✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 नोव्हेंबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक शाकाहार दिन_**_ या वर्षातील ३०५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००:सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९९९:कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कबीर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर**१९९४:मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड**१९८२:अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.होंडा मोटार कंपनीने मेरिज्‌व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अ‍ॅकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.**१९७३:‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.**१९७३:लखदीप,मिनिकॉय,अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप' असे ठेवण्यात आले.**१९६६:पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा  राज्यात विभागणी झाली.**१९५६:भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.**१९५६:दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.**१९५६:केरळ राज्य स्थापना दिन**१९५६:कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.**१९५३:आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.**१९४५:ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१८४८:महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.**१८४५:’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा,मुंबई येथे सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:वी.वी.एस.लक्ष्मण – भारतीय क्रिकेटपटू**१९७३:धनाजी जनार्दन बुटेरे-- कवी,लेखक* *१९७३:ऐश्वर्या राय – अभिनेत्री**१९६५:पद्मिनी कोल्हापुरे-- भारतीय अभिनेत्री आणि गायिका**१९६४:डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी-- प्रसिद्ध कवी,सुप्रसिद्ध विनोदी लेखक* *१९५८:डॉ. कमलेश सोमण -- लेखक,समीक्षक,अनुवादक* *१९५८:शंकर वाडेवाले -- कवी,लेखक* *१९५७:डॉ.जिजा दौलतराव सोनवणे-- लेखिका* *१९५४:चारुदत्त दुखंडे -- मालिका,चित्रपट आणि माहितीपटांचे छाया दिग्दर्शक(मृत्यू:२७ मार्च २०१९)**१९४५:खलिल गुलामभाई मोमीन -- प्रसिद्ध कवी,गझलकार* *१९४५:नरेंद्र अच्युत दाभोलकर-- सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार (मृत्यू:२०ऑगस्ट २०१३)**१९४०:रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश**१९३८:प्रा.सुहास हरी जोशी--ज्येष्ठ इतिहास संशोधक,लेखक* *१९३६:किशोर अमृतराव प्रधान-- भारतीय मराठी चित्रपट आणि थिएटर अभिनेते, मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक (मृत्यू:१२ जानेवारी १९१९)**१९३२:रघुनाथ पांडुरंग जोशी-- लेखक**१९३२:अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (मृत्यू:२५ सप्टेंबर २००४)**१९२६:यशवंत देव – संगीतकार,गीतकार व लेखक (मृत्यू:३० ऑक्टोबर, २०१८)**१९२१:गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी(मृत्यू:२८ नोव्हेंबर २००५)**१९२१:शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (मृत्यू:२१ ऑगस्ट २००१)**१९१५:श्रीकृष्ण विठ्ठल गंधे (मामासाहेब)-- क्रीडा,साहित्य,प्रशासन,प्रकाशन,संपादन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य (मृत्यू:१३ ऑक्टोबर २००१)* *१८९३:इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (मृत्यू:१३ नोव्हेंबर १९५६)**१८८८:पुरुषोत्तम श्रीपद काळे -- चित्रकार, रंगभूमिविषयकग्रंथाचे लेखन(मृत्यू:२८ सप्टेंबर १९७६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५:योगिनी जोगळेकर –मराठी लेखिका, कवयित्री आणि शास्त्रीय गायिका(जन्म:६ ऑगस्ट १९२५)**१९९६:ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१७ सप्टेंबर १९०६)**१९९४:कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ,कामगार नेते (जन्म:१९१८)**१९९३:नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका* *१९९१:अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक(जन्म:२७ ऑक्टोबर,१९५४)**१९७८:हरिहर गुरुनाथ कुलकर्णी (कुंजविहारी) कवी (जन्म:१० नोव्हेंबर १८९६)**१९५०:विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक(जन्म:१२ सप्टेंबर १८९४)**१८७३:दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार (जन्म:१८२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*...... संत जनाबाई ......संत जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्याखेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे पंधरा माणसांचे हे कुटुंब होते. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.संकलन :- नासा येवतीकर( वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. )~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण - शाहू महाराज छत्रपतींनी मनोज जरांगेंची घेतली भेट. सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, शाहू महाराजांचं जरांगेंशी संभाषण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान मोदींकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांना पुष्पांजली, गुजरातसाठी 5950 कोटींची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धाराशिवमध्ये पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची 53 दिवसांनी तुरुंगातून झाली सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पाकिस्तानने बांगलादेशवर 7 विकेटनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमलादेवी चटोपाध्याय* कमलादेवी चटोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 साली मंगलोर येथे झाला.मद्रास येथे कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांचा विवाह इंग्रजीतील नामवंत कवी श्री हरींद्रनाथ चटोपाध्याय यांचे बरोबर झाला.पति बरोबर त्या इंग्लंड ला गेल्या.तेथे त्यांनी समाजशास्त्र व इंग्लिश रंगभूमी चा अभ्यास सुरू केला.त्याच दिवसात महात्मा गांधीजी च्या असहकार चळवळीने जोर पकडला होता.भारतातील बातम्या एकून, इंग्लंड मधील अभ्यासक्रम मधेच सोडून त्या भारतात परतल्या. भारतात परत आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला , त्यांना तुरुंगवास ही झाला.काही दिवसांनी त्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पक्षात प्रवेश केला. कमला देवींनी कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.भारतीय स्त्री परिषद ही संघटना स्थापन केली.स्त्रियांच्या जागृती साठी आणि उन्नती साठी त्यांनी प्रयत्न केले.स्त्रियांच्या साठी करीत असलेल्या कार्या ची जाण ठेवत भारत सरकार ने त्यांना भारतीय स्त्रियांचे प्रतिनिधी म्हणून बर्लिन,जीनेव्हा,प्राग इत्यादी ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांना पाठविले.परदेशातही त्यांनी आपल्या विचारांची आपल्या लिखाणा द्वारे छाप पाडली.त्यांनी केलेल्या स्त्री उन्नती साठी च्या कार्या बद्दल त्यांना 1962 मध्ये " बाबूमल" पुरस्कार तर 1966 साली त्यांना " मॅगसेस"पुरस्कार देण्यात आला.29 ऑक्टोबर 1988 साली त्यांचे निधन झाले. स्त्री अधिकारा विषयी जागृत असलेल्या व ते स्त्री ला मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या कमलादेवी यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शाती आणि आनंद विनामूल्य मिळवण्यासाठी सर्वांना नेहमी मदत करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला जागतिक अन्न पुरस्कार १९८७ मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला ?२) पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?३) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणकोणते बालछंद होते ?४) भारताचे लष्करप्रमुख कोण आहेत ?५) जगातील कोणत्या ठिकाणाला 'विमानांची स्मशानभूमी' म्हणून ओळखली जाते ? *उत्तरे :-* १) डॉ. एम. एस. स्वामिनाथन, भारत २) राष्ट्रपती ३) एकांती ध्यान, लोकांती कविता कीर्तन ४) जनरल मनोज पांडे ५) डेव्हिस मांथन एअरबेस, अरिझोना ( ४५०० विमाने एकत्र ठेवलेली आहेत. )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 लक्ष्मीकांत बामणीकर, शिक्षक, नांदेड👤 संजय कांबळे खडकीकर, गटसमन्वयक, माहूर जि. नांदेड👤 प्रशांत सुरवसे👤 राहुल संत👤 ऋषिकेश मंदेवाड👤 संतोष डिके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥हितकारणे बंड पाखांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांकडून वारंवार मदत घ्यायची आपल्याला सवय झाली की, मग तिचे रूपांतर सवयीत होते. अशा प्रकारची, सवय लावून घेण्याऐवजी थोडेतरी इतरांना मदत करण्याची परोपकार वृत्ती ठेवावी व ते कार्य करण्यासाठी आपले मन मोठे असावे लागते. आजच्या घडीला संतोषी वृत्तीची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु‌. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक कवी व श्रीमंत माणूस* *एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या. कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतू तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मीही तुम्हाला खुश करून टाकेन. बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला.दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना,अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला,कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केलं, प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही, मीही तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला.या आता परत केव्हातरी.बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगीतली.बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत ही घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतू बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला, जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो, उद्या माझ्या घरी जेवायला या,कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment