🌹🌹🌹🌹🌹🌹 *🌺जीवन विचार*🌺 *〰〰〰〰〰〰〰* *"प्रयत्न तो देव जाणाव"* *"देवासकट सर्वकाही प्राप्त करून देण्याच"* *सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून* *प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय".* *प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की , *प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो.थोडक्यात प्रयत्न करीत रहाणे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून त्रिकालबाधित निसर्गनियमांशी ते सुसंगत आहे. "प्रयत्न करून यश मिळणे हा नियम आहे" हे सत्य माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य दिशेने होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत . नुसते कष्ट केल्याने किंवा प्रयत्न केल्याने यश मिळत नसते . अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्याने माणसाला यशाचे शिखर लवकर गाठता येते.* *थोडक्यात अभ्यासपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने माणसांना जे धन व यश प्राप्त होते , ते त्यांना सुख शांती , समाधान , यश व समृद्धी प्राप्त करून तर देतेच शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो. कोणतीही गोष्ट सातत्याने प्रयत्नपूर्वक केली असता यश नक्कीच प्राप्त होते.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड *~~~~~~~~~~~~~~* http://www.pramilasenkude.blogspot.in ~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment