाकाही इतरांना देण्याचा गुण शिकायला हवा.- व्यंकटेश काटकर, नांदेड🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●○यशप्राप्ती○●एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.  स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.*तात्पर्य :- कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.एका दिवसात यश प्राप्त होत नाही.सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment