✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ**१९७१:संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६६:बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६१:ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म**१९००:लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:दिया मिर्झा-हेंड्रिच-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती**१९७८:किशोर नामदेव कवठे -- प्रसिद्ध कवी लेखक* *१९७५:डॉ.विशाल गोरखनाथ तायडे-- मराठी, हिंदी,इंग्रजी लेखन करणारे लेखक* *१९७४:अंजली अंबेकर-- लेखिका**१९७१:डॉ.जनार्दन पांडुरंग भोसले-- लेखक**१९६८:फराह नाझ हाश्मी--चित्रपट अभिनेत्री**१९६७:मृणाल घाटे-- कवयित्री**१९६५:अभिजीत टोणगावकर -- लेखक* *१९५७:माधुरी वरुडकर --कवयित्री,लेखिका**१९५६:मदन मार्तंडराव बोबडे-- कवी,लेखक**१९५०:प्रतीक्षा प्रकाश वखडेकर-- कवयित्री* *१९४८:विद्या वसंत पराडकर-- कवयित्री* *१९४६:सोनिया गांधी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:खुदराम गोविंद पुरामकर-- लेखक (मृत्यू:१९ डिसेंबर २००४)**१९३९:घन:श्याम धेंडे-- गझलखेरीज एकांकिका,लावनी,विडंबनगीत असे साहित्य प्रकार हाताळणारे (मृत्यू:१४ एप्रिल २०१७)**१९३८:प्रा.भास्कर कुलकर्णी -- लेखक,कथाकार,समीक्षक* *१९२८:प्रा.विजया प्रभाकरराव कुलकर्णी -- लेखिका* *१९२६:रामचंद्र श्रीपाद गोसावी (राम गोसावी)-- प्रसिद्ध कवी* *१९२५:शकुंतला सातपुते-- लेखिका**१९१२:कानू रॉय--हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधील भारतीय अभिनेता आणि संगीतकार(मृत्यू:२० डिसेंबर१९८१)* *१८७८:अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू:१६ मे १९५०)**१८६८:फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू:२९ जानेवारी १९३४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:के.शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरणवादी,चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म:१० आक्टोबर १९०२)**१९९३:स्नेहप्रभा प्रधान --चित्रपट अभिनेत्री, लेखिका (जन्म:२० ऑक्टोबर१९१५)**१९४२:डॉ.द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म:१० आक्टोबर १९१०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा..............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.          ~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणाचे नवे पंतप्रधान रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या खासदारकीचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरक्षणासाठी माझी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई सुरु राहणार नांदेड मधील सभेत जरांगे पाटील यांचे व्यक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बाबा रामदेव 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रदीर्घ आजारानंतर ज्युनिअर महमूद कालवश; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना हा १० डिसेंबरला खेळवण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'भारतीय आरमाराचे जनक'* कोण आहेत ?२) जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारे पहिले तीन देश कोणते ?३) नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?४) केंद्रसरकारच्या NCRB अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात सलग तीन वर्षे सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदविण्यात आली ?५) भारतातील पहिले वैद्यकीय ध्यान केंद्र कोठे उभारले जात आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) चीन - ४०%, अमेरिका - १४%, भारत - ७% ३) काँग्रेस ( ११९ पैकी ६४ जागा ) ४) महाराष्ट्र ५) झानभूमी, चापर्डा, यवतमाळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अक्षय जाधव पाटील👤 प्रतीक यम्मलवार👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 जय सिंग चौहान👤 आदित्य नलावडे, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गतीकारणे संगती सज्जनाची। मती पालटे सूमती दुर्जनाची॥ रतीनायिकेचा पती नष्ट आहे। म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खोटेनाटे, रडगाणे करून आणलेले चेहऱ्यावरचे दु:ख साऱ्या जगाला सहजपणे दिसत असते पण, ज्याच्या अंतर्मनात वेदना, दु:ख,व्यथा किती कुटून भरलेले आहे ते कोणीही ओळखू शकत नाही.ज्याचं दुःख त्यालाच कळत असतं कारण चेहरा आणि मुखवटा यात फरक असतो मुखवटा धारण केलेल्या चेहऱ्यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो. म्हणून खरे दु:ख जर ओळखायचेच असतील तर अंतर्मनाला ओळखण्याचा प्रयत्न करावे त्यासाठी आपली दृष्टी सुद्धा तशीच असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भली खोड मोडली*एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment