✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक टपाल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.**१९६२:युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०:विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१८०६:प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:श्रीरंजन आवटे -- लेखक* *१९९०:लखन माणिक जाधव-- कवी,लेखक**१९६५:मोनिका अभिजित गजेंद्रगडकर-- प्रसिद्ध कथाकार**१९६४:प्रा.डॉ.ईश्वर केशवराव सोमनाथे-- लेखक* *१९५८:गोकुळ धनाजी वाडेकर -- कवी, लेखक* *१९५८:भुजंग मेश्राम-- प्रसिद्ध कवी ( मृत्यू:२७ ऑगस्ट २००७)**१९५६:प्रदीप दाते -- अध्यक्ष,विदर्भ साहित्‍य संघ,नागपूर* *१९५२:रेखा खराबे -- कवयित्री,लेखिका**१९५०:प्रा.सुबोध वसंतराव बल्लाळ-- लेखक**१९४५:अमजद अली खान-- प्रसिद्ध सरोद वादक,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४५:पंडित माधवराव हिंगे--कवी* *१९४३:प्रा.प्रकाश कामतीकर-- पत्रकार,संपादक,चित्रकार,लेखक* *१९४२:देविदास सखाराम चव्हाण-- लेखक**१९३९:महेश एलकुंचवार-- सुप्रसिद्ध नामवंत नाटककार व प्रतिभावंत लेखक**१९३५:रवी परांजपे-- चित्रकार,बोधचित्रकार, लेखक (मृत्यू:११ जून २०२२)* *१९३०:डॉ.वसंत सखाराम जोशी-- प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक(मृत्यू:१६ नोव्हेंबर २०१७)* *१९११: दत्तात्रय विनायक गुप्ते--लेखक**१८९३:शिवराम श्रीपाद वाशीकर--- कथा-पटकथा-संवादलेखक(मृत्यू:२३ जून १९६१)**१८७७:पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते,स्वातंत्र्यसेनानी,कवी व लेखक (मृत्यू:१७ जून १९२८)**१८७६:पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक (मृत्यू:४ जून १९४७)**१८५२:एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:१५ जुलै १९१९)**१७५७:चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)* *_ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५: रवींद्र जैन--हिंदी चित्रपटांचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार(जन्म:२८ फेब्रुवारी १९४४)* *२००८:प्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ स.रा. गाडगीळ--मराठीतील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक(जन्म:८ ऑगस्ट १९१६)**१९९९:अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.(जन्म:१८ सप्टेंबर १९१५)**१९९८:जयवंत पाठारे –गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer)* *१९८९:विद्याधर गंगाधर पुंडलिक--मराठीतील एक प्रतिभावान लेखक (जन्म:१३ डिसेंबर १९२४)* *१९८७:गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (जन्म:२४ जून १९०८)**१९५५:गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार,नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार(जन्म:५ जून १८८१)**१९१४:विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे,कविता,निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्‌मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्‍नास पुस्तके प्रसिद्ध झाली.(जन्म:२५ फेब्रुवारी १८४०)**१८९२:रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.(जन्म:१८ फेब्रुवारी १८२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*पहिली भारतीय महिला अंतराळवीर - कल्पना चावला17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. 1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली. 22 मिनिटांत कोलंबिया यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं तो दिवस होता 1 फेब्रुवारी 2003.तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं त्यात कल्पना चावला यांचा ही समावेश होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील निराधारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात केली वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढण्याची शक्यता; गेल्या 13 वर्षांतील सर्वोच्च दर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईची हवा खराब! मान्सून माघारी फिरल्यानंतर हवेची गुणवत्ता खालवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाशिकमध्ये मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यलो मोझॅकमुळं 60 ते 70 टक्के सोयाबीन वाया, विदर्भातील बळरीजा संकटात; महसूल मंत्री विखे पाटलांनी केली पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जातीशी गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही, शेवटपर्यंत राजकारणात जाणार नाही, मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यदायी टिप्स .....*कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे. तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) साहित्याचा २०२३ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारताबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे ?३) 'मिस वर्ल्ड' या स्पर्धेला कोणत्या वर्षी सुरूवात झाली ?४) हिऱ्याचा सर्वाधिक वापर कशासाठी केला जातो ?५) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) जॉन फॉस, लेखक, नार्वे २) मेरीलँड, वॉशिंग्टन, अमेरिका ( १९ फूट ) ३) सन १९५१ ४) दागिने ५) गुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नागनाथ बळीराम शिंदे, शिक्षक, धर्माबाद👤 नागेश अशोक धावडे👤 हणमंत सावंत👤 पिंटू कटलम👤 कु. स्नेहल श्यामसुंदर ढगे, चिरली👤 कु. पल्लवी मदन ढगे, चिरली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी। तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥ मुखे रामनामावळी नित्य काळीं। जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 विचारवेध............✍🏻🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घन पदार्थ असो किंवा द्रवपदार्थ असो त्यांना एका विशिष्ट परिमाणाने मोजता येते.परंतु मानवी मनाला मात्र कोणतेही परिमाण नाही.अशा मनाला लांबी,रुंदी,उंची आणि वजनही नाही.मग मनाचे जर कोणते परिमाण असेल तर ज्या मनाने माणसे जोडली जातात त्यावरुन मनाचे वजन किती आहे ते कळेल,ज्यांच्याबद्दल प्रेम आहे,आपुलकी आहे जिव्हाळा आहे आणि त्याचा प्रत्येक माणसाच्या हृदयाशी नि सुखदुःखाशी संबंध आहे ते एक मन मोजण्याचे परिमाण आहे.मनाचे परिमाण नसले तरी मनाचा संकुचितपणा आणि मोठेपणा हे मात्र माणूस माणसांमध्ये वावरत असताना नक्कीच कळतो की,माणसाचे वजन किती आहे.मन निर्मळ,पवित्र आणि लाघवी असले की,बाकीच्या परिमाणाची काहीच गरज नाही.व्यंकटेश काटकर नांदेड संवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○○ समुद्रातील मासा ○○*एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहुन गेला. समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला,'देश, जात, कुळ  या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.              तेव्हा हे लक्षात  घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा'. त्यावर समुद्रातील एक मासा  त्याला म्हणाला,  'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस.  जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघेही जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण  ते कळेल.कोळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक  खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल.तात्पर्य : नुसत्या जात कुळ ह्यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते .https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment