✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-   १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :-  १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी.  💥 मृत्यू :-   १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत चालणार आहे- सुमित्रा महाजन* ----------------------------------------------------- 2⃣ *जकार्ता : भारताची फुलराणी सायना नेहवालचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत झाला पराभव* ----------------------------------------------------- 3⃣ *दिल्लीच्या राजपथावर फडकला भगवा, प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला प्रथम क्रमांक* ----------------------------------------------------- 4⃣ *ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या वर्षी नव्या शब्दाच्या रूपात 'आधार' ला  मिळाली जागा* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला गती द्या; मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ : उमरखेड येथे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं उद्घाटन.* ----------------------------------------------------- 7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर 63 धावांनी मात करत मालिकेचा अखेर गोड केला आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========       *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= थॉमस पेन (अंग्रेज़ी: Thomas Paine, जन्म: 9 फ़रवरी 1737, देहांत: 8 जून 1809) एक लेखक, अविष्कारक, बुद्धिजीवी, क्रांतिकारी और संयुक्त राज्य अमेरिका के राष्ट्रपिताओं में से एक थे। उनका जन्म इंग्लैण्ड के नॉर्फ़ककाउंटी (ज़िले) के थ़ॅटफ़र्ड शहर में हुआ था और सन् 1774 में वे इंग्लैण्ड छोड़ अमेरिका में जा बसे। उन्होंने सन् 1776 की अमेरिकी क्रांति में अहम भूमिका निभाई। उन्होने अमेरिका में क्रांति की उठती लहर को अपनी लिखाई के ज़रिये अपनी राजनैतिक सोच का ढाँचा दिया। उनकी दो सब से प्रभावशाली लिखईयाँ थीं - "आम सूझबूझ" (Common Sense, कॉमन सॅन्स) नाम की पुस्तिका जिसमें अमेरिका की ब्रिटेनसे आज़ादी की दलील दी गई"अमेरिकी बवंडर" (The American Crisis, द अमॅरिकन क्राइसिस) नाम की पत्रिकाएँ जो 1776-1783 तक चलीं और जिनमें अमेरिका की क्रांति की भारी हिमायत की गई "कॉमन सॅन्स" अमेरिका में स्वतंत्रता के लिए जागरूकता लाने में इतनी कामयाब हुई के जॉन ऐडम्स (अमेरिका के दूसरे राष्ट्रपति) ने कहा के "कॉमन सॅन्स के लेखक की क़लम के बिना वाशिंगटन का तलवार उठाना बेकार जाता"। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *"" फ्रेश सुविचार ""* =========ஜ۩۞۩ஜ========= मोठा विचार केला तरच मोठे बनू शकाल *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)मुंडा आदिवासी जमात अधिक वास्तव्य असणारे राज्य कोणते?* 👉   झारखंड *२)  दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?* 👉    संयूग  *३)संयूगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या सौजन्या व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयूगाच्या केलेल्या लेखनास काय म्हणतात?* 👉   रेणूसुत्र  *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील वानखेडे, सहशिक्षक, किनवट 👤 वीरभद्र कारे 👤 कोंडीराम केशवे 👤 नरेंद्र जोशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *झाड लावणारा* झाड लावणाराच आज उन्हात उभा आहे  नवख्या माणसाचा  झाडावर ताबा आहे  झाड न लावता फळाची  काही आशा धरतात झाड लावणाराला  हळूच बाजूला करतात       शरद ठाकर     सेलू जि परभणी     8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.*  *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••              🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========  जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही. कामाचा दर्जाही घसरेल, मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========               *प्रत्यक्ष अनुभव* *साप, डोक,शेपुट* (तीन शब्दांवरुन कथा) एकदा एका सापाच्या शेपटाने त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्‍या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.' हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्‍न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला. ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली. साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले. तात्पर्य प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment