✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार. 💥 जन्म :- १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट. १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाचे सौंदर्य खुलविण्यासाठी बांधणार पारदर्शक स्काय वॉक, पहिल्या टप्प्यातील ५ कोटींचा प्रस्ताव सादर* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- आप पक्षाच्या 20 आमदारांचं सदस्यत्व रद्द, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसाच्या दावोस (स्विर्त्झलँड) दौऱ्यावर; वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात होणार सहभागी* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्यावर महानाटय 'जाणता राजा'चे 6 ते 10 एप्रिल दरम्यान होणार प्रयोग* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई: इथिओपियाचा सॉलोमन डेकसिसा 'मुंबई मॅरेथॉन'चा विजेता: दोन तास ९ मिनिटं ३३ सेकंदात पूर्ण केली शर्यत* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली : अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघाने प्रत्येकाला आपल्या खेळातून प्रेरणा दिली, त्यांचा देशाला अभिमान आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक पुस्तक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत नामदेव* संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ=========  चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतीय पूर्व किनारपट्टीवरील सागरजलाची क्षारता किती टक्के आहे?* 👉 34% *२) सयुंक्त राष्ट्रसंघाने जागतिक शैक्षणिक वर्ष कधी घोषित केले होते?* 👉 १९७० *३) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉 २० सप्टेंबर १९८५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 स्वप्नील ईबीतवार, येवती 👤 हरीश बल्केवाड, येवती 👤 महेश मुदलोड, येवती 👤 नरेश मुंगा पाटील 👤 हुशन्ना मुदलोड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *तडजोड* अन्यायाशी तडजोड सर्वात मोठे पाप आहे अन्याय सहन करणं म्हणजे उलटं माप आहे योग्य वेळी अन्यायाला वाचा फुटली पाहिजे अन्यायग्रस्त व्यक्ती त्यातून सुटली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *धावणे ही आजची कमालीची गरज झाली आहे. महानगरी, चाकरमाणी असो की खेड्यातला शेतकरी, 'कशासाठी पोटासाठी' करीत तो सकाळपासून रात्रीपर्यंत अविश्रांत धावतो. असाध्य ते साध्य करणे हे त्याचे पोटाच्या पुढचे ध्येय असते. प्रपंचाच्या जबाबदा-यांचे पालन करता करता त्याला धावण्याची एवढी सवय होते की तो थांबणे विसरूनच जातो. 'पाॅज' नावाची मनाला आणि शरीराला उभारी देणारी, ताजेपणा देणारी युक्ती आपणही स्वीकारू शकतो, हेच त्याच्या स्मरणापलीकडे जाते.* *'जीवन फार धकाधकीचे झाले आहे' हे वा अशाप्रकारची वाक्य आता गुळगुळीत झालीत. कारण त्यातील अर्थ सर्वमान्य झाला आहे. मात्र, हे धकाधकीचे जीवन अल्पकालीन ठरू नये, यासाठी 'चार युक्तीच्या गोष्टी' मधील एक गोष्ट 'क्षणभर विश्रांती' ची आहे, हे लक्षात घेऊन त्याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *-संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ?जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोगलगाय नि पोटात पाय* - एखाद्याचे खरे स्वरुप न दिसणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नगारा* एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्‍यावर एका झाडाची फांदी वार्‍यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्‍यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्‍याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्‍याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या. उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment