✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक अंतराळ सप्ताह_* *_जागतिक प्राणी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८३:नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.**१९५७:सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.**१९५९:सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.**१९४३:दुसष,रे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.**१९४०:’ब्रेनर पास’ येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.**१९२७:गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.**१८२४:मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:गौतम राजू ढोके--कवी* *१९७५:संगीता उत्तमराव भांडवले--कवयित्री लेखिका**१९६७:शशिकांत शिंदे-- कवी* *१९५२:शैलेंद्र सिंग-- भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता**१९५१:मुकुंद मोरेश्वर टाकसाळे--विनोदी लेखन करणारे लेखक**१९५०:प्रा.डॉ.कल्पना सुरेश व्यवहारे -- लेखिका(मृत्यू:२०१४)**१९४९:छगनलाल फौजी पंचे-- कवी* *१९४८:विजय वसंतराव पाडळकर- समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार**१९४४:गुफी पेंटल वालिया-- भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक (मृत्यू:५ जून २०२३)**१९४२: पुष्पा चंद्रकांत देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१९४०: माधुरी वासुदेव चौकीदार -- लेखिका, कथाकार* *१९३७:सुधाकर विनायक जोशी-- लेखक* *१९३७:जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री**१९३५:अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू:२१ जून १९८४)**१९२८:ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक (मृत्यू:२७ जून २०१६)**१९२२:सदानंद महादेव पेठे--लेखक**१९१६:धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक**१९१४:मधुकर वासुदेव धोंड--मराठी समीक्षक(मृत्यू:५ डिसेंबर २००७)**१९१३:सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू:१० आक्टोबर २००६)**१९११:नारायण गजानन जोशी-- कवी, छंदःशास्त्राचे अभ्यासक(मृत्यू:८ सप्टेंबर १९८६)**१८२२:रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१७ जानेवारी १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म:२३ आक्टोबर १९२४)**१९८२:सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(जन्म:१६ आक्टोबर १९०७)**१९७६:वासुदेव वामन भोळे--कथाकार, नाटककार,नाट्यसमीक्षक(जन्म:३० सप्टेंबर १८९३)**१९६६:अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (जन्म:१ डिसेंबर १९११)**१९४७:मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म:२३ एप्रिल १८५८)**१९२१:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(जन्म:९ ऑगस्ट १८९०)**१६६९:रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म:१५ जुलै १६०६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला**राजमाता जिजाऊ भोसले*भारताच्या वीर माता जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याजवळील निजामशाहच्या सिंदखेड येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधवराव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाबाईंना लहानपणी जिजाऊ म्हणून संबोधले जायचे.त्या काळी बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळे जिजाबाईंचा विवाहही अगदी लहान वयातच झाला होता. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. शहाजी राजे भोसले हे विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या दरबारातील सेनापती आणि शूर योद्धा होते. जिजाऊ यांनी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारतातील धाडसी व शौर्याच्या गोष्टी सांगून मोठे केले आणि त्यांच्यामध्ये असे गुण निर्माण केले, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि निर्भय योद्धा ठरले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी, भाला चालवण्याची कला, घोडेस्वारी, स्वसंरक्षण, युद्धकौशल्य यात पारंगत केले.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच पुढे शिवाजी महाराज समाजाचे रक्षक आणि अभिमान बनले. आणि त्यांनी हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि एका स्वतंत्र व महान राज्यकर्त्याप्रमाणे त्यांचे नाव तयार झाले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.पुढील भागात - अहिल्याबाई होळकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिवाळीनिमित्त 100 रुपयात आनंदाचा शिधा, मैदा आणि पोह्याचा देखील समावेश; मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी मोदींना पंतप्रधान बनवणे महत्त्वाचे, आवश्यकतेप्रमाणे त्याग करा; देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य सरकारकडून आतापर्यंत करण्यात येत असलेल्या तीन विभागांच्या भरती प्रक्रियेमधून 266 कोटी रुपयांचे शुल्क जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी तोडगा काढत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asian Games 2023 : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, नेपाळचा 23 धावांनी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले निर्णय अनुभवातून येतात आणि अनुभव चुकीच्या निर्णयांमधून येतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक शांततेचे महान दूत' म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?२) जागतिक प्राणी दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले व्यक्ती कोण ?४) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सेनापती म्हणून कोणाची नेमणूक केली ?५) आंतरराष्ट्रीय टी - २० मधील सर्वात जास्त धावा कोणत्या संघाने पटकावल्या ? *उत्तरे :-* १) महात्मा गांधी २) ४ ऑक्टोबर ३) लालबहादूर शास्त्री ( १९६६ ) ४) तुकोजीराव होळकर ५) नेपाळ, मंगोलिया विरुद्ध ( ३१४ धावा )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विजय पळशीकर👤 ओमप्रकाश येवतीवाड👤 लक्ष्मण पंदोरे👤 साईनाथ पोरडवार👤 सौ संगिता भांडवले, शिक्षिका, उस्मानाबाद👤 सुरेंद्र माणिकराव गाडेकर👤 धनराज शेट्टीगर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां। निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥ जपे आदरें पार्वती विश्वमाता। म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांशी तुलना करण्यापेक्षास्वकर्तुत्वावर विश्वास ठेवून आपण थोरांचे व ज्यांनी स्वबळावर आपले जीवन जगून जो आदर्श निर्माण केला आहे तसे वागण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. इतरांशी तुलना करताना त्या व्यक्तींनी आपल्या जीवनात पदोपदी किती त्रास सहन केला असेल..सोबत आपत्ती, वाईट परिस्थिती, अडीअडचणी व संघर्ष कशाप्रकारे करून जगून दाखवले असेल किंवा आजही जगत असेल.. या विषयावर ची संपूर्ण माहीती आधी शोधून काढावी. बरेचदा बोलणं सोपे असते पण, त्याप्रकारचे जीवन जगणे तेवढेच कठीण असते. म्हणून बोलण्याआधी व तसे विचार करण्याआधी त्या सर्वच गोष्टी समजून घेतले पाहिजे.कारण फुले तर. .बरेच फुलत असतात पण,सर्वच‌ फुलांचा जन्म काट्यातून होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मोठ्या भावाचा रुमाल*राजू तिसरीच्या वर्गात शिकतो, त्याचा मोठा भाऊ कार्तिकही त्याच शाळेत पाचवीत शिकतो. दोन्ही भाऊ एकत्र शाळेत जायचे. दोघेही वाटेत खूप मस्ती करायचे. कार्तिककडे रुमाल होता, तो नेहमी डेटॉलने धुवून स्वच्छ ठेवायचा. राजू नेहमी भावाकडे पाहतो, त्याला वाटतं भाऊ रुमाल सोबत ठेवतो का ? थोडी घाण असेल तर साफ करायची आणि मग दुमडून खिशात ठेवायची. रुमालाचा गोंधळ त्याला आवडला नाही. राजूला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या, मोठा भाऊ असं का करतो, असं त्याला वाटायचं, पण त्याला कधीच कळलं नाही. एकदा राजू झुल्यावर डोलत होता, तेव्हा झुल्याचा हात सुटला आणि तो जमिनीवर पडला. जमिनीवर पडताच राजूच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या गुडघ्यातून रक्त वाहू लागले. कार्तिकने आपल्या भावाला पाहताच तो पटकन धावत आला आणि खिशातून रुमाल काढून जखमेवर बांधला. त्यामुळे रक्तस्त्राव थांबला. कार्तिक ताबडतोब त्याच्या भावाला दवाखान्यात घेऊन गेला तिथे डॉक्टरांनी मलम लावून राजूला बरे केले. राजूने तो रुमाल पाहिला जो भाऊ स्वच्छ करून नेहमी सोबत ठेवत असे. ज्याच्यावर तो खूप प्रेम करत होता, तो आता गलिच्छ झाला होता. मोठ्या भावाच्या प्रेमापुढे तो रुमाल फारसा गोंडस नव्हता.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment