✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय नौदल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान**१९९३:उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९१:पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.**१९७५:सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७१:भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.**१९४८:भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१९६७:थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण**१९२४:मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्‍घाटन झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:माधवी दीपक जोशी-- लेखिका**१९७१:सुनील संपतराव हुसे -- कवी* *१९६९:प्रा.डॉ.पुरुषोत्तम माळोदे-- लेखक संपादक* *१९६८: डॉ.वसुधा वैद्य-- लेखिका* *१९६७:उमेश मोघे -- प्रख्यात तबलावादक, लेखक* *१९६७:मनीष लक्ष्मण पाटील-- लेखक* *१९६४:स्मिता प्रवीण खानझोडे -- कवयित्री* *१९६२:सय्यद जावेद अहमद जाफरी-- भारतीय विनोदी अभिनेता**१९६२:डॉ.सुलभा कोरे -- मराठी व हिंदी भाषेच्या कवयित्री व अनुवादक* *१९५७:प्रसाद सावंत -- लेखक,कवी* *१९५४:पंडित हिंदराज दिवेकर-- रुद्र वीणा आणि सतार वादक(मृत्यू:१९ एप्रिल २०१९)**१९५१:डॉ.अलका देव मारुलकर-- गायिका आणि संगीतकार**१९५०:पार्थ पोकळे-- लेखक* *१९४९:नारायण दत्तात्रेय कुडलीकर -- लेखक* *१९४२:निशिकांत धोंडोपंत मिरजकर-- समीक्षक,तौलनिक साहित्याचे अभ्यासक**१९४२:फादर फ्रान्सिस दिब्रिटो --ज्येष्ठ साहित्यिक,९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३५:शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (मृत्यू:२० जुलै १९९५)**१९३२:कमलाकर धारप-- जेष्ठ साहित्यिक* *१९३१:लीला श्रीवास्तव-- लेखिका* *१९१९:इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१२)**१९१६:बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक,कादंबरीकार व लघुकथाकार (मृत्यू:२२ एप्रिल २००३)**१९१०:आर.वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू:२७ जानेवारी २००९)**१९१०:मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (मृत्यू:१७ जून १९६५)**१९०९:रंगनाथ नरहर होनप -- कवी**१८९८:काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशिनाथ चांदुरकर--मराठी कवी,कादंबरीकार आणि लेखक**१८३५:सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (मृत्यू:१८ जून १९०२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:विनोद दुआ-- दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये काम करणारे भारतीय पत्रकार(जन्म:११ मार्च १९५४)**२०१८:डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक(जन्म:८ ऑगस्ट १९३५)**२०१७:शशी कपूर-- हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक(जन्म:१८ मार्च १९३८)* *२००७:पुरुषोत्तम नागेश ओक -- विद्वान इतिहासकार,इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषांत लेखन केले आहे.(जन्म:२ मार्च १९१७)**१९७४:शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (जन्म:२८ आक्टोबर १८९३)**१९०२:डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म:६ नोव्हेंबर १८५१)* *१८५०:विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म:२२ मे १७८३)* *११३१:ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ,खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म:१८ मे १०४८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांना स्वातंत्र्य हवे ....*देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड मध्ये भाजप तर तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तेलंगणात काँग्रेसचे रेवंथ रेड्डी होणार सीएम - सुत्राची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साहित्य संमेलनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला, सरकारवर हल्लाबोल अन् राजीनामे देण्याची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धनगर समाजाकडून आरक्षणासाठी पुण्यात रास्तारोको आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विज्ञान धारा यात्रा आरोग्ययात्रा नागपुरात दाखल, 12 जिल्ह्यातून यात्रा जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी एकूण  4 कोटी 77 लाखांचे दान आले असून मागील वर्षीच्या तुलनेत या दानाच्या रकमेत वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीने दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या T20 I सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावाने हरवून 4-1 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय नौदल दिन*भारतीय नौदलातर्फे दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ४ डिसेंबर याच दिवशी नौदलदिन का साजरा केला जातो हे जाणून घेऊया. १९७१ सालच्या सुरवातीपासूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तत्कालीन पूर्व पाकिस्तान मधून पाकिस्तानी हवाईदल सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही पाकिस्तान आपली खोड मोडायला तयार नव्हते. १९७१ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या पार्श्वभूमीवर सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीला मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी या बैठकीत स्पष्ट सांगितले की सध्याची परिस्थिती आणि ऋतू हे आपल्यासाठी अनुकूल नसल्याने सध्यस्थितीत युद्ध आपल्याला परवडणारे नाही. युद्धासाठी नोव्हेंबर पर्यंत थांबावे लागेल. नोव्हेंबर पर्यंत सैन्याची जुळवाजुळव व्यवस्थित करता येईल याची खात्री देण्यासही ते विसरले नाही. खरंतर एप्रिलमध्येच युद्ध व्हावे या मताच्या इंदिरा गांधी होत्या पण लष्करप्रमुखांनी परिस्थिती विषद केल्यानंतर नोव्हेंबर पर्यंत थांबण्याचा निर्णय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आपण काहीही केले तरी भारत आपल्याला उलट उत्तर देऊ शकणार नाही अशा आविर्भावात पाकिस्तान वावरू लागला. त्यांनी ३ डिसेंबर रोजी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याचवेळी भारतीय विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रांतला सागरतळात बुडवण्याची योजना पाकिस्तानने आखली. पाकिस्तानची ही योजना भारतीय नौदलाच्या लक्षात आल्याने भारतीय नौदलाने चुकीचा संदेश पाठवून पीएनएस गाझी ची दिशाभूल केली आणि डाव साधला. भारतीय नौदलाने चढवलेल्या हल्ल्यात गाझी या पाकिस्तानच्या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. भारताच्या आयएनएस विक्रांतला सागर तळाशी पाठवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तानी नौदलाची सर्वात शक्तिशाली असलेली गाझी ही पाणबुडीच सागर तळाशी पोहचल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. गाझी पाणबुडीला जलसमाधी मिळाल्यानंतर बंगालच्या उपसागरात आयएनएस विक्रांतने आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. आयएनएस विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करुन लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरुन गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तानी नौदलाने केली नव्हती. ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर भारतीय नौदलाचा जगभरात दबदबा निर्माण झाला. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि दक्षिण महासागरात भारतीय नौदलाचे सामर्थ्य निर्माण झाले. आज भारतीय नौदल हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदल म्हणून ओळखले जाते. आज भारताचे नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदलाकडे एकूण ५५ युद्धनौका आणि ५८ हजार ३५० सैनिक आहेत. भारताकडे ९ विध्वंसक, १५ नौका, न्यूक्लिअर हल्ला करणारी एक पाणबुडी, १४ पारंपरिक पाणबुडीसह आधुनिक शस्त्रे आहेत म्हणूनच जगातील सर्वात शक्तिशाली नौदलामध्ये भारतीय नौदलाची गणना होते. भारतीय नौदलाला नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राजर्षी शाहू महाराजांना *'राजर्षी'* ही पदवी कोणत्या समाजाने दिली ?२) क्यूआर कोडचा शोध कोणत्या देशात लागला ?३) जन्मतः ज्या बाळाच्या हृदयात दोष असतो त्या बाळाला काय म्हणतात ?४) जगात सर्वात जास्त सिनेमाची तिकीट कोणत्या देशात आहे ?५) दिवस व रात्र कोठे समान असतात ? *उत्तरे :-* १) कुर्मी समाज २) जपान ३) ब्लू बेबी ४) स्वित्झरलँड ५) विषुववृत्त*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उमाकांत शिंदे, नांदेड👤 शेख आलिम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तये द्रौपदीकारणे लागवेगे। त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥ कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे''छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment