✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_30.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय गणित दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:प्रसिद्ध रंगकर्मी के.एन.पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर**१८५१:जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.**१८८५:सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:ईशा तलवार-- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८४:भूषण वर्धेकर-- कवी* *१९७५:आशा खरतडे-डांगे -- कवयित्री* *१९७३:प्रा.डॉ.संदीप रंगनाथ तापकीर -- लेखक**१९६८:अरुणा गजानन कडू -- कवयित्री* *१९६२:प्रा.प्रकाश जनार्दन कस्तुरे-- प्रसिद्ध लेखक**१९५८:डाॅ.आनंद नाडकर्णी-- मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ**१९५७:धनंजय वसंतराव मुजुमदार-- प्रसिद्ध लेखक* *१९५५:अभय वसंत मराठे -- लेखक* *१९५४:वासुदेव नामदेवराव राघोते -- कवी, लेखक तथा पूर्व प्राचार्य**१९४९:डॉ.सुभाष कृष्णराव पाटील-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४१:अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (मृत्यू:२६ मार्च२०१०)**१९०१:वामन श्रीधर पुरोहित -- लेखक,शिक्षण तज्ज्ञ(मृत्यु:१९ सप्टेंबर १९७५)**१८८७:श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती.'पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.(मृत्यू:२६ एप्रिल १९२०)**१८८२:डॉ.बाळकृष्ण -- नामवंत शिक्षणतज्ज्ञ, थोर इतिहासकार आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाराम महाविद्यालयाचे पूर्व प्राचार्य( मृत्यू:२१ ऑक्टोबर १९४०)**१८५३:भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू:२१ जुलै १९२०)* *१६६६:गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू:७ आक्टोबर १७०८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज (जन्म:२२ जुलै १९३७)**२००२:दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते* *१९९६:रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे-- संगीत समीक्षक व पत्रकार**१९८९:सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार,कवी आणि दिग्दर्शक (जन्म:१३ एप्रिल १९०६)**१९७५:वसंत देसाई-- मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार(जन्म:९ जून १९१२)**१९४५:श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ -- रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (जन्म:११ नोव्हेंबर १८६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हर कॅलेंडर कुछ कहता है ।31 डिसेंबर संपला की घरातील भिंतीवर असलेले  कॅलेंडर बदलले जाते आणि त्याठिकाणी नव्या वर्षाची जानेवारी महिन्याची कॅलेंडर लटकविली जाते. पाहता पाहता एक वर्ष संपून जाते. गेल्या एका वर्षात काय काय घडले ? याचा आढावा थोडक्यात घ्यायला बसलोत तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून सरकतात. काही बाबी तीव्रतेने आठवतात तर काही बाबी आठवण करण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर फेकून देतो. पण जर हेच कॅलेंडर आपणास विविध प्रकारचे काम करू शकते..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतावरील कर्जाचा बोझा वाढला, 205 लाख कोटींवर पोहचला आकडा; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिओ ऑलिम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकार अन् मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ ठरली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लष्कराच्या 2 वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, 4 जवान शहीद; पाकिस्तानी संघटनेने घेतली जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन, नगरमध्ये उपचार सुरु असताना घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 78 धावा ने पराभव करत 2-1 ने मालिकाही जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माळेगाव यात्रा*माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणाऱ्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती. खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रयत्नांची पाऊले पडले की, यशाचे ठिकाण गाठायला वेळ लागत नाही.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून सर्वात जास्त बोली कोणावर लागली ?२) भारतात दयेचा अधिकार कोणाला आहे ?३) 'लिटल मास्टर' असे कोणाला म्हणतात ?४) 'मिठागराचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?५) १९२० मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषविले ? *उत्तरे :-* १) मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया ( २४ कोटी ७५ लाख, केकेआर ) २) राष्ट्रपती ३) सुनील गावस्कर, भारत ४) रायगड ५) राजर्षी शाहू महाराज *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अमोल पाटील👤 अजय गवळी👤 दिलीप डोम्पलवार👤 अनिल यादव👤 सौ. राजश्री शिवराज भुसेवार, मा. शिक्षिका, नांदेड👤 अजय डाकोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कळेना कळेना कळेना कळेना। ढळे नाढळे संशयोही ढळेना॥ गळेना गळेना अहंता गळेना। बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझं तू जरा ऐक मी तुझे सर्व काम करून देतो. असं जर कोणी आपल्याला म्हणत असेल तर होकार देण्याआधी त्या व्यक्तीला वाचणे गरजेचे आहे सोबत त्यावर खोलवर जाऊन विचार करणे आवश्यक आहे. बरेचदा असं होतं की, त्या विषयावर विचार न करता होकार देल्याने केसानी गळा कापल्या जाते म्हणून जरा सावधगिरी बाळगली पाहिजे. तेही आपल्यावरच अवलंबून आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *रुपयांची गोष्ट*एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्‍याच दिवशी‍ त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्‍या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला. हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्‍या कष्टाची किंमत कळली. तात्‍पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई असते. त्याची किंमत ही कष्ट घेतले की मगच कळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment