✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च सन्मान जाहीर**१९९५:घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्‍च न्यायालयाचा निर्णय**१९९५:श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.**१९८२:कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.**१९३१:नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.**१८८८:’द नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१६६०:शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.**१४९९:बेसलचा तह – स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:प्रा.डॉ.रवींद्र बैजनाथराव बेम्बरे-- लेखक* *१९७२:प्रा.दीपककुमार खोब्रागडे -- लेखक, कवी,विचारवंत**१९७१:रवी(रवींद्र) जाधव-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता,पटकथा लेखक आणि निर्माता* *१९६७:संजय इंगळे तिगावकर-- प्रसिद्ध कवी**१९६६:राजकुमार (राजू)बांते-- पत्रकार,संघटक* *१९५७: चारुदत्त माधव बागुल-- लेखक* *१९५६:रंजिता'रॉबी' कौर-- भारतीय अभिनेत्री**१९५३:अनंत भाऊदेव काळे --- निवेदक, प्रकाशक,साहित्यिक,संकलक व संग्राहक(मृत्यू ३०मे २०२२)* *१९४०:दीनानाथ मनोहर-- मराठी कादंबरी व कथाकार**१९३३:ताराबाई सावंगीकर-- लेखिका ( मृत्यू:१९ फेब्रुवारी २००६)* *१९२५:ललिता सुधीर फडके -- मराठी भावगीते आणि हिंदी चित्रपटगीते गाणाऱ्या गायिका(मृत्यू:२५ मे २०१०)**१९१९:डॉ विनायक गो. दुर्गे -- कवी लेखक* *१९१५:अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ९ मे १९९५)**१९१४: गोविंद शंकर उपाख्य बाबुराव हरदास-- लेखक,कवी (मृत्यू:२५ जुलै २०१०)* *१९०९:दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(मृत्यू: ३ आक्टोबर १९५९)**_१८८७:कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ,बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (मृत्यू:९ मे १९५९)_**१८६९:व्ही.एस.श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (मृत्यू:१७ एप्रिल १९४६)**१७९१:मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:डॉ.भाऊ लोखंडे-- सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,आंबेडकरवादी विचारवंत(जन्म:१५ जून १९४२)**२०११:मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे नबाब (जन्म: ५ जानेवारी १९४१)**१९९४:जी.एन.जोशी – भावगीतगायक व संगीतकार.एच.एम.व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (जन्म:६ एप्रिल १९०९)**१९७०:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (जन्म:३० मार्च १८९९)**१९९१:दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.(जन्म:१४ जानेवारी १९०५)**१९५६:फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज (जन्म: २ सप्टेंबर १८७७)**१५३९:गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाणमाजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*... ओझरचा विघ्नेश्वर ...अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. सर्व राक्षसानी एका रात्री ओझर गणपतीचे मंदिर बांधले असे बोलले जाते.आख्यायिका - राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घटीची शक्यता;  कृषी विभागाचा सरकारला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात गणेशोत्सवादरम्यान 5 ऐवजी 6 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाऊड स्पिकरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणरायाच्या पाठोपाठ सोन्याच्या पावलांनी गौराई आली, आज गौरी पूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरक्षणमिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महिंद्रा ग्रुपचा धक्कादायक निर्णय, कॅनडातील सर्व व्यवसाय बंद केला, शेअर बाजारात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची मोठी झेप, वनडे क्रमवारीत थेट अव्वल स्थान पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚆 *रेल्वे इंजिन* 🚂माणसाच्या पाहण्यातले, रोज दिसू शकणारे, सर्वात अजस्र असे धूड म्हणजे रेल्वे इंजिन. अन्य इंजिने सहसा त्यापेक्षा लहानच असतात. धडाडत जाणाऱ्या गाडीच्या इंजिनाची कर्कश शिट्टी पहाटेच्या थंडीत कित्येक मैल लांब ऐकु जाते, तर इंजिनाच्या दिव्याचा सर्चलाईट अंधार फाडत सहज अर्धा किलोमीटर लांबपर्यंत पोहोचतो. या धुडाची, त्याच्या आकाराची, ताकदीची कल्पना असावी, म्हणून रेल्वेनेच एक चित्र काढले होते. . . मालाने भरलेला, रेल्वेरूळ ओलांडणारा ट्रक व भलेमोठे इंजिना त्याच्या रोखाने येताना - दोन्हींच्या आकारांतील तफावत बघणाऱ्याला सहज जाणवणारी. मथळा होता -'You are no match with me.' जेम्स वॅट, जॉर्ज स्टीव्हन्सन, गर्नी ट्रेव्हिथीक यांचा रेल्वे इंजिन निर्माण करण्यात मोठाच वाटा आहे. रेल्वे इंजिन म्हणजे वाफेचे, हे समीकरण कित्येक वर्षे भारतीयांच्या मनात कायम होते. १९६० सालच्या दशकापर्यंत तर जवळजवळ सर्वच इंजिने वाफेची होती. जेमतेम पाचएकशे किलोमीटरचा विजेचा मार्ग सोडला, तर वाफेच्या इंजिनांचे राज्य त्या काळात अबाधित होते. कोळशाची राख, धूर खर्च यांमुळे त्यांचा वापर थांबवला गेला.ज्या मार्गावर विजेच्या तारा घातल्या होत्या, तेथे इलेक्ट्रिक इंजिने वापरायला सुरुवात झाली. पुणे मुंबई या मार्गाचे विद्युतीकरण १९२७ साली झाले होते. पण आता अन्य काही मोठ्या मार्गांचेही विद्युतीकरण झाले आहे. संपूर्ण मार्गावर डोक्यावरून जाणाऱ्या तारांतून वीजपुरवठा या इंजिनांना केला जातो. हा वीजपुरवठा डी.सी. वा डायरेक्ट करंट प्रकारचा असतो. एका तारेतुन वीज घेतली जाते व रुळातून तिचे सर्किट पूर्ण होते. या इंजिनांची ताकद भरपूर असते, आकार अवाढव्य नसतो. त्यांना इंधन वाहून न्यावे लागत नाही. त्यांना वेगळे इंजिन लागत नाही तर फक्त विजेच्या मोटर्स यामध्ये काम करतात, वेगही भरपूर असतो. पंचाईत फक्त विद्युतीकरणाची. त्यासाठी होणारा खर्च फार मोठा असतो.यातुन मध्यममार्ग काढण्यासाठी डिझेल इंजिनांची निर्मिती व वापर सुरू झाला. डिझेल इंजिन लांबीला खूपच लांब असते. मुख्यतः अवजड डिझेल इंजिन व त्यासाठी लागणारा डिझेल तेलाचा मोठा साठा हा त्याचा महत्त्वाचा भाग. डिझेल इंजिनावर जनरेटरमधून वीज निर्माण केली जाते. या विजेचा पुरवठा मागच्या चाकांमध्ये बसवलेल्या विजेच्या मोटारींना केला जाऊन हे इंजिन गाडी खेचते. या इंजिनांची ताकद अफाट असते. त्यांच्या तेलावर होणारा खर्च व पूर्ण ताकद वापरण्यासाठी लांबलचक गाड्या जोडल्या जातात. तसेच या गाड्या शक्यतो दूर अंतरावरच्या, न थांबता पोहोचणाऱ्या असणे आवश्यक धरले जाते. इंजिनाची पूर्ण कार्यक्षमता वापरण्यासाठी ही काळजी घ्यावी लागते.वाफेचे इंजिन पूर्वी आठ डब्यांची गाडी ओढत असे. विजेचे इंजिन बारा डब्यांची गाडी नेते. तर डिझेल इंजिनाला बावीस डबेसुद्धा जोडले जाऊ शकतात. मालगाड्यांत त्याहून जास्त म्हणजे १०० पर्यंत डबे असतात. यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येईल. त्या इंजिनांचा वेगही सहज ताशी एकशेतीस किलोमीटपर्यंत जाऊ शकतो. बिनइंजिनांची लोकल गाडी म्हणजे तीन डब्यांचा एक रेक असलेले इलेक्ट्रिक मॅकेनिकल युनिट (EMU) असे म्हटले जाते. या प्रत्येक रेकमध्ये एक विजेचे इंजिन म्हणजे मोटारचा सेट काम करतो. असे तीन रेक एकत्र करून एक लोकलगाडी बनते व सर्व रेकचे नियंत्रण पुढुन केले जाते. या गाड्यांना छोट्या छोट्या अनेक इंजिनांमुळे झटकन वेग घेता येतो वा कमी करता येतो. त्यामुळे वाहतूक झटपट होते, हे महत्त्वाचे. पूर्ण वेगाने स्टेशनमध्ये शिरणारी लोकल दुसऱ्या टोकाला जाऊन थांबू शकते, पण रेल्वे इंजिनाची गाडी पूर्ण वेगात असल्यास थांबायला किमान एक किलोमीटर अंतर लागते. मॅग्नेटिक लेव्हिएशन मोनोरेल हाही एक प्रकार आता वापरात आला आहे.अत्यंत वेगाने धावणारी हायस्पीड इंजिने आपल्या देशात बनत नाहीत, वापरात नाहीत. त्यांना सोयीचे असे रेल्वेरूळ आपल्या इथे घातलेले नाहीत. जगात चीन, फ्रान्स, जपान, स्वीडन या देशात अत्यंत वेगवान गाड्या धावतात. काहींचा वेग साडेतीनशे साडेचारशे किलोमीटरच्या दरम्यान असतो. त्यांच्यासाठी बहुतेक विजेची इंजिनेच वापरली जातात. भुयारी रेल्वेमध्ये विजेची इंजिने वापरतात व त्यांना वीजपुरवठा तिसऱ्या, मध्यभागी टाकलेल्या वेगळ्या रुळांतून करण्याची पद्धत आहे. इंजिनांचे वेग वाढत गेले, तसतसे त्यांचे पारंपरिक आकारही बदलत जाऊन एरोडायनॅमिक आकार अाहेत. वाऱ्याचे कमीत कमी घर्षण कसे होईल, याचा विचार या आकारात केला गेला आहे. भारतातील रेल्वे इंजिने बनवण्याचा एकमेव कारखाना चित्तरंजन येथे आहे.चित्तरंजनच्या कारखान्यात शक्तिशाली असे ५००० अश्वशक्तीचे इंजिन बनवले गेले असून त्याचे नाव 'अशोक' ठेवले गेले आहे. २६ डब्यांची गाडी कमाल १४० किलोमीटर वेगाने हे इंजिन नेऊ शकेल. 'राजधानी एक्स्प्रेस'साठी त्याचा वापर १९९४ सालात सुरू झाला आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मोरेश्वर नावाचा गणपती कोठे आहे ? २) थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?३) सिद्धिविनायक गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) दहा हात असलेल्या गणपतीचे नाव काय आहे ?५) अष्टविनायक मध्ये सर्वात श्रीमंत गणपती कोणता ?उत्तरे :- १) मोरगाव २) चिंतामणी ३) अहमदनगर ४) महागणपती ५) ओझरचा विघ्नेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आनंद पा. दुड्डे, चिकनेकर👤 श्याम सुरने, धर्माबाद👤 सुनील फाळके, बिलोली👤 खंडोबा खांडरे, करखेली👤 गंगाधर चिटमलवार, शिक्षक, देगलूर👤 सागर गडमोड, तुळजापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहु नाम या रामनामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे। जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना, काहीतरी तरी लहान, मोठे सुप्त गुण दडलेले असतात काहींच्या सुप्त गुणांना व त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना दिशा मिळत असते तर काही जणांमध्ये कलागुण असताना सुद्धा परिस्थिती, अडचणींमुळे सुप्त गुणांना वाव मिळत नसतो. अशा सुप्त गुणांना व कलागुणांना ओळखून त्यांना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे.जी व्यक्ती इतरांच्या कलागुणांची कदर करून आपुलकीच्या नात्याने मार्गदर्शन व सहकार्य करते ती व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. म्हणून आपणही इतरांतील कलागुणांची कदर करावे व त्यांना योग्य दिशा दाखवावे.कारण दिशा दाखवणे हा सुद्धा एक प्रकारचा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धैर्याचा परिचय*सुंदर हरणे जंगलात राहत असत. त्यात सुरिली नावाचा डोई होता. त्यांची मुलगी मृगनैनी अवघ्या पाच महिन्यांची होती. मृगनैनी आईसोबत जंगलात फिरत असे. एके दिवशी मृगनैनी तिच्या आईसोबत चालत असताना दोन कोल्हे आले. त्याला मृग्नैनीला मारून खायचे होते. सुरिली दोन्ही कोल्ह्यांना शिंगांनी मारून थांबवत होती. पण कोल्हे मान्य करायला तयार नव्हते. तेवढ्यात तिथे हरणांचा कळप आला. हरिण कोल्हाच्या मागे धावू लागले. कोल्हा प्राण घेऊन तेथून पळून गेला. सुरिली आणि मृगनाईचे प्राण आज तिच्या कुटुंबीयांनी वाचवले.नैतिक – एकत्र राहून सर्वात मोठ्या आव्हानावर मात करता येते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment