✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/12/welcome-2024.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१मध्ये झालेल्या आखाती युद्धाच्या अखेरीस पराभूत इराकच्या सैन्याने माघार घेताना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल चाळीस लक्ष पिंपे (म्हणजे सुमारे ऐंशी कोटि लिटर) तेल आखाती समुद्रात सोडून दिले. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने समुद्रातील हजारो किलोमीटर क्षेत्रातील संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट झाली!**१९४३:सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला**१९२४:एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.**१९०६:ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:वैशाली बाबुराव कोटंबे-- कवयित्री**१९६९:रामप्रभू सोमाजी गरमडे -- कवी**१९६०:मीनाक्षी विठ्ठलराव दरणे-वेरुळकर -- लेखिका* *१९५९:तात्याराव धोंडिराम चव्हाण -- लेखक* *१९५१:श्रीरात झिटूजी केदार-- कवी* *१९४६:डॉ.श्रीनिवास टोणपे-- प्रसिद्ध मराठी व हिंदी कवी* *१९४१:जयसिंगराव पवार-- प्रसिद्ध मराठी इतिहास संशोधक**१९३८:स्नेहलता देशमुख-- प्रसिद्ध लेखिका**१९२६:दीनानाथ लाड-- कामगार रंगभूमीवर लाड मास्तर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक (मृत्यू:१२ ऑगस्ट २०१९)**१९२२:गोपाळ मोरेश्वर कोलते-- लेखक,कवी(मृत्यू:४ जानेवारी २००४)**१९०१:अनंत जनार्दन करंदीकर-- मराठी पत्रकार आणि राजकारण,इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक(मृत्यू:१ नोव्हेंबर १९७७)**१९०२:डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,घटनासमितीचे सदस्य,राज्यसभा खासदार,वैदिक संस्कृत, तिबेटी,चिनी,मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)**१८८२: बळीराम जनार्दन आचार्य-- अध्यात्मक पुस्तकाचे कर्ते (मृत्यू:१७ जुलै १९५०)**१८७९:वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू:१४ एप्रिल १९५०)**१८८७:डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री,हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७१)**१८६५:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू:१८ जानेवारी १९३६)*     *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:मंगेश केशव पाडगांवकर-- मराठी कवी लेखक १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार(जन्म:१० मार्च१९२९)**२०१३:लक्ष्मी शंकर शास्त्री-- प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका(जन्म:१६ जून १९२६)**२००६ :इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म:२८ एप्रिल १९३७)**१९९२:पिराजीराव रामजी सरनाईक-- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर(जन्म:२८ जुलै १९०९)**१९८७:दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन.दत्ता – संगीतकार* *१९८२:दत्तात्रय जगन्नाथ धर्माधिकारी उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(जन्म:२ डिसेंबर १९१३)**१९८१:डॉ.अप्पासाहेब गणपतराव पवार-- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू(जन्म:५ मे १९१७)**१९७४:आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते* *१९७१:डॉ.विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ ऑगस्ट १९१९)**१९४४:रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म:२९ जानेवारी १८६६)**१६९१:रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म:२५ जानेवारी १६२७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Good Bye 2023 - Welcome 2024*2023 या वर्षात घडलेल्या घटनांचा आढावा ........!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राजस्थान, पंजाब, हरयाणा व उत्तरप्रदेशमध्ये धुक्याची चादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील दुष्काळसदृश्य तालुक्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येणार, गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू, मनोज जरांगेंचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा, ओबीसीनंतर आता धनगर समाजही आक्रमक, राज्यातील सर्व नेते पंढरपुरात जमले,  75 वर्षात न झालेला निर्णय होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, आवेश खानचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙***************************अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.~ वपु काळे | काही खरं काही खोटं*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली ?२) घुमर हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?३) कोणाच्या संकल्पनेतून हेमलकसा ( गडचिरोली ) येथे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी 'लोक बिरादरी प्रकल्पा'ला सुरूवात केली ?४) वैयक्तिक युट्यूब चॅनेलला दोन कोटीहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारे पहिले जागतिक तसेच भारतीय नेते कोण ठरले आहेत ?५) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच कोणता उत्सव साजरा केला ? *उत्तरे :-* १) कोयासन विद्यापीठ, जपान २) राजस्थान ३) बाबा आमटे ४) नरेंद्र मोदी, पंतप्रधान ५) शिवजयंती उत्सव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद👤 मारोती छपरे, माध्यमिक शिक्षक, जिपहा धर्माबाद👤 निवृत्ती लोखंडे👤 राजेश्वर रामपुरे👤 साहेबराव कांबळे👤 आनंद यडपलवार, शिक्षक👤 संजय भोसीकर👤 भारत पाटील सावळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही। नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥ म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले होण्यासाठी विचार करणे अजिबात वाईट नाही. ही एक प्रकारची चांगली सवय आहे. पण,नको त्या गोष्टींच्या मोहात पडून विचार करत बसणे कुठेतरी आपलीच वेळ वाया घालवणे होय. म्हणून त्या गोष्टीचा नाद सोडून द्यावे व जिथून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असेल किंवा नवी दिशा मिळत असेल तर त्याच विषयी विचार करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले विचार आपले आधार होत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.*रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.*तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment