*तयास मानव का म्हणावे ?* ज्ञान नाही विद्या नाही ते घेणेची गोडी नाही बुध्दी असुनि चालत नाही तयास मानव का म्हणावे ?||१|| दे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव का म्हणावे ? ||२|| बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही पशू पक्षात ऐसे नाही तयास मानव का म्हणावे ? ||३|| दुसर्‍यास मदत नाही सेवा त्याग दया माया ही जयापाशी सदगुण नाही तयास मानव का म्हणावे ? ||४||  पशुपक्षी माकड माणुसही जन्ममृत्यु सर्वानाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानव का म्हणावे ?||५ || *कवयित्री- सवित्रीबाई फुले*

संकलित

No comments:

Post a Comment