✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .   *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-   १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :-  १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.  १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार  १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :-   १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.  २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.  २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷   *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣  *श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर, अमेरिका सर्वात श्रीमंत* ----------------------------------------------------- 2⃣  *कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावेडला जामीन मंजूर.* ----------------------------------------------------- 3⃣  *वॉशिंग्टन - अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) उपसंचालक अ‍ॅन्ड्यू मॅकबेक यांनी पदाचा राजीनामा दिला* ----------------------------------------------------- 4⃣  *मुर्शिदाबाद- पश्चिम बंगालमधील बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 42 वर* ----------------------------------------------------- 5⃣  *अलिबाग : आयकर विभागाकडून अभिनेता शाहरूख खानचं फार्महाऊस सील.* ----------------------------------------------------- 6⃣  *चंद्रदर्शनाचा आज तिहेरी योग, खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.* ----------------------------------------------------- 7⃣  *अंडर 19 वर्ल्ड कप - भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, 69 धावांवर पाकिस्तान ऑल आऊट, भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========           *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========                     *व्यसन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃    *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सुरैया (१५ जून १९२९ – ३१ जनवरी २००४) भारतीय सिनेमा की गायिका और अभिनेत्री थीं। उन्होंने ४० और ५० के दशक में हिन्दी सिनेमा में अपना योगदान दिया। उन्हें उनकी प्रतिभा के लिए उपमहाद्वीप की मलिका-ए-तरान्नुम से नवाज़ा गया। ३१ जनवरी २००४ को सुरैया का निधन हो गया। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========                *"" फ्रेश सुविचार ""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) राष्ट्रगीत कोणी लिहिले ?* 👉🏼 रवींद्रनाथ टागोर *2) वंदे मातरम कोणी लिहिले ?* 👉🏼 बंकिमचंद्र चॅटर्जी *3) खरा धर्म ही कविता कोणी लिहिली ?* 👉🏼 साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 हिलाल पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========     *कर्म* दोष देतात लोक  नेहमी फक्त धर्माला पण दोष असतो तो  आपल्या वाईट कर्माला वाईट कर्माचा परिणाम  कधीही वाईट असतो  चांगले काम करत रहा परिणाम राईट असतो      शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.*  *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•                 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========     या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आंधळं दळत अन कुत्र पिठ खातं* - परिश्रम एकाचे, फायदा दुसर्‍याचा.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ= ======== 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समयसुचकता* एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.' तात्पर्य प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment