✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 सप्टेंबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक पर्यटन दिन_* *_ या वर्षातील २७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.**१९६१:सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५८:मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.**१९४०:दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.**१९२५:डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.**१८२१:मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: प्राजक्ता लालासाहेब शिंदे- कवयित्री* *१९९४:विशाल विकासराव कुलट- कवी,लेखक**१९८१:लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू**१९८१:ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू**१९७९:सचित पाटील--भारतीय अभिनेता,दिग्दर्शक,लेखक आणि नाट्य दिग्दर्शक**१९७६:विभा नरेंद्र विंचूरकर -- कवयित्री* *१९६८:राहुल देव-- भारतीय अभिनेता**१९६३:धनंजय सरदेशपांडे-- लेखक* *१९६२: मनोहर शार्दुल विभांडिक -- लेखक कवी* *१९६०:प्रा.अरुण सांगोळे -- कवी,गीतकार* *१९५९:मुकुल बाळकृष्ण वासनिक-- माजी केंद्रीय मंत्री**१९५७ प्रा.जोतीराम कृष्णराव पवार -- लेखक* *१९४७:प्रा.हेमंत जयवंत घोरपडे-- प्रसिद्ध लेखक* *१९४६:रवी चोप्रा-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक (१२ नोव्हेंबर २०१४)**१९४५:अनिल विष्णुपंत कुलकर्णी-- लेखक* *१९४४:निता प्रभाकरराव पुल्लीवार -- लेखिका* *१९३९:विजय हरी वाडेकर-- कादंबरीकार (मृत्यू:३ मार्च २०१४)**१९३५:डॉ.शंकर नागेश नवलगुंदकर--लेखक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू**१९३२:यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू:२१ आक्टोबर २०१२)**१९०६:सुंदरराव भुजंगराव मानकर-- नाटककार,वृत्तपत्रकार(मृत्यू:१८ एप्रिल १९४६)**१८९९: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,कथाकार (मृत्यू:१२ मार्च १९६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:कविता महाजन-- भारतीय लेखिका आणि अनुवादक(जन्म :५ सप्टेंबर १९६७)**२००८:महेन्द्र कपूर – प्रसिद्ध पार्श्वगायक (जन्म:९ जानेवारी १९३४ )**२००४:शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म:८ फेब्रुवारी १९२५)**१९९९:डॉ.मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म:२६ डिसेंबर १९३५)**१९९२:अनुताई वाघ – समाजसेविका,शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १७ मार्च १९१०)**१९८७:भीमराव बळवंत कुलकर्णी-- मराठीतील संस्थात्मक कार्याचा ध्यास असलेले साहित्यिक,वक्ते,समीक्षक (जन्म:४ नोव्हेंबर १९३२)**१९७५:तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)**१९७२:एस.आर.रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)**१९२९:शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते,विद्वान,वक्ते,लेखक,व पत्रकार (जन्म:२७ जून १८६४)**१८३३:राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक,धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक(जन्म:२२ मे १७७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची**पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती*श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.टीप - उद्या अनंत चतुर्दशी अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे. आपल्या माहितीला येथेच पूर्णविराम देत आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं संकट, 5 कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; शास्त्रज्ञांचा दाव्यामुळे चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, कांदा प्रश्नी अजित पवारांचा बैठकीतूनच मंत्री पियुष गोयलांना फोन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत पावसाची दाणादाण, गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये घुसले पाणी; नागरिकांचे प्रचंड हाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जायकवाडी धरणात चार दिवसांत 6 टक्के पाण्याची वाढ, पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण; घोडेस्वार टीमने 41 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज राजकोट मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👁 *आपल्या डोळ्याचे कार्य नेमके कसे चालते ?* 👁*********************** डोळ्यांनी आपण जग बघतो तर जग आपल्या डोळ्यांतून आपल्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत असते. डोळे मनातील भाव कवचितच लपवू शकतात.पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोळ्यांची रचना बरीचशी सारखी असते. याउलट कीटक जाती, काही जलचर यांचे डोळे त्यांच्या देहाच्या मानाने खूपच मोठे व वेगळ्या प्रकारचे असतात. वेगळेपणाचा मुख्य भाग म्हणजे त्यांचा डोळा हा 'डोळा' नसून अनेक संवेदनाक्षम मज्जातंतूंची ती एक सलग जाळीच असते. त्यामुळे कीटकांच्या डोळ्यांना 'कंपाऊंड आइज' असेही म्हटले जाते.माणसाला रंगदृष्टी असून रंगज्ञान उत्तम असते. अन्य प्राण्यांच्या बाबतीत याची नक्की कल्पना आपल्याला नाही. रंगांच्या असंख्य छटा तात्काळ ओळखता येणे व जेमतेम एक दशांश मिलिमीटर एवढ्या लहान बिंदूला वेगळे वा सुटे पाहता येणे ही मानवी डोळ्यांची वैशिष्टय़े म्हणता येईल.मानवी डोळ्याच्या शास्त्रीय वर्णनापेक्षा त्याची प्रमुख वैशिष्टे जर बघितली तर डोळ्याला मेंदूखालोखाल संरक्षण दिले आहे, असे लक्षात येते. जोराचा पाऊस, तीव्र ऊन, धुळीचे वादळ या सर्वांपासून अंगभूत संरक्षण डोळा मिळवतो. सतत नकळत होणारी पापण्यांची उघडझाप, डोळ्यांच्या बाहुल्या प्रकाशाच्या तिरपीनुसार आपसूक कमी जास्त होणे व डोळ्यांत जाणारी धूळ सतत अश्रूंच्या मदतीने धुतली जाऊन ते स्वच्छ राहणे या क्रिया इतक्या नकळत सहज घडत असतात की, त्या सांगितल्यावरच लक्षात येतात. यावरूनच आपण नेहमी उद्गारतो, 'डोळ्याची पापणी लवण्याच्या आत अमुक एक गोष्ट घडली'. काॅर्नियातुन म्हणजे बुबुळावरील पारदर्शक आवरणातून प्रकाशकिरण यातून डोळ्यात प्रवेश करतात. त्यांच्या तीव्रतेनुसार डोळ्याची बाहुली लहान मोठी होऊन मग ते डोळ्याच्या भिंगातून आतील भागात जातात. डोळ्याच्या आतील पोकळीत रंगहीन पारदर्शक तैलद्रव भरलेला असतो. मागील बाजूला असलेला पडदा व दृष्टीपटल यावर भिंगातून आलेल्या किरणांची प्रतिमा पडते. हा पडदा दोन प्रकारच्या पेशींनी बनलेला असतो. सुमारे बारा कोटी रॉड्स व साठ लाख कोन्स यांनी एका डोळ्याचा रेटिना बनतो. डोळ्याच्या आतील किमान ७२ टक्के भाग पडद्याने व्यापलेला असतो व मेंदूशी या भागाचा ऑप्टिक नर्व्हतर्फे संबंध जोडला जातो. राॅड्सवर कमी प्रकाशात करड्या, काळ्या, पांढऱ्या रंगाचा परिणाम होतो; तर कोन्सवर हिरव्या, लाल व निळा रंगछटांचा परिणाम होतो. रॉडसना दंडगोल व कोन्सना शंक्वाकृती पेशी असेही संबोधले जाते. पण डोळ्यांच्या संदर्भात व्यवहारात कॉर्निया, रेटिना, रॉड, कोन व लेन्स हे शब्दच जास्त परिचित आहेत. उदा. कॉर्नियाचे रोपण, रेटिनाची डिटॅचमेंट, डोळ्यांत लेन्स बसवणे इत्यादी.रेटिनाकडून मेंदूकडे पाठवले जाणारे संदेश हे 'कोडेड' स्वरूपात जातात. या कोडबद्दल अद्याप पुरेसे स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ते झाल्यास अंध माणसास डोळ्यांशिवाय सुद्धा पाहता येईल, अशी एक शक्यतस शास्त्रज्ञ वर्तवतात. डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांचे वाचन मेंदूतील मागील बाजूच्या भागात होते. डोक्यावर मागील बाजूला जोरात टप्पल मारल्यास प्रथम डोळ्यांसमोर काजवे चमकतात ते यामुळेच.दोन डोळय़ांमुळे लांबचे व जवळचे अंतर वा खोली याचा नेमका अंदाज आपल्याला येतो. ज्यावेळी डोळ्यांच्या भिंगातून रेटिनावर पडणारी प्रतिमा अलीकडे वा पलीकडे पडते, त्यावेळी चष्म्याची जोड देऊन दुरुस्ती करावी लागते. डोळ्याची लेन्स अपारदर्शक झाली, तर त्यालाच 'मोतीबिंदू' असे म्हणतात. यावेळी ही लेन्स काढुन कृत्रिम लेन्स बसवली जाते. बुबुळाच्या पुढचा पारदर्शक पडदा म्हणजे कार्निया 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वा अन्य काही कारणांनी अपारदर्शक बनला, तर नवीन कॉर्नियाचे रोपण करता येते. दृष्टीदान म्हणजे मृत माणसाचा कॉर्निया मृत्यूनंतर लगेच काढून हे रोपण केले जाते.जगाच्या पाठीवरील माणसांचे डोळे वेगवेगळे भासण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्यांचे रंग. या रंगछटांचे खेळच डोळ्यांकडचे आपले लक्ष खिळवून ठेवतात. घारे, निळे, करडे, तांबूस, काळे, पिंगट असे रंग माणसाच्या नजरेची आठवण देत राहतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रोज सकाळी एकच गोष्ट तुम्हालाप्रेरणा देऊ शकते…. ती म्हणजे तुमचे ध्येय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार कोणता ?२) भारतातील 'अंतरिक्षनगर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) 'रसायनाचा राजा' म्हणून कोणाला संबोधतात ?४) वनस्पतींचा कोणता अवयव जमिनीत वाढतो ?५) 'युनिव्हर्सल डोनर' ( सर्वयोग्य दाता ) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारतरत्न २) श्रीहरिकोटा ३) सल्फ्युरीक अँसिड ४) मूळ ५) o रक्तगट *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. प्रतिभा जाधव, साहित्यिक, नाशिक👤 सद्दाम दावनगीरकर, देगलूर👤 नरेश केशववार, धर्माबाद👤 अनिल आर्य माकने, धर्माबाद👤 अजित कड, साहित्यिक, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी राम विश्राम तेथेचि आहे। सदानंद आनंद सेवोनि आहे॥ तयावीण तो शीण संदेहकारी। निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाज म्हटलं की, त्यात श्रीमंत गरीब, श्रेष्ठ, कनिष्ठ या प्रकारची रचना नेहमीच बघायला मिळत असते. श्रीमंत माणसं धनधान्यांने संपन्न असतात तर त्यात काही माणसं गरीब सुद्धा असतात. आपण गरीब आहोत म्हणून स्वतःला कमी लेखू नये व श्रीमंत आहोत म्हणून माजू नये.गरीब माणसं देखील आपल्या गुण कर्तुत्वाने श्रीमंत होवू शकतात .असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी स्वबळावर श्रीमंती गाठलेली आहे. म्हणून स्वतःही दु:खी राहू नये व कोणाला कमी लेखू नये सदैव समाधानी रहावे. कारण समाधान ही सर्वात मोठी गोष्ट आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःचे नुकसान*शहरात एक छोटंसं दुकान, त्यात काही चिप्स, पापड, टॉफी, बिस्किटे वगैरे विकायची. हे दुकान अब्दुल मियाँ यांचे होते. त्यांची अवस्था सर्वांना माहीत होती, म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांच्या इच्छेविरुद्धही अशा गोष्टी घ्यायचे. जेणेकरून अब्दुल मियाँ काही पैसे कमवू शकतील. दुकानात उंदरांनीही आपला तळ ठोकला होता. दुकानात एकापेक्षा एक खोडकर उंदीर घुसले होते. उंदरांनी टॉफी आणि बिस्किटांचे नुकसान करण्यास सुरुवात केली होती. अब्दुल खूप अस्वस्थ झाला होता, त्याला समजत नव्हते की तो या खोडसाळपणापासून कसा वाचेल. एकदा तर अब्दुल बसला होता आणि तीन-चार उंदीर एकमेकांशी भांडत होते. अब्दुलला राग आला आणि त्याने एक काठी त्या उंदरांकडे फेकली. उंदीर उड्या मारून धावले, पण काठी इतक्या वेगाने उडाली की टॉफी असलेली काचेची भांडी फुटली. असे केल्याने आणखी नुकसान झाले.निष्कर्ष – रागाच्या भरात कोणतेही काम करू नये, ते स्वतःसाठी हानिकारक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment