✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *बालिका दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९५० - पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी. १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहास संशोधक. 💥 मृत्यू :-  १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *भीमा कोरेगाव प्रकरण - सरकारच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचं आवाहन - प्रकाश आंबेडकर* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- आज स्कूल बस न चालवण्याचा निर्णय, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : रॉचे माजी प्रमुख राजिंदर खन्ना यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्तीला कॅबिनेटने दिली मंजुरी.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज शाळांना सुट्टी नाही, सुट्टी देण्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकार दिल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली* ----------------------------------------------------- 5⃣ *कोळसा खाण घोटाळा : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला दिल्ली न्यायालयाकडून स्थगिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : जिल्हाधिका-यांची गाडी फोडली, शिवाजीनगर परिसरातील घटना, सुदैवानं गाडीत कुणीही नव्हतं.* ----------------------------------------------------- 7⃣ *चंद्रपूर - 220 केव्ही वीज उपकेंद्रात भीषण आग, आगीमुळे परिसरातील 35 गावांचा वीजपुरवठा ठप्प.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशवंत दिनकर फडके* यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २०००  साली  बेळगाव  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१  रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत  उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्‌.डी. पदवी मिळवली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो. ~ वपु काळे | इतर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 डॉ. आंबेडकर *२) भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगररांगामुळे विभक्त झाली आहेत?* 👉 महादेव *३) दूरदर्शनने सुरू केलेली सर्वात पहिली मालिका कोणती?* 👉 श्वेतांबरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर 👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद 👤 रतन बहिर, भीर, महाराष्ट्र 👤 शुभांगी परळकर, नांदेड 👤 माधव पवार, पत्रकार, नायगाव 👤 संदीप जाधव, देगलूर 👤 प्रशांत बोड्डेवाड, येवती 👤 वीरेंद्र डोंगरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *कमकुवत* नव वर्षाची सुरवात कोणाची शनी दर्शनाने कमकुवत असतात कोणी कोणी मनाने हे कमजोर मनाचे जातात कुठेही शरण डोळे झाकून लवायचे एवढेच त्यांचे धोरण शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अती शहाणा त्याचा बैल रिकामा* - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते. *संकलक :- छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गाढव आणी निर्दय मालक* एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे. असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला. तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, 'अरे, दुष्ट माणसा, हे सगळं नुकसान तुझ्याचमुळे झालं. तू जर मला नीट खाऊ घातलं असतंस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझं मी सहज उचलू शकलो असतो.' तात्पर्य - काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment