✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २५१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड**२०००:सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.**१९९१:मॅसेडोनियाला (युगोस्लाव्हियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६६:’स्टार ट्रेक’ या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.**१९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.**१९५४:साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना**१८५७:ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी**१८३१:विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:राज पांडुरंग शेळके-- कवी, व्याख्याते* *१९७८: डॉ.सतीश महादेव दणाणे -- कवी,लेखक, संपादक* *१९६१:मोहन गोपाळराव दाढी-- लेखक, कवी* *१९५९:लीना निरंजन सोहोनी-- मराठी लेखिका आणि अनुवादक**१९५८:दत्तात्रय पांडुरंग मानुगडे -- ग्रामीण कथालेखक**१९५१:डॉ.कल्याणी हर्डीकर-- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री* *१९४४:विद्याधर व्यास-- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक* *१९४०:प्राचार्य जीवन नारायणराव देसाई-- जेष्ठ कवी,लेखक* *१९३८:रमेश सहस्रबुद्धे--- मराठी विज्ञानकथा लेखक(मृत्यू:२८ डिसेंबर २०१६)**१९३३:आशा भोसले – गेली पन्नास वर्षेपेक्षा रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्‍या प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९२६:भूपेन हजारिका – संगीतकार व गायक,आसामी भाषेतील कवी,चित्रपट निर्माते, लेखक(मृत्यू:५ नोव्हेंबर २०११)**१९२५:पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक(मृत्यू:२४ जुलै १९८०)**१८९९:गणेश शिवराम (नाना) जोग-- नाटककार (मृत्यू:१मे १९५८)**१८९८:दत्तात्रय सीताराम पंगू -- प्राचीन मराठी कवितेचे संशोधक, संपादक व टीकाकार (मृत्यू:१९ आगस्ट १९५५)**१८८७:स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (मृत्यू:१४ जुलै १९६३)**१८४८:व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:८ ऑगस्ट १८९७)**११५७:रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (मृत्यू:६ एप्रिल ११९९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:व्ही. के. नाईक --मराठी चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक(जन्म:१० सप्टेंबर १९३३)**२०१०:मुरली – तामिळ अभिनेता (जन्म:१९ मे १९६४)**१९९७:कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ (जन्म:१८ जून १९११)**१९९१:वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – प्रसिद्ध कवी. १९५२ मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.(जन्म:६ आक्टोबर १९१३)**१९८२:शेख अब्दुल्ला – शेर - ए - कश्मीर (जन्म:५ डिसेंबर १९०५)**१९८१:निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी (जन्म:१७ एप्रिल १८९७)**१९६०:फिरोझ गांधी –पत्रकार व राजकारणी (जन्म:१२ सप्टेंबर १९१२)*  *_आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताअग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।ढगाला उन्हाची केवढी झळ ।थोडी न्‌ थोडकी लागली फार ।डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।वारा वारा गरागरा सो सो सूम्‌ ।ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।खोलखोल जमिनीचे उघडून दार ।बुडबुड बेडकाची बडबड फार ।डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।। – संदीप खरे संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार, मात्र आंदोलन कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हाथी, घोडा, पालखी जय कन्हैया लाल की...देशभरात कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पश्चिम बंगालमधील आमदार, मंत्र्यांच्या वेतनात 40 हजारांची वाढ, लाखोत मिळणार मासिक रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जपानच्या SLIM यानाची चंद्रावर स्वारी; इस्रोने देखील दिल्या शुभेच्छा, 'अंतराळ क्षेत्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साखरेचा गोडवा वाढला, दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *यवतमाळ* महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वाधिक स्तनपान कोणत्या देशात होते ?२) जगात सर्वात कमी स्तनपान कोणत्या देशात होते ?३) स्तनपानामुळे बाळाला काय फायदा होते ?४) स्तनपानामुळे मातांना काय फायदा होतो ?५) जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) रवांडा (८७ टक्के ) २) ब्रिटन (०.५ टक्के ) ३) संसर्ग होण्याचा धोका कमी, बौद्धिक क्षमता वाढते, लठ्ठपणा आणि मधुमेहापासून बचाव ४) कर्करोगाचा धोका कमी, रक्तस्त्राव कमी, वजन कमी ५) १ ते ७ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रशांत चौधरी, शिक्षक, नांदेड👤 मिर्जा खालेद बेग👤 कृष्णा हंबर्डे👤 बालाजी वारले👤 योगेश जंगले👤 शंकर सारगोड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बळें आगळा राम कोदंडधारी। महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक पण, आपल्या मताप्रमाणे न होता क्षणातच ते,वेगळे झालेले बघायला मिळते. त्या विषयी आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही. म्हणजेच आपल्या पेक्षा कोणीतरी दुसरा असते हे सर्व घडवून आणणारा व बघत राहणारा ती म्हणजेच नियती होय. ती कधी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून असे कोणतेच व्यर्थ काम करू नये की, आपल्याला दु:खात बुडण्याची वेळ येईल शेवटी सत्य हे अंतिम सत्यच असते आपण त्याचाच पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने स्वीकार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मांजर पळून जाते*ढोलू-मोलू हे दोन भाऊ होते. दोघे खूप खेळायचे, अभ्यास करायचे आणि कधी कधी खूप भांडायचे. एके दिवशी दोघेही त्यांच्या घराच्या मागे खेळत होते. एका खोलीत दोन लहान मांजरीचे पिल्लू होते. मांजराची आई कुठेतरी गेली होती, दोन्ही मुलं एकटीच होती. त्याला भूक लागली होती म्हणून तो खूप रडत होता. ढोलू-मोलूने दोन्ही मांजरीच्या पिल्लांचा आवाज ऐकला आणि आजोबांना हाक मारली. दोन्ही मांजरीचे पिल्लू भुकेले असल्याचे आजोबांनी पाहिले. आजोबांनी त्या दोन्ही मांजरीच्या पिल्लांना एक वाटी दूध दिले. आता मांजराची भूक शमली आहे. दोघेही एकमेकांशी खेळू लागले. ते पाहून  ढोलू-मोलूने मांजर वाचल्याचे सांगितले.आजोबांनी ढोलू-मोलूचे अभिनंदन केले.नैतिक शिक्षण –  इतरांचे भले केल्याने आनंद मिळतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment