✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_40.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय सेना ध्वज दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड**१९९५:फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण**१९९४:कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर**१९८८:यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.**१९७५:इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.**१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.**१९१७:पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.**१८२५:बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:धनंजय शंकर पाटील-- लेखक,कवी**१९८७:सोनी प्रभाकर कानडे-- कवयित्री* *१९७३:ललित एकनाथ बोरसे -- कवी* *१९७१:अनिसा सिकंदर शेख-- कवयित्री, लेखिका* *१९६२:शेखर सुमन--भारतीय अभिनेता,अँकर,निर्माता,दिग्दर्शक आणि गायक**१९६१:प्रशांत दळवी-- मराठी नाटककार व चित्रपट-कथालेखक**१९५७:जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५६:डॉ.विठ्ठल ठाकूर -- लेखक* *१९५५:पांडुरंग सोमाजी भेलावे-- लेखक,कवी* *१९४८:प्रा.डॉ.भीमराव वाघचौरे--ज्येष्ठ साहित्यिक**१९४६:प्रा.माधवी कवी -- जेष्ठ लेखिका, तत्वज्ञान विषयाच्या अभ्यासक* *१९४०:जीवन चंद्रभान पाटील -- लेखक**१९३१:संगमेश्वर गुरव-- किराणा घराणा चळवळीशी संबंधित गायक(मृत्यू:७ मे २०१४)**१९२५:शोभना जयंत चांदूरकर -- कवयित्री**१९२२:जयरामदास धर्माजी सरकाटे-- लेखक (मृत्यू:११ डिसेंबर १९९९)**१९२०:बाबुराव सरनाईक-- ज्येष्ठ कवी लेखक (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१७)**१९१३:डॉ.दत्तात्रेय गंगाधर कोपरकर -- महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक, संपादक* *१९०२:जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे.जी.‘नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू:७ सप्टेंबर १९७९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म:१६ जुलै १९१३)**१९८२:बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (जन्म:१७ जून १९०३)**१९७६:डॉ.गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ**१९५७:नरहर शंकर रहाळकर-- मराठी कवी (जन्म:१८८२)**१९४१:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म:२७ आक्टोबर १८७४)**१८९४:सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन.(जन्म:१९ नोव्हेंबर १८०५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आणि उपक्रम*देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतो. शिक्षक जेवढा उत्साही आणि उपक्रमशील असेल तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे, मुलांना शिकविण्याचे. वार्षिक आणि मासिक नियोजनानुसार जे शिक्षक फक्त धडेचे धडे पूर्ण करून विहित वेळेत अभ्यासक्रमपूर्ण करतात त्याच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील कदाचित मात्र सर्वगुणसंपन्न राहणार नाहीत. विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक आवडतात ? या प्रश्नांवर जरासा विचार केला तर लक्षात येईल की, जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी ..........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील Link वर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधीमंडळ हिवाळी अधिवेशनास आज होणार सुरुवात, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईनंतर आता नागपूरमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, शिंदे गटाची होणार उलट तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाचखोरी करत शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रवी बिश्नोई ठरला टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज ! राशिद खानला टाकले मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌳 *बोन्साय* 🌳    *****************जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात.वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो.अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्‍या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात.एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'सशस्त्र सेना ध्वज दिन'* केव्हा साजरा केला जातो ?२) नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?३) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत एकूण किती देश सहभागी झाले होते ?४) भारतातील सर्वात मोठा २८७ किमीचा वर्तुळाकार रेल्वे मार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे ?५) पेट्रोलवर चालणाऱ्या पहिल्या कारचे इंजिन कोणी तयार केले ? *उत्तरे :-* १) ७ डिसेंबर २) भाजपा ( २३० पैकी १६४ जागा ) ३) १३० देश ४) बंगळुरू ५) कार्ल बेंज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर👤 साईनाथ जायेवाड, येवती👤 भीमाशंकर बच्चेवार👤 डॉ. मनोज मनूरकर👤 बाळासाहेब तांबे👤 आश्विन जैस्वाल👤 संतोष अनालदास*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं धन्य तो रामसूखें निवाला। कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥ देहेभावना रामबोधे उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात यश मिळविण्याची व यश प्राप्त करण्याची प्रत्येकांची तऱ्हा वेगवेगळी असते. कोणी धनसंपत्तीच्या आधाराने जिंकतात तर ,कोणी रूपाने जिंकतात, कोणी कटकारस्थान करून जिंकत असतात. आपण मात्र तसं जिंकण्याचा कधीही प्रयत्न करू नये. जे, सत्य व अजरामर होऊन गेलेले थोर संत महात्मे, महापुरुष आहेत त्यांच्या विचारांना आत्मसात करून जगण्याचा प्रयत्न केले पाहिजे कारण त्यांच्या विचारातच एवढी ताकद आहे की, आपल्याला नुसते जिंकायलाच नव्हे तर जगायला ही शिकवतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment