✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली.या लाटेने भारत,श्रीलंका,इंडोनेशिया,थायलँड, मलेशिया,मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.**१९९७:विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार**१९८२:टाइम (TIME) मासिकातर्फे* दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला**१९७६:कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.**१८९८:मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:सुनिता संदीप तांबे-- कवयित्री, लेखिका**१९६१:वृषाली विक्रम पाटील-- कवयित्री, लेखिका**१९६१:मिलिंद सुधाकर जोशी -- कवी, व्याख्याते* *१९५४:सुरेश पाचकवडे -- प्रसिद्ध कवी, कथाकार* *१९५१:प्रा.नीला विनायक कोंडोलीकर-- लेखिका**१९४९:सुरेखा भगत-- कवयित्री* *१९४८:डॉ.प्रकाश आमटे-- प्रसिद्ध समाजसेवक,लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९४१:लालन सारंग – मराठी नाट्यअभिनेत्री,लेखिका (मृत्यू:९ नोव्हेंबर २०१८)* *१९३५:डॉ.मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू:२७ डिसेंबर १९९९)**१९३८:दत्तात्रय दिनकर पुंडे-- मराठीतील ख्यातनाम समीक्षक,भाषाभ्यासक आणि संपादक* *१९२८:मार्टिन कूपर--- अमेरिकन अभियंता, मोबाईल फोनचे जन्मदाते* *१९२५:पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के.जी’ गिंडे – शास्त्रीय गायक,संगीतकार व शिक्षक (मृत्यू:१३ जुलै १९९४)**१९१७:डॉ.प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले.(मृत्यू:१७ जून १९९१)**१९१४:डॉ.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक,लेखक (मृत्यू:९ फेब्रुवारी २००८)**१९१४:डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री,महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर,गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू:३ जानेवारी २०००)**१८९३:माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार,मुत्सद्दी,मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू:९ सप्टॆंबर १९७६)**१७९१:चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू:१८ आक्टोबर १८७१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म:१५ सप्टेंबर १९२१)**२०००:प्रा.शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक(जन्म:११मार्च १९१२)* *१९९९:शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म:१९ ऑगस्ट १९१८)**१९८९:केशवा तथा के.शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक,भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक,पद्मविभूषण (१९७६) (जन्म:३१ जुलै १९०२)**१९७२:हॅरी एस.ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:८ मे १८८४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दत्त जयंती*मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ' हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. *संकलन*~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशाच्या निर्मितीपासून ते समाजाच्या निर्मितीपर्यंत ख्रिस्ती समुदायाचं मोठं योगदान - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, 24 तासात 656 नवे रुग्ण; 3742 सक्रिय कोरोनाबाधित, आरोग्य मंत्रालयाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पेण तालुक्यातील उंबर्डे गावचे सरपंच महेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाची आत्महत्या:रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली; मरणापूर्वी लिहिली होती सुसाईट नोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *लस म्हणजे काय ?* 💉*अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.**बर्‍याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.**शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.**आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बाबा आमटे यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) 'आधुनिक भारताचे संत' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?५) बाबा आमटे यांना समाजसेवेसाठी कोणकोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) हिंगणघाट, वर्धा ( २६ डिसेंबर १९१४ ) २) मुरलीधर देवीदास आमटे ३) बाबा आमटे ४) आनंदवन ५) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर👤 नागराज राजेश्वर डोमशेर👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद👤 कपिल जोंधळे👤 अशोक लंघे👤 शादूल शेख👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी। अकस्मात आकारले काळ मोडी॥ पुढे सर्व जाईल कांही न राहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कडून एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद व चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर त्यातून जे समाधान मिळत असते तो,समाधान जगावेगळा असतो. पण, एखाद्या व्यक्तीकडून आपण करत असलेल्या कार्याला वारंवार विरोध होत असेल, वाट अडवणे होत असेल किंवा निंदा होत असतील तर जास्त मनावर घेऊ नये.कारण मेंदू तर प्रत्येकांपाशी असतो फरक एवढाच की, प्रत्येकांची विचारसरणी मात्र एकसारखी नसते म्हणून त्यांना त्यांचे काम करू द्या आपण आपले काम करत रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment