✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 सप्टेंबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *_ या वर्षातील २५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.**१९७२:नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.**१९६५:भारत पाक युद्ध - भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.**१९६१:’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.**१९१९:अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.**१८९३:स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:मुरली कार्तिक-- भारतीय क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू**१९६३:निलिमा क्षत्रिय -- लेखिका**१९६१:राजेंद्र शहा -- गझलकार* *१९५०:डॉ.मोहन मधुकर भागवत-- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक**१९३५:रघुनाथ जगन्नाथ तावरे-- कवी* *१९३१:माधव नारायण आचार्य--मराठी लेखक(मृत्यू:२७ जून २०१४)* *१९१७:फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२८ सप्टेंबर १९८९)**१९१५:पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (मृत्यू:२९ मार्च १९९७)**१९१४:प्रा.मधुकर विठ्ठल फाटक-- लेखक* *१९१३:वामन गणेश तळवलकर-- लेखक,संपादक* *१९१२:अप्पासाहेब बाळासाहेब पंत-- लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू:५ऑक्टोबर१९९२)**१९११:गोपाळ दामोदर देऊसकर-- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार (मृत्यू:८ फेब्रुवारी १९९४)**१९११:अपर्णा सदाशिव देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९०१:बाळकृष्ण रघुनाथ देवधर-- भारतीय शास्त्रीय गायक,संगीततज्ज्ञ, संपादक, चरित्रकार (मृत्यू:१० मार्च १९९०)**१९०१:आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – सुप्रसिद्ध कवी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष,(मृत्यू:८ मे १९८२)**१८९५:आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न -१९८३ मरणोत्तर,१९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली.भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली.(मृत्यू:१५ नोव्हेंबर १९८२)**१८८५:डी.एच.लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार,कवी,नाटककार,टीकाकार आणि चित्रकार (मृत्यू: २ मार्च १९३०)**१८६७: श्रीपाद दामोदर सातवळेकर-- भाष्यकार,संपादक(मृत्यू:३१ जुलै १९६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:माधव कोंडविलकर-- जेष्ठ लेखक, कवी,कादंबरीकार (जन्म:१५ जुलै १९४१)* *२०१३:मधुबाला जव्हेरी-चावला-- मराठी गायिका(जन्म:१९ मे १९३५)**१९९८:क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म:१० आक्टोबर १९०९)**१९८७:महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.(जन्म:२६ मार्च १९०७)**१९७१:निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१५ एप्रिल १८९४)**१९६४:गजानन माधव मुक्तिबोध – हिंदी कवी,लेखक,टीकाकार व संपादक (जन्म:१३ नोव्हेंबर १९१७)**१९४८:बॅ.मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल(जन्म:२५ डिसेंबर १८७६)**१९२१:सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (जन्म:११ डिसेंबर १८८२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कवितारिमझिम पाऊस पडे सारखा,यमुनेलाही पूर चढे,पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।।तरुवर भिजले भिजल्या वेली,ओली चिंब राधा झाली,चमकुन लवता वरती बिजली,दचकुन माझा ऊर उडे ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।।हाक धावली कृष्णा म्हणुनी,रोखुनी धरली दाही दिशानी,खुणाविता तुज कर उंचावुनी,गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।।जलाशयाच्या लक्ष दर्पणी,तुझेच हसरे बिंब बघुनी,हसता राधा हिरव्या रानी,पावसातही ऊन पडे, ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।। – ग. दि. माडगूळकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण : पंतप्रधान मोदी, पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणार परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *CBSE बोर्डाने 2024 च्या 10 वी व 12वी च्या पेपर पॅटर्नमध्ये केले अनेक मोठे बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तलाठी भरती घोटाळा! परीक्षा केंद्रात हाऊसकीपिंग करणारी महिला पुरवायची उत्तरे; मोबदल्यात मिळायचे लाखो रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाकरे गटाला धक्का, उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा; उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअपद्वारे राजीनामा पाठवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणवासीयांना दिलासा! अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ करणार कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतातील पहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्गमध्ये, आज होणार प्रकल्पाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे खोळंबा, उर्वरित सामना आज होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📕 थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो ? 📕*थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो ? उन्हाळ्यात का नाही ?कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायवरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो. त्यामुळेच उष्णता वाढली की धाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते.कुडकुडणे म्हणजे स्नायुंच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून ऊर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवायचा प्रयत्न केला जातो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रयत्न, कष्ट, चिकाटी हे यशाचे तीन मार्ग आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आतंकवादी हल्ला कोणत्या दिवशी झाला ?२) 'निसर्गाचे स्वच्छतादूत' म्हणून कोणत्या पक्ष्यांना ओळखले जाते ?३) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?४) पृथ्वीपेक्षा सूर्य किती पटीने मोठा आहे ?५) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ? *उत्तरे :-* १) ११ सप्टेंबर २००१ २) गिधाड, कावळा ३) मुंबई शहर ४) तेरापट ५) एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कांचन जोशी, शिक्षिका, नांदेड👤 प्रशांत करखेलीकर, धर्माबाद👤 ऋषिकेश बच्छाव👤 प्रशांत कोकाटे👤 सुनील महामुनी👤 भगवान वाघमारे👤 गणेश यादव👤 अमोल वसंतराव पाटील👤 दिगंबर वंगरवार, नांदेड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती॥ जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणारी एखादी व्यक्ती,भलाही परिस्थितीने जरी मागे असेल तरी ती व्यक्ती स्वत: नेहमीच प्रामाणिक असते तसच आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवून जगत असते. तर..ती इतरांचे काय वाईट करणार. ...? कारण त्या व्यक्तीकडे इतरांच्या विषयी वाईट विचार करण्यासाठी मुळात वेळ नसतो. फरक एवढाच की, खरे सत्य आपल्याला दिसत नसल्यामुळे आपण वेगळ्या प्रकारे विचार करत असतो. म्हणून चुकूनही उगाचच कोणाविषयी नको त्या प्रकारचे विचार करू नये. जरी आजचा दिवस आपला असेल तरी कदाचित उद्याचा दिवस दुसऱ्याचा असू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे प्रेम*सुरिली नावाचा पक्षी आंब्याच्या झाडावर राहत होता . त्याने खूप सुंदर घरटे बनवले होते. ज्यात त्याची लहान मुले एकत्र राहत होती. त्या मुलांना अजून कसे उडायचे ते माहित नव्हते, म्हणूनच सुरिली त्यांना खायला आणून खायला घालायची.एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सुरिलीच्या मुलांना खूप भूक लागली होती. मुलं जोरजोरात रडू लागली, सगळी मुलं एवढ्या मोठ्याने रडत होती. मला माझी मुलं सुरेल रडणारी आवडत नव्हती. ती त्यांना शांत करत होती, पण मुलांना भूक लागली होती त्यामुळे ते गप्प बसत नव्हते.सुरली विचारात पडली, एवढ्या मुसळधार पावसात जेवण कुठून आणणार. पण जेवण आणले नाही तर मुलांची भूक कशी भागणार? बराच वेळ विचार केल्यावर सुरिलीने लांब उड्डाण केले आणि पंडितजींच्या घरी पोहोचले.पंडितजींनी प्रसादात सापडलेला तांदूळ, डाळ आणि फळे अंगणात ठेवली होती. पक्ष्याने पाहिले आणि मुलांसाठी तोंडात भरपूर तांदूळ ठेवले. आणि लगेच तिथून उडून गेला.घरट्यात पोहोचल्यानंतर पक्ष्याने सर्व मुलांना तांदळाचे दाणे दिले. मुलांची पोटे भरली होती, सगळे गप्प झाले आणि आपापसात खेळू लागले.नैतिक – आईच्या प्रेमाची जगात बरोबरी नाही, जीव धोक्यात घालूनही ती आपल्या मुलांच्या हितासाठी काम करते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment