✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक अन्न दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_जागतिक बधिरीकरण दिन किंवा जागतिक भूल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.**१९८४:आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९७५:बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.**१९७३:हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९६८:हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान**१९५१:पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.**१९२३:वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी ’द वॉल्ट डिस्‍ने कंपनी’ची स्थापना केली.**१९०५:भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.**१८६८:डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.**१८४६:डॉ.जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.**१७९३:फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.**१७७५:ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७१: कुंडलिक कनिराम पवार -- कवी,लेखक* *१९६५:भवानी शंकर-- भारतीय पखवाज ढोल वादक* *१९६१:जयश्री सुधीर देसाई-- लेखिका, अनुवादक**१९६०:डॉ.रमा मराठे-- लेखिका,कवयित्री* *१९५९:अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष(मृत्यू:३ जून २०१०)**१९५४:मंजुषा मनोहर शिनखेडे--कवयित्री, लेखिका**१९५०:अशोक श्रीधर थोरे -- कादंबरीकार* *१९४८:हेमा मालिनी –अभिनेत्री,दिग्दर्शिका, निर्माती,भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक**१९४०:नरेंद्र चंचल-- भारतीय गायक होते ज्यांना धार्मिक गाणी आणि भजन यात विशेष प्राविण्य प्राप्त(मृत्यू:२२ जानेवारी २०२१)**१९३६:वसंत दामोदर भट-- लेखक, व्याख्याते**१९१७:इंदुमती रामकृष्ण शेवडे--कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार, संशोधक, समीक्षक(मृत्यू:१४ मार्च १९९२)**१९१६:शकुंतला ना.दिवाणजी -- लेखिका* *१९१५: भानुदास बळीराम शिरधनकर-- लेखक(मृत्यू:१२ एप्रिल १९७७)**१९०७:सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(मृत्यू:४ आक्टोबर १९८२)**१८९६:सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (मृत्यू:१८ जून १९७४)**१८९०:अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर,संपादक,थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक,(मृत्यू:३ सप्टेंबर १९६७)**१८८६:गिरिजाबाई महादेव केळकर-- कादंबरीकार,नाटककार(मृत्यू:२५ फेब्रुवारी १९८०)**१८५४:ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार,(मृत्यू:३० नोव्हेंबर १९००)**१८४१:इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू:२६ आक्टोबर १९०९)**१६७०:बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू:९ जून १७१६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गो.पु.)-- मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक(जन्म:२ ऑगस्ट, १९३८)**२००२:नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक(मृत्यू:२३ नोव्हेंबर १९२३)**१९९७:दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक* *१९८१:मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (जन्म:२० मे १९१५)**१९५१:पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (जन्म:१ आक्टोबर १८९५)**१९५०:वि.गं.तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक* *१९४८:माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म:१८८५)**१९४४:गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, 'प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म:१८८७)**१७९३:मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (जन्म:२ नोव्हेंबर १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*... माहूरची रेणुकादेवी ....देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूर गडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला.माता रेणुकाची एक कथा आहे - या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या  मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर ' म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील 'ऊर' गाव असल्यामुळे 'माऊर' आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते.पुढील भागात - तुळजापूरची तुळजाभवानीसंकलन - ~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना, नऊ दिवस भाविकांची मंदिरात दर्शनासाठी होणार गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवाब मलिकांच्या जागी राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी, शरद पवार गटाकडून नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली एनसीआर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. दिल्ली, गाझियाबाद, नोएडामध्ये 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, संभाजीनगरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यभरात ईडीची मोठी कारवाई, ईडीकडून 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोडमध्ये ईडीची झाडाझडती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण, वारकऱ्यांकडून पंढरपूरमध्ये भव्य ग्रंथदिंडीचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विजयाचा चौकार मारण्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; पुणेकरांमध्ये वर्ल्डकप सामन्याची उत्सुकता शिगेला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्री, देवी दुर्गा देवीच्या उपासनेला समर्पित नऊ दिवसांचा सण, हा भारतातील सर्वात प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. हा मोठा आनंद आणि उत्साहाचा काळ आहे आणि देशभरातील लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. जर तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान भारताला भेट देण्याचा विचार करत असाल, तर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना भेट देण्याचा विचार करावा. गुजरात .......गुजरात त्याच्या भव्य नवरात्र उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे, विशेषत: अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत. नवरात्री दरम्यान, राज्याचा पारंपारिक नृत्य प्रकार, गरबा, मोठ्या उत्साहात, आपण रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले लोक पाहू शकता. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा देखील होतात, ज्यामुळे तो एक्सप्लोर करण्यासाठी एक रोमांचक वेळ बनतो. नवरात्रीच्या उत्सवासाठी गुजरातमध्ये भेट देण्यासाठी ही ठिकाणे पहा - वडोदरा, युनायटेड वे ऑफ बडोदा, बडोदा विद्यापीठ, शिशू सांस्कृतिक गरबा, अहमदाबाद, भद्रा किल्ला*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सोपं आहे, लोकं गुंतागुंतीचं आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्र विशेष प्रश्नमंजुषा१) रेणुकादेवी मंदीर कोठे आहे ?२) तुळजाभवानी मंदीर कोठे आहे ?३) अंबाबाईचे मंदीर कोठे आहे ?४) सप्तश्रृंगी देवीचे मंदीर कोठे आहे ?५) एकविरा आईचे मंदीर कोठे आहे ? *उत्तरे :- १) माहूर जि. नांदेड २) तुळजापूर जि. उस्मानाबाद ३) कोल्हापूर ४) वणी जि. नाशिक ५) लोणावळा**संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विशाल धनगर👤 राम भांगे मुगटकर👤 दत्तप्रसाद यंगुलदास, विजय स्टेशनरी सप्लायर्स, नांदेड👤 साईकुमार शिंदे पाटील👤 संदीप अकोलकर👤 दिगंबर शिंदे पाटील👤 साईनाथ कळसे पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥दया सर्वभुतीं जया मानवाला।सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सरड्याची धाव जरी कुंपना पर्यत मर्यादित असेल तरी तो सरडा त्या कुपंनाशी कधीच बेईमानी करत नाही. कारण त्याला माहीत असते की, मला वेळोवेळी या तुटक्या, फाटव्या कुंपनानेच साथ दिली. म्हणून तो त्याला क्षणभरासाठी सुद्धा विसरत नाही. म्हणून नुसते त्या सरड्याला नाव न ठेवता त्याकडून शिकले पाहिजे भलाही तो, सरडा बोलत नसेल तरी आजच्या या बोलत्या, चालत्या माणसाला खूप काही शिकायला भाग पाडते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇● धनाचा विनियोग ●◇◇एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता. कोल्‍ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.'' नाग म्‍हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्‍हणाला,'' कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,'' मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''तात्‍पर्य - ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment