✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/03/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *शिक्षक दिन - आल्बेनिया* 💥 ठळक घडामोडी :-  ● १७७१ : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली. ● १९८३ : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली. ● २००९ : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना. ● २००६ : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले. ● १९३६ : दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले. ● १८७६ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले. ● २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने. 💥 जन्म :- ● १९३४ : नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९४२ : उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५५ : अनुपम खेर – चित्रपट अभिनेता ● १९५२ : सर विवियन रिचर्ड्‌स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ● १९३४ : नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक ● १९११ : सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली) ● १८४९ : ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६) ● १७९२ : सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१) ● १५०८ : हुमायून – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: १७ जानेवारी १५५६) 💥 मृत्यू :- ● १९५२ : परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. ● २०१२ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६) ● २००० : प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ आक्टोबर १९३१) ● १९९३ : इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १९००) ● १९६१ : गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. (जन्म: १० सप्टेंबर १८८७) ● १९२२ : गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७) ● १६४७ : दादोजी कोंडदेव – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू ● १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर, शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारीसाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी जाहीर, आमदार निधीत एक कोटीची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पेट्रोल आणि डिझेल लीटरमागे एक रुपयाने महागणार, अर्थसंकल्पानंतर इंधनावर अतिरिक्त कर तर पुढील 2 वर्षांसाठीत मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचा दिलासा, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनाही सवलत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली 31 वर, कोरोनामुळे अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा रद्द, दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक, आयफा सोहळाही पुढे ढकलला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येस बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आरबीआयनं निर्बंध लादल्यानं खातेदार धास्तावले, तर कुणाचेही पैसे बुडणार नाहीत, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गेल्या कित्येक दिवसांपासून ताटकळत असणाऱ्या थेट सरपंच निवड रद्द करण्याच्या कायद्यावर अखेर राज्यपालांनी केली स्वाक्षरी, या विधेयकावर स्वाक्षरी झाल्यामुळे राज्यातील १९ जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतील सरपंचाची निवड थेट होण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या भारतीय महिला संघाचे केले अभिनंदन, सचिन तेंडुलकरने दिला मोलाचा सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, फडणवीस सरकारचा निर्णय कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रामीण महिला व महिला दिन* https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *झाडदादा* - शीला अम्भुरे बिनगे, परतुर, जालना झाडदादा झाडदादा का रे तू उभा असा ? शिक्षा का केली कुणी कंटाळत नाही कसा ? ऊनपाऊस वारा थंड दुखत नाही का घसा? फळे फुले छाया देतो देण्याचा तुझा वसा. उमटवलास माझ्यावरी दातृत्वाचा गोड ठसा. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" परिवर्तन " हा निर्सगाचा नियम आहे, तो न घाबरता मान्य  करावा.. संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत...* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण ?* नाशिकराव तिरपुडे 2) *हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला ?* इगोर सिकोसकी 3) *ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?* जेम्स कुक , 1608 4) *महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी किती किमी आहे ?* 800 km 5) *भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा हे प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे ?* 10 रू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भीमराव रेणके 👤 मनोज घोगरे 👤 अविनाश मोटकोलू *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात, मित्रांनो साम्नैव यत्र सिद्धिर्न तत्र दण्डो बुधेन विनियोज्य: पित्रं यदि शर्करया शाम्यति कोsर्थ: पटोलेन।। माणसांनी परस्परांमधले संघर्ष शक्यतो समजुतीने सोडवावेत, असा संदेश देणाऱ्या वरील सुभाषितात कवी म्हणतो - जे काम सामोपचारानं होण्यासारखं आहे तिथं समजूतदार माणसानं शरीरबळाचा वापर करू नये. पित्ताचं शमन जर सारखेनं होत असेल, तर त्यासाठी परवर आणायची गरज नाही. राजनीती साम, दाम, दंड आणि भेद या चार खांबावर उभी असते. समाजनीतीलाही हीच चार तत्वं लागू पडतात माणसामाणसांतले संघर्ष सोडवण्याचे हे चार मार्ग असून, त्यांचा ज्या क्रमानं उल्लेख केला आहे त्याच क्रमानं उल्लेख प्रयोग करायचा असतो. वादविवाद किंवा संघर्ष निर्माण झाला, तर तो आधी सामोपचारानं मिटवायचा प्रयत्न करावा. सामोपचाराने प्रयत्न अयशस्वी ठरले तरच क्रमानं दाम, दंड आणि सगळेच उपचार व्यर्थ ठरले, तर शेवटी भेदाचा अवलंब करावा. पंडितजींच्या मुलानं प्रगतीपुस्तक घरी आणलं आणि त्यातले गणिताचे गुण पाहताच पंडितजींच्या मनात संघर्षाची ठिणगी पडली. त्यांच्या स्वभावक्रमानुसार त्याला दंड करण्यासाठी त्यांचा हात वळवळू लागला आणि त्याची मुलाच्या पाठीशी भेट झाल्यावरच ती वळवळ थांबली. खरं तर मुलाची गोड शब्दांत कानउघाडणी करून आणि स्वतः त्याच्या अभ्यासात लक्ष घालून म्हणजेच सामोपचाराने त्यांना हा प्रसंग हाताळता येऊ शकला असता. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या दैनंदिन जीवनात अनेक स्वभावाची, अनेक त-हेची माणसे भेटतात.त्यातली कधी चांगली तर कधी वाईटही वृत्तीची असू शकतात.तुम्ही जर चांगलीच माणसे भेटावीत असा अट्टाहास करत असाल तर ते चुकीचे आहे.चांगली माणसे कधी कधी आपल्याला जीवनाला चांगली दिशा देऊन जातात असे वाटत असेल तर ते काही अंशी चुकीचे होऊ शकेल.कारण चांगली माणसे कधीच तुमच्यातले दोष सांगत नाहीत, परंतु वाईट माणसे तुमच्यात असणारे काही दोष नक्कीच काढतात आणि निघून जातात.त्या माणसांना आपण वाईट म्हणतो.असेही म्हणणे चुकीचे ठरेल.अशीही माणसे जेव्हा आपल्यातल्या होणा-या आणि दडलेल्या चुकांना सुधारण्याची जणू संधी देऊन जातो हे लक्षात असू द्या. आपल्या जीवनात कोणी जरी आले त्याबद्दल वाईट वाटू देऊ नका.प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता गुण दडलेला असतो त्याचे सूक्ष्म निरीक्षण करा आणि प्रत्यक्ष जीवनात सुधारणा करून चांगले जीवन जगायला शिका.मग कोणतेही माणसे तुमच्या जीवनात आली तरी त्यांच्याबाबतीत आपण संयमाची भूमिका घेऊन चांगले वाईट न म्हणता आपल्या जीवनात ती योग्यच आहेत असे मानत रहा.जग कसे जरी असले तरी तुम्ही मात्र चांगले जीवन जगण्यासाठी समर्थ राहा. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाणा गं माझा राजा* मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता. अचानक त्याला मुसमुसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं, तर पायरीच्या कडेला एक फुलपाखरू पडलं होतं. फुलपाखरू जखमी होतं. " अरे काय काय झालं तुला? " मनूनं विचारलं. " तो गणू दृष्ट आहे. त्यांना मला पकडले . माझे पंख फाटले”. “ अरे रे! " “ आता मी घरी कसा जाऊ? मला आई पाहिजे ना.?” “ कुठे आहे तुझं घर?” “ त्या सुर्यफुलाच्या शेतात.” “ चल. मी नेतो तुला तुझ्या घरी.” “ हळूचं हं ! " मनून फुलपाखराला हळूच ओंजळीत घेतलं आणि सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडलं. घरी गेल्यावर मनूनं आईला ही हकीकत सांगितली. आईन मनूला जवळ घेतलं. मनूचा लाड केला आणि म्हणाली, “ शहाणा ग माझा राजा तो.” तात्पर्य.. मुक्या प्राणिमात्रांची काळजी घ्यावी. कोणालाही आपला त्रास होणार नाही. आपल्यामुळे इजा पोहोचणार नाही ही दक्षता घ्यावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment