✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_हिन्दी भाषा दिन_* *_ या वर्षातील २५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.**१९९९:किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.**१९९५:संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९७८:’व्हेनेरा-२’ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.**१९६०:ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना झाली.**१९५९:सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.**१९४८:दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.**१९१७:रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.*  *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:आयुष्मान खुराणा-- भारतीय अभिनेता,गायक* *१९७९:प्रा.रवी लक्ष्मीकांत कोरडे-- कवी* *१९६६:मोहम्मद आमेर सोहेल अली-- पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू**१९६३:रविंद्र रामनारायण ऊर्फ ’रॉबिन’ सिंग – अष्ट्पैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४:डॉ.श्रीकांत जिचकार -- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री,खासदार अल्पावधीमध्ये मिळवलेल्या बहुआयामी यशामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध....(मृत्यू:२जुन २००४)**१९५३:प्रा.डॉ.राजन जयस्वाल -- लोकप्रिय कवी,तथा प्रसिद्ध लेखक**१९५२:प्रा.अरुण सुका पाटील--कवी, लेखक* *१९५२:अंजली चंद्रकांत दिवेकर -- कथालेखिका* *१९५०:समाधान गणपत पाचपोळ -- वैदर्भीय कवी (मृत्यू:१९ जून २००५)**१९४८:वीणा सहस्रबुद्धे – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका**१९४६: प्रकाश बुटले- लेखक* *१९३७:सुधाकर विनायक डोईफोडे-- मराठी पत्रकार,लेखक आणि संपादक (मृत्यू:२२ जानेवारी २०१४)**१९३२:डॉ.काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (मृत्यू: २ मार्च १९८६)**१९३०:सुधा मुकुंद नरवणे--मराठी लेखिका(मृत्यू:२३ जुलै, २०१८)**१९२३:राम जेठमलानी – माजी केन्द्रीय कायदामंत्री,कायदेपंडीत(मृत्यू:८ सप्टेंबर, २०१९)**१९३२:मोरेश्वर गणेश तपस्वी-- लेखक* *१९२१:दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, 'मंजील-ए-नूर’ आणि ’मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना उर्दू अकादमीचे पुरस्कार मिळाले.(मृत्यू:३० मे १९८९)**१९१५:गोपालदास परमानंद(जी.पी.) सिप्पी-- भारतीय हिंदी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू:२५ डिसेंबर २००७)**१९०१:प्रा.नारायण गोविंद नांदापूरकर-- मराठी कवी आणि पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभ्यासक(मृत्यू:९ जून १९५९)**१९०१:यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत(मृत्यू:२६ सप्टेंबर १९८५)**१८९७:पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (मृत्यू:२२ नोव्हेंबर १९५७)**१८६७:विष्णू नरसिंह जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक,कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक (मृत्यू:५ फेब्रुवारी १९२०)**१७१३:योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ जुलै १७८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११:हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक (जन्म:५ जून १९५०)**१९९८:प्रा.राम जोशी – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू(जन्म:८ जून १९२४)**१९९२:अ.स.राजुरकर-- इतिहास संशोधक ••••(जन्म:२१ जानेवारी १९२४)**१९८९:बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक,पद्मश्री (१९५८),पद्मभूषण (१९६८) (जन्म: २६ मे १९०६)**१९७९:नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ जुलै १९१७)**१९०१:अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांची हत्या (जन्म: २९ जानेवारी १८४३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता ( शेवट )पोया अर्थात पोळाआला आला शेतकऱ्या पोयाचा रे सन मोठाहातीं घेईसन वाट्या आतां शेंदूराले घोटाआतां बांधा रे तोरनं सजवा रे घरदारकरा आंघोयी बैलाच्या लावा शिंगाले शेंदुरलावा शेंदूर शिंगाले शेंव्या घुंगराच्या लावागयामधीं बांधा जीला घंट्या घुंगरू मिरवाबांधा कवड्याचा गेठा आंगावऱ्हे झूल छानमाथां रेसमाचे गोंडे चारी पायांत पैंजनउठा उठा बह्यनाई, चुल्हे पेटवा पेटवाआज बैलाले नीवद पुरनाच्या पोया ठेवावढे नागर वखर नहीं कष्टाले गनतीपीक शेतकऱ्या हातीं याच्या जीवावर शेतींउभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदायाले कहीनाथे झूल दानचाऱ्याचाज मिंधाचुल्हा पेटवा पेटवा उठा उठा आयाबायाआज बैलाले खुराक रांधा पुरनाच्या पोयाखाऊं द्या रे पोटभरी होऊं द्यारे मगदूलबशीसनी यायभरी आज करूं या बागूलआतां ऐक मनांतलं माझं येळीचं सांगनआज पोयाच्या सनाले माझं येवढं मांगनकसे बैल कुदाळता आदाबादीची आवडवझं शिंगाले बांधतां बाशिंगाचं डोईजडनका हेंडालूं बैलाले माझं ऐका रे जरासंव्हते आपली हाऊस आन बैलाले तरासआज पुंज रे बैलाले फेडा उपकाराचं देनंबैला, खरा तुझा सन शेतकऱ्या तुझं रीन !- बहिणाबाई चौधरीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नव्या संसद इमारतीवर 17 सप्टेंबरला फडकणार तिरंगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातही 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण; सकल मराठा समाजाचा एल्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारात भारतातील दोन शाळांचा समावेश पहिली शाळा महाराष्ट्रातील अहमदनगरमधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल आणि दुसरी अहमदाबाद गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रामजन्मभूमीवरील उत्खननात सापडले मंदिराचे अवशेष, मुर्त्या आणि स्तंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रवाशांसाठी खुशखबर! IRCTC च्या वेबसाईटवर आता ST बसचं आरक्षण, शिंदे सरकारचा महत्वपूर्ण करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तानला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार बॉलर नसीम शाह आशिया कपमधून ‘बाहेर’*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मेहंदीने हात कसे रंगतात ?* 📙 मुलीचे हात पिवळे केले की सुटलो. असं पूर्वीचे वधुपिते म्हणत असत. कारण पारंपारिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही हळद लावून स्नान घालण्याचा प्रघात आहे. अजूनही तो चालू आहे. पण आजकालच्या लग्नात नवर्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हातपाय मेहंदीने रंगून काढण्याची प्रथा वाढीला आलेली आहे. अनेक बारीक बारीक नक्षीदार मेहंदींनं हात पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी?लाॅसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावांनं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत याला हिना म्हणतात आणि भारत उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पत्री सारखी हिरवी असली तरी त्यांच्यामध्ये लाॅसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नेपाळच्या जातकुळीतला या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोज सारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो.मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्याने त्या रंगांचा छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यत: हा रंग लाल नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्दयासारखा दालचिनी सारखा तपकिरी, काळसर चॉकलेटी चेरी सारखा गडद लाल, अशा वेगवेगळ्या रंगांची मेंदी मिळते. आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फाॅस्फोलिपीड रसायनाच्या किंवा त्या पेशीला प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात. प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या कॅरॅटीन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये कॅरेटीनचं प्रमाण जास्त असेल तर लाॅसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पालटतो. साधारणत: अठ्ठेचाळीस तासानंतर तो काळसर होऊ लागतो. पानांमधला रंग उतरून कातडी मध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटण्यात लिंबाचा रंग मिसळला जातो. त्यातला सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्याल्या लाॅसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं' या पुस्तकातून**संकलन:- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो कर्तव्याला जागतो, तोच कौतुकास पात्र होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची प्रमुख भाषा कोणती ? २) हिंदी भाषा कोणत्या लिपीत आहे ? ३) राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरी केली जाते ?४) जगात हिंदी भाषा कितव्या क्रमांकावर आहे ?५) राष्ट्रीय हिंदी दिवसाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?*उत्तरे :- १) हिंदी २) देवनागरी ३) १४ सप्टेंबर ४) चौथ्या ५) १९५३**संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सदाशिव जाधव, पदोन्नत मुख्याध्यापक, नांदेड👤 सतिश कोडगीरे, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी कुदाळे, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 अशोक चव्हाण, शिक्षक, माहूर👤 उषा नळगिरे, शिक्षिका, नांदेड👤 मधुसूदन कुलकर्णी👤 मेधा पुराणिक देसाई👤 अनिल लांडगे, साहित्यिक👤 नितीन भोसले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी संकटे साधनांची। व्रते दान उद्यापने ती धनाची॥ दिनाचा दयाळू मनी आठवावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या जवळ कितीही धनसंपत्ती असली किंवा गोड बोलणारे माणसे जवळचे कितीही असतील तरी शेवटी सोबतीला कोणीही नसतात तसेच धनसंपत्ती सुध्दा कायम पर्यंत टिकून राहत नाही. हे, सत्य आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण मोहाच्या आधीन होऊन जगत असतो आणि सर्व उशीरा कळल्यानंतर विचार करून खचून जातो त्यापेक्षा जर सत्य काय आहे कळले तर. .. व्यर्थ गोष्टींच्या मागे धावण्याची वेळ येणार नाही त्यासाठी सत्याला ओळखणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पराक्रमी कासवाचा मूर्खपणा*विशाल नावाचे कासव तलावात राहायचे. त्याच्याकडे मजबूत कवच होते. हे चिलखत शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. चिलखतामुळे किती वेळा त्यांचे प्राण वाचले.एकदा एक म्हैस तलावावर पाणी प्यायला आली. म्हशीचा पाय राक्षसावर पडला. तरीही ते विशालच्या लक्षात आले नाही. चिलखतीमुळे त्यांचे प्राण वाचले. तो खूप आनंदी होता कारण त्याचा जीव पुन्हा पुन्हा वाचत होता. विशालला हे चिलखत काही दिवसात जड वाटू लागले. या चिलखतीतून बाहेर पडूनच जीवन जगले पाहिजे, असे त्यांचे मत होते. आता मी बलवान आहे, मला चिलखतांची गरज नाही. विशालने दुसऱ्याच दिवशी चिलखत तलावात सोडले आणि इकडे तिकडे फिरू लागला. अचानक हरणांचा कळप तलावात पाणी पिण्यासाठी आला. अनेक हरणे आपल्या पिलांसह पाणी प्यायला आली. विशालला त्या हरणांच्या पायाने दुखापत झाल्याने तो रडू लागला. आज त्याने आपले चिलखत घातले नव्हते. त्यामुळे खूप दुखापत झाली होती. राक्षस रडत परत तलावाकडे गेला आणि चिलखत घातली. निदान चिलखत जीव वाचवते.नैतिक – निसर्गाकडून मिळालेली गोष्ट आदराने स्वीकारली पाहिजे, अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment