✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.**१९४६:भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.**१९४५:व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.**१९३९:दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.**१९२०:कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.**१९१६:पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:उत्तम शंकर सावंत -- कवी**१९७१:सरोज प्रभाकर आल्हाट-- कवयित्री लेखिका* *१९७०:प्राचार्य डॉ.पवन भाऊ मांडवकर-- कवी,कथाकार,कादंबरीकार* *१९६०:नितीन विनायक देशमुख-- कवी* *१९५२:जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५२:डॉ.अनिल कुमार मेहंदळे-- लेखक, गीतकार,समीक्षक* *१९४९:वामन हरी पांडे-- लेखक* *१९४७:प्रा.मोतीराम राठोड-- विचारवंत, लेखक,सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:१९ आगस्ट २०१९)**१९४३:शुभदा शरद गोगटे-- मराठी साहित्यातील एक प्रथितयश लेखिका**१९४३:मुकुंद रघुनाथ दातार-- समीक्षक, संपादक,कवी,संतसाहित्याचे अभ्यासक**१९४१:साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री**१९२८:कुसुम देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१८८६:प्रा.श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक,विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक.(मृत्यू:२५ डिसेंबर १९५७)**१८७७:फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)**१८४५:डॉ.अण्णा मोरेश्वर कुंटे -- लेखक, वैद्यकशास्त्राचे अभ्यासक(मृत्यू:१५ जुलै१८९६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:शिरीष व्यंकटेश पै-- मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार(जन्म:१५ नोव्हेंबर १९१९)* *२०११:श्रीनिवास खळे – जेष्ठ प्रसिद्ध संगीतकार (जन्म:३० एप्रिल १९२६)**२००९ :आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन (जन्म:८ जुलै १९४९)**१९९९:डी.डी.रेगे – चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म:१७ डिसेंबर १९११)**१९९०:नरहर शेषराव पोहनेरकर – कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास' (जन्म:३ आक्टोबर १९०७)**१९७६:विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – सुप्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) (जन्म: १९ जानेवारी १८९८)**१९६९:हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १८९०)**१९६०:डॉ.शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) या संस्थेचे संचालक**१९३७:वासुदेवशास्त्री लक्ष्मणशास्त्री पणशीकर -- संपादक, प्रकांड पंडित(जन्म:३० मे १८६०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता...... पाऊस मनीचा ......पाऊस मनीचा कधी सरणार आहेकाठोकाठ प्याला आता भरणार आहेबंध मनाचे सारे तुटले आता हेदुःख आसवांत सजणार आहेअडखळले जे गीत निःशब्द भावनांचेशब्दातून ओठावर ते फुलणार आहेयातना हृदयातल्या डोळ्यांत साचलेल्यासांग कधी दुःखात भिजणार आहेसावली आता मज सोडून जाणारअंधारच तिचे अस्तित्व पुसणार आहेसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना; शरद पवार, संजय राऊतांसह13 जणांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा, तर मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजातील 'त्या' 1553 उमेदवारांना मोठा दिलासा; शासकीय सेवेत नियुक्तीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही; सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना झटका; आजपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *LPG गॅस सलग दुसऱ्यांदा स्वस्त, आजपासून व्यावसायिक सिलिंडर 150 रुपयांनी स्वस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक - आज होणाऱ्या भारत-पाक क्रिकेट सामन्यावर पावसाचे सावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सिंधुदुर्ग* महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत बरी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची गुप्तचर संस्था *रॉ* चे घोषवाक्य काय आहे ?२) भारताची गुप्तचर संस्था *रॉ* चा संपूर्ण कारभार कोणाच्या देखरेखीत चालतो ?३) आंतरराष्ट्रीय पातळीवर गुप्तचर घडामोडींची माहिती हाताळण्यासाठी भारतात *रॉ* ची स्थापना केव्हा झाली ?४) तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६८ साली *रॉ* चे पहिले संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली होती ?५) एखाद्या देशाच्या सुरक्षेसाठी शत्रू राष्ट्रांकडील गुप्त माहिती हुडकून काढण्याचे काम करणारे जगातील प्रमुख तीन गुप्तचर संस्था कोणत्या ?*उत्तरे :-* १) धर्मो रक्षति रक्षित २) पंतप्रधान कार्यालय ३) सन १९६८ ४) रामेश्वरनाथ काव ५) सेंट्रल इंटिलिजन्स एजेन्सी CIA - अमेरिका, सीक्रेट इंटिलिजन्स सर्व्हिस MI6 - इंग्लंड, फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस FSB - रशिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजाराम राठोड, विषय शिक्षक, नांदेड👤 प्रवीण इंगळे👤 शरद शेळकांडे👤 किशोर तळोकार, साहित्यिक, यवतमाळ👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, अमरावती👤 विठ्ठल पाटील👤 रवी भलगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापाशी सर्व काही असेल. .पण, चांगल्या व्यक्तीची साथ, संगत नसेल तर..आपल्या मनातील विचार, सुख, दु:ख,व्यथा सांगायला व मन मोकळे करायला विचार करावा लागतो. कधी, कधी हे सर्व होतही नाही. त्यामुळे आपण मनातल्या मनात तुटून सुध्दा जातो. यासाठीच आपल्या जीवनात एक तरी चांगली व्यक्ती असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• _*📜 सत्य 📜*_ *एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली कि मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले कि असा हार कसा मिळवायचा?. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले,"राजन! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे." राजा म्हणाला,"काय आहे ती अडचण?" विद्वान मुनी म्हणाले,"तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल. पापी लोंकाना हा हार दिसणार नाही." या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना कि आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला कि आता याला दोरी म्हणावे कि हार? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला कि राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले. दोन-तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले,"राजेमहाराज!आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक,मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे पण आज हि दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत झाले आहे, जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचे म्हणणे हे दाबून ठेवले जाते व सत्य जगासमोर येत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment