✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१८९५:ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.**१८८५:मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना**१८४६:आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.**१८३६:स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६१२:गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:कुंदा बच्छाव -शिंदे-- लेखिका* *१९७९:प्रशांत मंगरु भंडारे-- कवी* *१९७५:राजेश लक्ष्मण व-हाडे -- लेखक* *१९६२:प्रशांत असनारे -- प्रसिद्ध कवी* *१९६०:दयानंद घोटकर-- पाश्वगायक, संगीतकार,लेखक,कवी दिग्दर्शक अभिनेता* *१९६०:प्राचार्य दीपा क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९५२:अरुण जेटली –माजी केंद्रीय मंत्री व वकील (मृत्यू:२४ ऑगस्ट,२०१९)**१९४८:वि.ग.सातपुते-- भावकवी,व्याख्याते, लेखक* *१९४६:गोरख शर्मा-- भारतीय गिटार वादक(मृत्यू:२६ जानेवारी २०१८)**१९४५:वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू:१ जून २००१)**१९३७:रतन टाटा – उद्योगपती**१९३६:प्रा.वामन सदाशिव पात्रीकर-- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार(मृत्यू:१९ एप्रिल २००३)**१९३४:बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले-- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक(मृत्यू:३० जुलै २०१२)**१९३२:धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू:६ जुलै २००२)**१९३१:देवीदास तुकाराम बागूल-- लेखक, छायाचित्रकार,कथाकार**१९२६:हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू:१० ऑगस्ट १९४२)**१९११:फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक(मृत्यू:१६ मे १९९४)**१९०३:पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर-- मराठी पोवाडेकार**१८९९:उधम सिंग-- भारतीय क्रांतिकारक(मृत्यू:३१ जुलै १९४०)**१८९९:गजानन त्र्यंबक तथा ग.त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार,समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू:२७ नोव्हेंबर १९७६)**१८९७:डॉ.शंकर दामोदर पेंडसे-- संत वाड्:मयाचे अभ्यासक (मृत्यू:२३ आॅगस्ट १९७४)**१८५६:वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:३ फेब्रुवारी १९२४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म:३० सप्टेंबर १९३३)**२००३: चिंतामण गणेश काशीकर--वेदशास्त्र अभ्यासक,लेखक(जन्म:१७ ऑगस्ट १९१०)**२०००:मेघश्याम पुंडलिक तथा मे.पुं.रेगे – तत्त्वचिंतक,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म:२४ जानेवारी १९२४)**१९८१:हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म:१९०९)**१९७७:सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म:२० मे १९००)**१९३१:आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: १८६०)**१६६३:फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२ एप्रिल १६१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *गुरुदक्षिणा*मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ................. पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * ‘साने गुरूजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्ताने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार, 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-नगर रोडवर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बोलण्याच्या जादूने अनेकांचं आयुष्य बदलणारा वक्ता हरपला, मोटिवेशनल स्पीकर वैभव कथारेचा अपघाती मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत के एल राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'महाराष्ट्राचे शिल्पकार'* कोणाला म्हणतात ?२) जलधोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?३) 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव कोणत्या वर्षी मांडला होता ?४) भारतातील अक्षरधाम मंदिर कोणत्या शहरात आहे ?५) माती व चुनखडक योग्य प्रमाणात मिसळून कोणते सिमेंट तयार केले जाते ? *उत्तरे :-* १) यशवंतराव चव्हाण २) मेघालय ३) सन २०१४ ४) दिल्ली ५) पोर्टलँड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साई पाटील, धर्माबाद श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस👤 वृषाली वानखडे, अमरावती सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक👤 श्रीधर सुंकरवार, पद्मशाली नेते, नांदेड👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 अजय तुम्मे👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती👤 नंदकिशोर सोवनी, पुणे👤 ओमसाई सितावार, येवती👤 ओमकार ईबीतवार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निराकार आधार ब्रह्मादिकांचा। जया सांगतां शीणली वेदवाचा॥ विवेके तदाकार होऊनि राहें। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात असे अनेक क्षण येतात आणि क्षणात निघूनही जातात. पण ज्या क्षणातून आपल्याला काही शिकायला मिळाले असेल किंवा अनुभव आले असतील तसेच मार्गदर्शन मिळाले असतील तर त्यांना क्षणांना कधीही विसरू नये. जीवनात आपल्याला बरेच काही मिळवता येते पण,गेलेले क्षण कधीच परत पुन्हा मिळवता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!*तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment