✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/01/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका. 💥 जन्म :- १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *भारतीय तटरक्षक दलाचे जहाज C-161 सेवेत दाखल, गुजरातच्या पोरबंदर येथे झाला कार्यक्रम.* ----------------------------------------------------- 2⃣ *लालू प्रसाद यादव यांच्या वकिलाचा रांची विशेष सीबीआय न्यायालयात याचिका, तब्बेतीच्या कारणामुळे कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी, आज सुनावल्या जाणार शिक्षा* ----------------------------------------------------- 3⃣ *मध्य प्रदेश- कडाक्याच्या थंडीमुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांना 6 ते 13 जानेवारीपर्यंत सुट्टी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईः विद्यापीठाच्या चार अधिकार मंडळाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर. ७ फेब्रुवारीला होणार निवडणूक.* ----------------------------------------------------- 5⃣ *ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *भारत विरुद्द दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना - दक्षिण आफ्रिका 286 धावांवर गारद.* ----------------------------------------------------- 7⃣ *ऱाष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आचार्य बाळशास्त्री जांभेकर* बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत  व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_5.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कपिलदेव निखंज* कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. == क्रिकेट क्षेत्रातील योगदान ==कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ) . रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्‍यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्‍यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणत्या महिलेने सुवर्णपदक पटकाविले?* 👉 संजीवनी जाधव *२) भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स पुरुषांच्या स्पर्धेत कोणी सुवर्णपदक पटकाविले?* 👉रणजीतकुमार *३) मोबाईल इंटरनेटचा स्पीडमध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेला देश कोणता?* 👉 नॉर्वे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अभिषेक अडकटलवार 👤 साईनाथ जगदमवार 👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे 👤 बजरंग माने 👤 सुदर्शन कोंपलवार 👤 श्रीनिवास गंगुलवार 👤 मोहन घोसले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प स्वच्छतेचा* चला सारे स्वच्छतेचा मनी संकल्प करू स्वच्छता तिथे आरोग्य नेहमी ध्यानी धरू लक्षात ठेवा स्वच्छता असेल जिथे तिथे आनंद अन् आरोग्य नांदेल तिथे तिथे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.* *स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👁👀👁👀👁👀👁👀👁👀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध.............✍🏼 ***************************** सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= * आधी पोटोबा मग विठोबा - आधी स्वतः च्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे व नंतर अन्य (परमार्थाचे) काम करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हुशार गोनू* मिथिला नगरीत राहणार्‍या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.' शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?' गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.' आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्‍हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्‍याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते. स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्‍याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला. तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्‍याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला. आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला १,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला १,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्‍या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला ५00 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.'  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment