✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 सप्टेंबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.**२००२:चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.**१९९९:साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर**१९९७:महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.**१९६२:बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९४८:निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.**१९४७:अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय. ए.(CIA) ची स्थापना.**१९२७:महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना**१९२४:गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.**१९१९:हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.**१८८५:कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या**१८१०:चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:मनीषा रायजादे पाटील-- कवयित्री* *१९५६:छगन चौगुले -- मराठी लोकगीत गायक(मृत्यू:२१ मे २०२०)* *१९५३: डॉ.जयश्री रत्नाकर पाटणकर -- कवयित्री,लेखिका* *१९५०:रामचंद्र सडेकर-- मराठी कथालेखक, कादंबरीकार,पटकथा लेखक आणि प्रकाशक**१९४८:अनुराधा महादेव फाटक--बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या लेखिका**१९४७: सुधाकर गायधनी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध महाकवी,लेखक**१९४५:अशोक मनोहर भोले-- लेखक,कवी* *१९२०:भीमराव लक्ष्मीकांत परतूरकर-- जेष्ठ इतिहास संशोधक (मृत्यू:५ जानेवारी १९६८)* *१९१६:वसंतराव बलवंत अरगडे-- शैक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिणारे लेखक तथा पूर्व उपशिक्षणाधिकारी**१९१२:गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू:२१ फेब्रुवारी १९७५)**१९०६:प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली.(मृत्यू:१८ सप्टेंबर १९९५ )**१९०५:ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू:१५ एप्रिल १९९०)**१९०२:सदाशिव विनायक देशपांडे-- चरित्रकार प्रवचनकार (मृत्यू:५ मे१९६९)**१९०२:दत्त रघुनाथ कवठेकर--कथाकार कादंबरीकार(मृत्यू:१६ ऑगस्ट १९७९)**१९००:शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (मृत्यू:१५ डिसेंबर १९८५)**१८८३:मदनलाल धिंग्रा-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक(मृत्यू:१७ ऑगस्ट १९०९)**१८५१:डाॅ.विष्णू गोपाळ आपटे-- वैद्यकीय विषयावर लिखाण करणारे मराठी लेखक(मृत्यू:२९ जुलै, १८९९)**१७०९:सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)*    *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:विद्याधर विष्णू चिपळूणकर-- महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक,जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत(जन्म :१३ एप्रिल १९२९)* *२००४:डॉ.भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५)**२००२:शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार (जन्म:३१ ऑगस्ट १९४०)**१९९९:अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक(जन्म: ४ ऑक्टोबर, १९३३)**१९९५:प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)**१९९३:असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या**१९९२:मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०) (जन्म: १७ डिसेंबर १९०५ )**१७८३:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (जन्म: १५ एप्रिल १७०७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची : माहिती गणरायाची*थेऊरचा चिंतामणीअष्टविनायक गणपती मधील दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी गणपती होय.थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे. येथे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो.ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहेपुढील भागात - सिद्धटेकचा सिद्धिविनायकसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नव्या संसदेच्या वास्तूवर फडकवला तिरंगा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'एक मराठा, लाख मराठा'ने सांगली दुमदुमली; मराठा क्रांती मोर्चाचा लाखोंच्या उपस्थितीत अतिविराट मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी मुंबईकर बाहेर पडल्याने गाड्यांची गर्दीच गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अनंतनागमध्ये ऑपरेशन ऑलआऊट! पाचव्या दिवशीही चकमक सुरू, दहशतवाद्यांचा होणार खात्मा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मोहम्मद सिराजच्या दानशूरपणाला अख्ख्या श्रीलंकेचा सलाम, सामनावीर किताब आणि पुरस्काराचे पैसे ग्राऊंड्समनला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा आठवावा प्रताप, श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव करत आशिया चषकावर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *भोपाळ दुर्घटना का झाली ?* 📕१९८५ मध्ये भोपाळच्या युनियन कार्बाईड या कंपनीत वायूगळती झाली व त्यात ५००० लोक बळी पडले. कित्येक हजार लोक आजारी पडले. या घटनेविषयी, त्यानंतरच्या नुकसानभरपाईसाठीच्या आंदोलनाविषयी, तसेच न्यायालयातील साक्षीपुराव्यांविषयीही तुम्ही वृत्तपत्रात वाचले असेल. भारतातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेविषयी सर्वांचे डोळे उघडणाऱ्या या दुर्घटनेविषयी माहिती घेऊ. भोपाळच्या कारखान्यात वायूगळती झाली. मिथाईल आयसोसायनेट हा तो वायू. सामान्यपणे मिथाईल आयसोसायनेट द्रव अवस्थेत असते, पण तापमान ३१° सेंटीग्रेडच्या वर गेले तर मात्र हा द्रव वायूरूप होतो.पाणी व इतर अनेक द्रावणाशी मिथाईल आवसोसायनेट संयोग पावत असल्याने चांगल्या प्रकारे निष्क्रीय अशा परिस्थितीत तो साठवावा लागतो.मिथाईल आयसोसायनेट हा अत्यंत विषारी पदार्थ आहे. हायड्रोजन सायनाईड व फॉस्जीन या विषारी वायूपेक्षाही तो जास्त विषारी आहे व त्यांच्यापेक्षा कमी प्रमाणात शरीरात गेला, तरीही गंभीर परिणाम होऊ शकतात.हा वायू त्वचा, डोळे व शरीरातील इतर आवरणांमध्ये दाह निर्माण करतो. वायू शरीरात गेल्यानंतर ४८ तासात मरणाऱ्या व्यक्तीमध्ये घशात जळजळ, असहय अशी डोळ्यांची जळजळ, छातीत वेदना व श्वसनाला खूप त्रास अशी लक्षणे दिसतात. फुफ्फुसाला सूज आल्याने मृत्यू येतो. ५-६ दिवसांत मरणाऱ्या व्यक्तींमध्ये स्नायूमध्ये शक्तिपात, लुळेपणा, झटके, कोमा ही लक्षणे दिसतात व मृत्यू मेंदूच्या सुजेमुळे होतो. गरोदर स्त्रियांमध्ये या वायूमुळे गर्भपात, अपेक्षित तारखेच्या आधी बाळंतपण व मृत बालकाचा जन्म अशा गोष्टी आढळून आल्या.रक्ताची रासायनिक तपासणी केल्यास त्यात मिथाईल आयसोसायनेट, सायनाईड आयन तसेच मोनोमेथीलामीन हे पदार्थ सापडले. यांच्यावरून सहजगत्या निदान होऊ शकते.या विषबाधेवरचे उपचार लक्षणानुरूप करावे लागतात. प्रतिजैविके, स्टेरॉईडस, डोळ्यांत औषधाचे थेंब व श्वसनासाठी प्राणवायू इ. उपायांचा यात समावेश होतो. अशी दुर्घटना होऊ न देणे, हाच उत्तम उपाय होय. त्यासाठी कारखान्यातील सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यंत्रसामुग्री, रसायने साठवण्याचे टँकर, रसायने वाहून नेणाऱ्या नळ्या इत्यादींची देखभाल नीट केल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन : श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरूडाइतके उडता येत नाही,म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या समुद्रयान मोहिमेसाठी कोणती पाणबुडी तयार करण्यात आली आहे ?२) देशात सर्वाधिक हत्तीचे कॉरिडॉर कोणत्या राज्यात आहेत ?३) जगातील एकूण हत्तीपैकी भारतात हत्ती किती टक्के आहेत ?४) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर कोणते ?५) भारतातील सर्वात पहिले भूअंतर्गत ट्रान्सफॉर्मर कोठे निर्माण करण्यात आले ? *उत्तरे :-* १) मत्स्य - ६००० २) पश्चिम बंगाल ३) ६० टक्के ४) टोकियो, जपान ५) बंगळुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 किरण इंदू केंद्रे, संपादक, किशोर मासिक, पुणे👤 योगेश सुधाकर मुक्कावार👤 साईनाथ वाघमारे👤 सुनील पाटील बोमले👤 योगेश शंकरोड👤 रामकृष्ण काकानी👤 देवेंद्र रेड्डी गडमोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 सुदर्शन वाघमारे, पत्रकार, धर्माबाद👤 सचिन महाजन, ग्राव्हिटी कोचिंग क्लासेस, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं। तया पामरा बाधिजे सर्व कांही॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता। वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठ्यांना तर आपण नेहमीच मान देत असतो. तसच एकदा तरी माणुसकीच्या नात्याने लहान मानसालाही मान देऊन बघावे, त्याचे मनोबल वाढवावे कधी काळी वेळ, प्रसंगी सांगता येत नाही . आपल्यावर आलेल्या परिस्थितीमुळे जर कोणी आपल्याला नाही ओळखले तरी ज्याला आपण मान दिले असाल कदाचित ती व्यक्ती ओळखू शकते व आपली मदत करू शकते.कारण त्या व्यक्तीकडे जरी संपत्ती नसली तरी खरी माणुसकी व कठीण परिस्थिती सहजपणे ओळखता येते त्याविषयी सर्वाना अनुभव असेलच असे नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरी मैत्री*अजनारच्या जंगलात सूर सिंह आणि सिंह राज हे दोन पराक्रमी सिंह राहत होते . सूर सिंग आता म्हातारा होत होता. आता तो जास्त शिकार करू शकत नव्हता. सिंहराज त्याची शिकार करून अन्न आणत असे. सिंहराज जेव्हा शिकारीला जायचे तेव्हा सूर सिंग एकाकी व्हायचे. भीतीपोटी एकही प्राणी त्याच्या जवळ जात नव्हता. आज सुरसिंगला एकटा पाहून कोळ्यांचा कळप फुटला. आज कोल्हाला मोठी शिकार मिळाली होती. कोल्हाळांनी सुरसिंगला चारी बाजूंनी ओरबाडून जखमी केले होते. तो बेशुद्ध झाला. तेवढ्यात सिंहराज गर्जना करत तिथे आला. सिंहराजाला तिथे येताना पाहून कोल्हाळांचा जीव गेला. सिंह राजने काही वेळातच सर्व कोल्ह्यांचा पाठलाग केला. त्यामुळे त्याचा मित्र सुरसिंग याचा जीव वाचला.नैतिक – खरी मैत्री नेहमीच उपयोगी असते, जीवनात खरा मित्र असणे आवश्यक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment