*माकडा , कोल्हा व जंगल* (प्राणी) एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची जंगलात 🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 भेट झाली तेव्हा माकड🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देतोसका तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन. मला त्याचा उपयोग होईल.तुझे शेपूट खूप झुबकेदार आहे.तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे माकडा तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.' तात्पर्यः काही स्वार्थी प्रवृत्तीचा माणसांजवळ सर्व असून पण ते दुसऱ्याचा उपयोगी येत नाही.खर तर माणसाने इतरांच्या मदतीला कसे जाता येईल हा विचार नेहमी ध्यानीमनी ठेवून जगावे. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment