✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/01/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले. १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान. १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान. २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान. 💥 जन्म :- १८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे 💥 मृत्यू :-  १६६५: सोनोपंत डबीर १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर मेट्रो येत्या मार्चपासून रुळावर धावणार, नागपूरकरांची प्रतीक्षा संपली.* ----------------------------------------------------- 2⃣ *नांदेड : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग झाल्याची पोलीसात तक्रार. दोषींवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांनी पुकारला बंद.* ----------------------------------------------------- 3⃣ *रांची : चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा कारावास.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित करणार नाही, मल्टिप्लेक्स असोसिएशनचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - 38 जम्मू-काश्मीर पोलिसांना यंदाचा शौर्य पुरस्कार जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣ *मेलबर्न - रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व लढतीत थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने केली मात* ----------------------------------------------------- 7⃣ *जोहान्सबर्ग कसोटी - भारताचा पहिला डाव १८७ धावांवर आटोपला, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची अर्धशतके* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* राष्ट्रीय मतदार राजा जागा हो....! इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========                  *रमाबाई रानडे* रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदीआणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करतात ? * 👉 28 फेब्रुवारी *२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करतात ?* 👉 11 मे *३) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करतात ?* 👉 29 ऑगस्ट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर साहित्य स्पंदन समूह, संचालिका 👤 ललेश पाटील मंगनाळीकर 👤 राजीव सेवेकर 👤 महेबूब पठाण 👤 अंबादास कदम 👤 राहुल आवळे 👤 नरेश दंडवते *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========   *परिपक्व* काही काही लोक नुसते बकत रहातात चांगल्या वाईटातून काही शिकत रहातात जिथून शिकता येईल तिथून शिकत रहावं जेवढ  होता येईल तेवढ परिपक्व व्हावं    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवी कुसुमाग्रज, अब्दुल कलाम, आगरकर किंवा तुकोबा यांना काय म्हणावं, ही खरंच वेगळी माणसं होती का? 'वेडी' होती का? आणि हे 'वेड' असलंच तर ते कोणत्या प्रकारचं होतं? ही एवढी बुद्धिमान, कर्तबगार माणसं पण 'अर्थप्राप्ती' ला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान होतं. 'जोडोनिय धन उत्तम व्यवहारे' हे त्यांना कळलं नसेल का?* *जगरहाटी वेगळी असते. लिओ टाॅलस्टाॅय यांची 'हाऊ मच लँड डज ए मॅन नीड?' ही कथा आहे. पाखोम हा शेतकरी तीचा नायक. त्याला जमीन घेण्याचं वेड आहे. शेवटी त्याची बश्कीर समुदायाच्या लोकांशी ओळख होते. ते पाखोमला अत्यल्प किंमतीला जमीन विकायला तयार होतात. मात्र एक अट असते. पाखोमने सूर्योदयाला धावायला सुरूवात करायची आणि सूर्यास्ताला थांबायचे. त्या दरम्यान जितकी जागा तो चालेल, तेवढी त्याला मिळेल. दुस-या दिवशी पाखोम धावू लागतो. सूर्यास्तापूर्वी तो मूळ जागेवर बश्कीरना भेटायला आणि आपण किती अंतर तुडवले हे सांगायला परततोही. बश्कीरांना तो ते सांगतोही. पण अतिश्रमाने तो कोसळतो.* *वर उल्लेखिलेल्या ध्येय वेड्यांच्या अगदी विरूद्ध टोकाची वृत्ती पाखोमची. माणसाला जन्मत:च काही मूलभूत वृत्ती प्राप्त झालेल्या असतात. काही स्वत:साठी झटतात; काही दुस-यांसाठी. अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्त्या' नावाचा सुंदर लघुनिबंध लिहिला आहे. त्यात रात्रभर तेवत राहून इतरांना प्रकाश देणारी एक आणि जिचा काहीच उपयोग न झाल्याने सडून, कुरतडून गेलेली दुसरी अशा मेणबत्त्यांचे सुरेख दर्शन घडवले आहे. शेवटी ज्याने त्याने आपली मेणबत्ती कोणती हे ठरवायचे आहे !*     ••●🔶‼ *रामकृष्णहरी* ‼🔶●••               🔶🔹🔶🔹🔶🔹     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गरज सरो, वैद्य मरो* - आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृती महत्वाची* स्वावामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.  ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment