✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक रेबीज दिन_**_ या वर्षातील २७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर**१९९९:महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९६०:माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९५०:इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९३९:दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९२८:सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा भारतीय**१९८२:रणबीर कपूर – प्रसिद्ध अभिनेता**१९८१:प्रा.डॉ.राजाराम अंकुशराव झोडगे-- लेखक* *१९६०:विनिता पिंपळखरे-- लेखिका,कवयित्री,नाटककार**१९५९:हरिहर जनार्दन कुलकर्णी(आनंदहरी)- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५७:नितीन रमेश तेंडुलकर-- कवी, लेखक* *१९५७:महेश कोठारे--- मराठी चित्रपट-अभिनेते, मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता**१९५२:सुरेशकुमार वैराळकर --जेष्ठ गझलकार व शाहीर**१९४९:प्रा.वैजनाथ महाजन-- जेष्ठ लेखक* *१९४९:अजंना उदय कर्णिक -- कवयित्री, लेखिका* *१९४६:माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट माजी कप्तान**१९४०:प्रा.प्रसन्नकुमार पाटील-- कवी, समीक्षक* *१९३६:आशा मुंडले -- लेखिका* *१९३३:डॉ.गजानन रामचंद्र देशमुख -- लेखक* *_१९२९:लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्‍न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण(मृत्यू:६ फेब्रुवारी २०२२)* *१९२४:प्रभाकर दिगंबर देशपांडे--लेखक माजी शिक्षणाधिकारी**१९०९:पी.जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)**१९०७:भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)**१८९८:शंकर रामचंद्र दाते(मामाराव दाते)--आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित करणारे मुद्रणतज्ज्ञ(मृत्यू:१८ जानेवारी १९९२)**१८६५:श्रीनिवास नारायण कर्नाटकी-- चरित्रकार,निबंधकार ( मृत्यू:१७ जुलै १९४८)* *१८०३:प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(जन्म:२९ सप्टेंबर १९२८)**२०१२:माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)(जन्म:१९२९)* *२००४:डॉ.मुल्कराज आनंद – लेखक (जन्म:१२ डिसेंबर १९०५)**१९९३:चंद्रशेखर दुबे( सी.एस. )-- भारतीय अभिनेता(जन्म:४ सप्टेंबर १९२४)**१९८९:फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:११ सप्टेंबर १९१७)**१९५६:विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक(जन्म:१ आक्टोबर १८८१)**१९५३:एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म:२० नोव्हेंबर १८८९)**१८९५:लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म:२७ डिसेंबर १८२२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*गणपतीपुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रगणपतीपुळे हे मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्‍नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्लाद दायक आहे.गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.त्याच रस्त्याला लागून रत्‍नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्‍नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे.रत्‍नागिरी आगारातून १०-१५ मिनिटांनी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत. गणपतीपुळे येथे मेणाच्या पुतळ्याचे एक संग्रहालय नव्यानेच चालू झाले आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ईद ए मिलाद ची सुट्टी आजच्या ऐवजी उद्या जाहीर, शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर, गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज, मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तटस्थ नवाब मलिक यांच्या जागी अजित पवार गटाने अखेर मुंबई अध्यक्ष निवडला, समीर भुजबळ राष्ट्रवादीचे नवे मुंबई अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी; पंचगंगा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 66 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विषाणू* 📙मानवी आजारातील अनेक आजारांवर आजही औषधे सापडलेली नाहीत. हे आजार वाढून त्यातून अन्य उद्भव वाढू नयेत व रुग्णाला तात्पुरता आराम पडावा, एवढेच उपचार या वेळी शक्य होतात. अशा आजारांतील खूप आजार हे विषाणूंमुळे होतात.ज्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्रांचे स्वरूप प्रगत होत जाऊन अतिप्रगत असे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरात आले, तेव्हा विषाणु हा प्रकार प्रथम ज्ञात होऊन डोळ्यांनी बघता आला. एखाद्या मिलिमीटरच्या लक्ष ते दशलक्षांश भागाएवढा हा विषाणु सहसा दंडगोलाकार वा गोलाकार आकारात असतो. आज घटकेस अगणित विषाणू आपल्या आसपास वावरत असतात, पण त्यातील मोजकेच आजारनिर्मितीला कारणीभूत होतात.विषाणू हा सजीव प्राणी आहे की नाही ? नेमके उत्तर आता माहीत नाही. परोपजीवी वाढीमुळे व परोपजीवी अस्तित्वामुळे शास्त्रज्ञ हे मत व्यक्त करतात. विषाणू जेव्हा एखाद्या पेशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हाच त्यांची झपाट्याने वाढ सुरू होते व प्रताप सुरू होतात. साधी नेहमी होणारी सर्दी, काही प्रकारचा खोकला, अनेक प्रकारचे जुलाब, पूर्वीची भयानक अशी देवीची साथ, गोवर, कांजण्या हे सारे विषाणूंमुळे होणारे रोग आहेत. या साऱ्यांच्या जोडीला अलीकडे अनेक वेळा ज्या रोगात नक्की कारण सापडत नाही, त्या वेळी डॉक्टर लोक विषाणूंकडे बोट दाखवतात. कॅन्सरकडे या दृष्टीने अलीकडे बघितले जाते.साऱ्या जगभर सध्या चर्चेचा विषय बनलेला आजार एड्स हा विषाणूंमुळेच होतो. विषाणू जंतुनाशके वा प्रतिजैविके यांना अजिबात दाद देत नाहीत. त्यामुळेच प्रतिजैविकांची (अँटिबायोटिक्सची) प्रचंड फौज मानवी हातात असूनही विषाणूंमुळे झालेल्या आजारांवर ते झाल्यानंतर काडीचाही परिणाम होत नाही. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी शरीरामध्ये प्रतिगोलके (अँटीबॉडीज) तयार करणारी लस टोचणे एवढाच उपाय आपल्या हातात राहतो. या दृष्टीने अनेक आजारांवर प्रतिबंध करणाऱ्या लशी आपण तयारी केलेल्या आहेतच. पण विषाणू मोठे तरबेज असल्याने अनेक लसींना दाद न देणारे नवीन विषाणू पुन्हा तयार होतात.सर्दी पडसे, इन्फ्ल्यूएन्झा यांविरूद्ध लस तयार करण्यात यश मिळूनही नवीन प्रकारचे विषाणू तयार होत गेल्याने या लसींचा वापर निरुपयोगी ठरत गेला आहे. एड्ससारख्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात अद्यापही यश आलेले नाही.विषाणूंमुळे काही वेगवेगळी लक्षणे जरूर दिसतात, पण मुख्य लक्षण राहते, ते म्हणजे ताप. विषाणूंच्या आजाराबाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे दहापैकी नऊ रुग्ण आपोआप ठराविक काळाने बरे होऊ शकतात. गोवर, कांजण्या, कावीळ, गालगुंडे ही त्याचीच उदाहरणे आहेत. सर्दी हे सुद्धा एक चांगले उदाहरण आहे. आठवडाभरात आपोआप नाहीशी होणारी ही दुखणी आहेत, केवळ म्हणूनच प्राणिजगत त्यांना तोंड देऊ शकत आहे.विषाणूंची कृत्रिम पैदास करण्याची पद्धत मोठी कुतूहलजन्य असते. कोंबडीच्या अंड्यातील एम्ब्रिओ वा सूक्ष्म जीवात हे विषाणु टोचून त्यांची पैदास तेथे घडवली जाते. त्यातून लस निर्माण करायला पुरेसे विषाणू मिळवतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले ?२) राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणाच्या शिफारशीच्या ठरावाची गरज असते ?३) आग्रा येथील प्रसिध्द असलेला पदार्थ कोणता ?४) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?५) गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) उमाजी नाईक २) राज्य मंत्रिमंडळ ३) पेठा ४) कुशाण ५) जातक कथा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रामप्रसाद वाघ👤 साईनाथ कानगुलवार, येवती👤 सचिन बावणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी राम विश्राम तेथेचि आहे। सदानंद आनंद सेवोनि आहे॥ तयावीण तो शीण संदेहकारी। निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाप आणि पुण्य कशाने होते या विषयी आपल्याला पूर्णपणे माहीती असताना सुद्धा आपण नको त्या मार्गाने जाऊन जीवनाची माती करत असतो.निदान या मानवी जीवनाचे खरे महत्व जाणून सुंदर अशा मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण, इतरांचे चांगले केल्याने जरी त्यांना विसर पडत असेल तरी निसर्ग कुठेतरी बघत असतो व नको ते कार्य केल्याने लपवून ठेवल्यानेही ते कधीच लपत नाही असे अनेकदा ऐकण्यात आले आहे. म्हणून व्यर्थ विचार करणे सोडून द्यावे व सत्य काय आहे याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करा*गोपाळच्या घरात पाच म्हशी आणि एक गाय होती. तो दिवसभर सर्व म्हशींची काळजी घेत असे. तो दुरून हिरवे गवत कापून त्यांच्यासाठी आणून खायला घालत असे. गोपाळांच्या सेवेने गाई, म्हशी आनंदी होत्या.सकाळ संध्याकाळ इतके दूध आले असते, गोपालच्या कुटुंबाला ते दूध विकायला भाग पाडले असते. संपूर्ण गावात गोपाळच्या घरातून दूध विकायला सुरुवात झाली. आता गोपालला कामात जास्तच मजा येत होती, कारण त्यामुळे त्याची आर्थिक स्थितीही मजबूत होत होती. काही दिवसांपासून गोपाळला काळजी वाटू लागली होती, कारण त्याच्या स्वयंपाकघरातील एका मोठ्या मांजरीने त्याचे डोळे गोठवले होते. गोपाळ जेव्हा केव्हा किचनमध्ये दूध ठेवायचा तेव्हा तो निवांत होता. मांजर दूध प्यायचे आणि त्यांना खोटेही ठरवायचे. गोपालने मांजराचा अनेकवेळा पाठलाग करून तिला मारण्यासाठी धाव घेतली, पण मांजर पटकन भिंतीवर चढून पळून गेले. एके दिवशी गोपाल अस्वस्थ झाला आणि त्याने मांजरीला धडा शिकवण्याचा विचार केला. तागाच्या पोत्याचे जाळे टाकले होते, ज्यात मांजर सहज अडकले. आता काय, गोपाळला आधी काठीने मारहाण करण्याचा विचार आला. मांजर इतक्या जोरात म्याव करत होती की गोपाल तिच्या जवळ जाऊ शकत नव्हता. पण आज धडा शिकवण्यासाठी गोपाळने माचीसची काठी पेटवली आणि गोणीवर फेकली. गोणी पेटू लागताच मांजर सर्व शक्तीनिशी पळू लागली. मांजर जिकडे तिकडे पळत असे, जळणारी पोती पाठीमागून गेली. काही वेळातच मांजर संपूर्ण गावात पळाली. संपूर्ण गावात आगीचा भडका उडाला…………….. आग लागली, विझवा…….या प्रकाराचा आवाज उठू लागला. मांजराने संपूर्ण गाव जाळले. गोपाळचे घरही वाचले नाही.निष्कर्ष - आवेग आणि स्वतःच्या चुकीचे परिणाम एखाद्याला भोगावे लागतात आणि त्याची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment