✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/03/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक वन्यजीव दिन* *हिनामात्सुरी - जपान* *शहीद दिन - मलावी* *मुक्ति दिन - बल्गेरिया*. 💥 ठळक घडामोडी :-  ● १९३९: मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता. ● १९२३: वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते. ● १९९१- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले ● १८८५: अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यू यॉर्क मध्ये समाविष्ट झाले। ● २००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. ● २००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या ‘शरच्‍चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड ● १९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान ● १९७३ : ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. ● १९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले. ● १९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार ● १९३० : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. ● १८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली. ● १८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली. ● १८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले. इ. स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ. 💥 जन्म :- ● १८३९- टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म ● १८६०- प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म ● १९२८- अख्तर हुसेन यांचा जन्म ● १९७७ : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर ◆ १९७० : इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू ● १९६७ : शंकर महादेवन – गायक व संगीतकार ● १९५५ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते ● १९३९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज ● १९२६ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार ● १८४७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक ● १८४५ : जी. कँटर – जर्मन गणितज्ञ ● १८३९ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक 💥 मृत्यू :- ● २००० : रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री. ● १९९५ : पं. निखिल घोष – तबलावादक ● १९८२ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर ● १९६५ : अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री ● १९१९ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार ● १७०७ : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट ● १७०३ : रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, सर्व 21 जागांवर विजय मिळवत भाजपचा केला दारूण पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई महानगरपालिकेचा प्लास्टिक कारवाईचा पुन्हा धडाका, दोन दिवसांत 1028 किलो प्लास्टिक जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्ली निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर, पुढील आदेश मिळेपर्यंत शिक्षेला स्थगिती, पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली आणि तेलंगणात दोघांना कोरोना व्हायरसची लागण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा, तर मंत्रीमंडळ उपसमितीवरुन अशोक चव्हाणांना हटवण्याची आंदोलकांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारने होळीच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 53 रुपयांनी झाला स्वस्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *प्रदूषण एक समस्या* http://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *फुलपाखरू* रामकृष्ण पांडुरंग पाटील, 9408885775 फुलपाखरू फुलपाखरू गंमत तुझी रे भारी पान फुल वेली करत फिरतोस बाग सारी वेगवेगळ्या फुलांवर बसून तू आनंद घेई स्पर्श होताच तुला कसे रंग सोडुनी जाई मऊ मऊ पंख तुझे इवले इवले पाय पकडायला जाताच पटकन उडून जाय बारीक बारीक डोळे लुकलुक करत पाही रंगीबेरंगी रूप तुझे हे दुसऱ्या कुणा नाही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल, पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर AK-47 चे चित्र आहे ?* कांगो 2) *कोणार्क सुर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा 3) *अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?* कोलंबस, इटालियन खलाशी 4) *नेपोलियनची जन्मभूमी कोणती ?* कारसिका 5) *जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता ?* कॅनडा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश कटकमवार 👤 अनिल गड्डम 👤 गोविंद चव्हाण  👤 बालासाहेब इंगोले पाटील 👤 इरफान शेख 👤 जयश्री उमरीकर 👤 कैलास माधवराव गंगुलवार 👤 साईराज संकपाळ 👤 डॉ. नितीन हरकाळ 👤 गितेश गणपत पाटणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरूवात आहे म्हणजे शेवट आहे. उदय आहे म्हणजे अपरिहार्यपणे अस्तही आहेच आहे. झाड आहे म्हणून सावली आहे. तद्वतच जन्म आहे म्हणून मृत्यूही आहे. जन्मासोबतच 'मरण'ही जन्म घेते. त्या अर्थाने मरणाला काही स्वतंत्र अस्तित्व नाही. सयामी जुळे असतात. ते एकमेकांना चिटकूनच जन्माला येतात. तसे हे 'जगणे' आणि 'मरणे' म्हणजे दोन जुळे भाऊच. पण या जगण्याला त्याच्यासोबतच जन्माला आलेले हे मरण नको असते. त्याचे स्मरण ही नको असते. तरीही 'मरण' झाकता येत नाही की टाळता येत नाही.* *जगण्यासोबतच मरणाचे वास्तव सोबत असताना 'अमरत्वाची' अवास्तव आकांक्षाही असतेच आणि मग सुरू होते अमरत्वाची मरमर'. त्यात कोणीतरी सांगतो, माणूस मरत नसतोच. मरते ते शरीर. आत्मा तर अमर असतो. आता हा आत्मा वगैरे आपण पाहिलेला नसतो. तरीही गोष्ट सोयीची असल्यामुळे दिलासा देऊन जाते. मग अशा सोयीच्या गोष्टींचाही बाजार मांडला जातो. अशा तत्वज्ञानाला मागणी असते. त्यामुळे मालाचा उठाव असतो, म्हणून त्याचे निर्माते आणि वितरकही भरपूर आपसूकच तयार होतात. मग मृत्यूच्या भयाचा व्यापार धर्माच्या नावाने केला जातो आणि तो तेजीतही असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो कुणीतरी बोलावतय हृदयातून म्हणून जाण्यात मजा आहे. कुणीतरी ऐकतय प्राणातून म्हणून गाण्यात मजा आहे. आपलं कुठलंही काम हे आतून म्हणजे मनापासून केलं पाहिजे तरच त्यात रंग भरतो.लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?        आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते)            📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हजार चुकीचे मार्ग स्वीकारण्यापेक्षा एक सत्याचा मार्ग स्वीकारला तर स्वत:च्या जीवनाचे कल्याण तर होईलच आणि त्याबरोबरच इतर लोक आपल्या जीवनाचे कल्याण होईल म्हणून तुमचे अनुयायी बनतील यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद : ९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आता मी छान दिसतो!* गणू फार आळशी मुलगा होता. त्याला तोंड धुण्याचा कंटाळा होता. त्याला अंघोळीच्या कंटाळा होता. त्याला कपडे बदलायच्या कंटाळा होता. एकदा गणू शाळेत निघाला, तेव्हा त्याची आई म्हणाली, “गणू जरा थांब, आरशात बघ! ” गणूला आरशात काय दिसले? तोंडावर पाण्याचे ओघळ! केस विस्कटलेले!! अंगातला सदरा मळलेला!!! गणू मनात म्हणाला, “ किती घाणेरडा दिसतो मी!” गणूला स्वतःचीच फार लाज वाटली. गणूने साबण लावून तोंड धुतले. स्वच्छ धुतलेले कपडे अंगात घातले. विस्कटलेले केस नीट फिरवले. मग तो आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला, “ बघ आई, आता मी कसा छान दिसतो!” मी बघ किती छान कपडे घातले, किती छान केसाचा भांग केला. आता बघ आई मी किती छान दिसतो! तात्पर्य: आपण आपले स्वतःचे तन आणि मन स्वच्छ ठेवले पाहिजे. आपण स्वतः सदैव स्वच्छता अंगी बाळगली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment